ETV Bharat / state

Building Fire In Mumbai : दादर हिंदू कॉलनीत इमारतीला आग, 60 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू - Dadar Hindu Colony

Building Fire In Mumbai : शुक्रवारी मुंबई उपनगरातील जोगेश्वरी येथील हिरापन्ना या शॉपिंग मॉलला आग लागल्याची घटना ताजी आहे, असं असतानाच आज दादर हिंदू कॉलनीत एका इमारतीला आग लागल्याची घटना घडलीय. यात 60 वर्षीय व्यक्तीचा गुदमरल्यानं मृत्यू झालाय.

Building Fire In Mumbai
मुंबईत इमारतीला आग
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 23, 2023, 10:20 PM IST

मुंबई : आज दादर येथील हिंदू कॉलनी परिसरात असलेल्या रेन्ट्री या 15 मजली इमारतीच्या 13 व्या मजल्यावर पहाटेच्या सुमारास आग लागली. या आगीत 60 वर्षीय व्यक्तीचा गुदमरून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला मिळालेल्या माहितीनुसार, दादर पूर्व येथील हिंदू कॉलनीत असलेल्या या इमारतीच्या 13 व्या मजल्यावर आज सकाळी 8:37 वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. आग लागल्यामुळे सर्वत्र धुराचं साम्राज्य पसरलं होतं. या धुरात श्वास गुदमरल्यानं या इमारतीत राहणाऱ्या सचिन पाटकर या व्यक्तीचा मृत्यू झालाय.

श्वास गुदमरून मृत्यू : या आगीची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. शर्थीच्या प्रयत्नानं बचावकार्य सुरू केलंय. तसंच या घटनेतील जखमी झालेल्या व्यक्तींना सायन रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. परंतु 60 वर्षीय सचिन पाटकर या गृहस्थाचा रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांकडून स्पष्ट करण्यात आलंय. धुरामुळं श्वास गुदमरल्यानं त्यांचा मृत्यू झाला असल्याचं सांगण्यात आलंय. या आगीवर नियंत्रण मिळवण्यात मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलंय. आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही. पुढील तपास सुरू आहे.

हिरापन्ना मॉलला आग : शुक्रवारी मुंबई उपनगरातील जोगेश्वरी पश्चिमेला असलेल्या हिरापन्ना मॉलमध्ये भीषण आग लागली होती. शुक्रवारी दुपारी 3:15 वाजता ही आग लागली होती. ही आग इतकी भीषण होती की, धुराचे लोट सर्वत्र पसरले होते. या आगीच्या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या होत्या. मॉलमधून मोठ्या प्रमाणात आगीच्या धुराचे लोट बाहेर येत होते. ही आग विझवण्यात मुंबई अग्निशमन दलाला यश आलं, पण यामध्ये अग्निशमन दलाचे तीन जवान जखमी झाले होते. ही आग विझवत असताना गुदमरल्यामुळं हे जवान जखमी झाले होते. त्यांना तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अग्निशमन दलाच्या पथकानं मॉलमध्ये अडकलेल्या सुमारे 13 लोकांना सुखरूप बाहेर काढलं होतं.

हेही वाचा :

  1. Vande Bharat Express Fire : भोपाळहून निजामुद्दीनला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनला भीषण आग, जीवितहानी नाही
  2. Pune Fire News: येवलेवाडीत गोडाऊनमधे लागली भीषण आग; फॅब्रिक मटेरियलने घेतला पेट
  3. Fire In Company : अंबरनाथ एमआयडीसीतील फोम कंपनीला भीषण आग; तीन तासानंतर आटोक्यात

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.