मुंबई- दुसऱ्यांदा सत्तेत आलेले एनडीए सरकार पहिला अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यापार्श्वभूमीवर भारतीय उद्योग महासंघ म्हणजेच सीआयआयने अर्थतज्ञ, उद्योजकांना महासंघाच्या कार्यालयात निमंत्रित केले आहे. याठिकाणी अर्थसंकल्पाचे विश्लेषण केले जाणार आहे. कृषी प्रक्रिया, उद्योग, रियल इस्टेट, शिक्षण या क्षेत्रातील तज्ज्ञ अर्थसंकल्पाचे विश्लेषण करणार आहेत.
लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर नरेंद्र मोदी सरकार सलग दुसऱ्यांदा सत्तेत आले आहे. मोदी सरकार २.० चा पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यानंतर अर्थसंकल्प मांडणाऱ्या त्या देशाच्या दुसऱ्या महिला अर्थमंत्री आहेत. तर, पूर्णवेळ अर्थमंत्री म्हणून अर्थसंकल्प मांडणाऱ्या त्या देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्री आहेत.