ETV Bharat / state

Anurag Thakur on Wrestlers Protest : कुस्तीपटूंच्या आंदोलनावर केंद्रीय क्रीडामंत्र्यांचे भाष्य; म्हणाले, खेळाडूंनी संयम.... - Anurag Thakur

मोदी सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजपतर्फे मोदी @9 हे अभियान देशभर राबविण्यात येत आहे. या अभियानाचा भाग म्हणून गुरुवारी केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी मुंबईचा दौरा केला. दिवसभर केलेल्या दौऱ्यानंतर त्यांनी भाजप प्रदेश कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सुरू असलेल्या कुस्तीपटूंच्या विषयावर भाष्य केले आहे.

Anurag Thakur On Brijbhushan
Anurag Thakur On Brijbhushan
author img

By

Published : Jun 1, 2023, 9:54 PM IST

Updated : Jun 1, 2023, 10:47 PM IST

मुंबई : कुस्तीगीर साक्षी मलिक, बजरंग पुनिया तसेच विनेश फोगाट यांनी ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप केले असून त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई व्हावी यासाठी हे सर्व कुस्तीगीर जंतर-मंतर येथे निदर्शनास बसले आहेत. या कुस्तीगिरांच्या समरणार्थ आता राजकारणीही समोर आले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून कुस्तीपटूंच्या आंदोलनात सन्मानजनक तोडगा काढावा अशी विनंती केली आहे. फक्त देशातच नाही, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा हे प्रकरण गाजत असून याचे पडसाद आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रातूनही उमटू लागले आहेत. मोदी सरकारकडून याप्रकरणी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. तर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेने कुस्तीगीरांना दिलेली वागणूक ही अस्वस्थ करणारी असल्याचं म्हटलं आहे.

आमच्या सरकारमध्ये खेळाडूंवर जास्त काम : या प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगले तापले असताना आता केंद्रीय क्रीडामंत्री, अनुराग ठाकूर यांनी या प्रकरणी कुस्तीपटूंनी संयम पाळायला हवा असे सांगत, आमच्या सरकारमध्ये खेळाडूंवर जास्त काम झाले आहे. सर्वात जास्त मेडल आम्ही आणले आहेत. सरकार ने नेहमी खेळाडूंसाठी प्रोजेक्ट वाढवले आहेत. यंदा २ हजार ७८२ करोड रुपयांचं बजेट खेळासाठी वाढवले आहे. जानेवारीमध्ये मला हे प्रकरण समजले. त्यानंतर आम्ही १४ बैठका घेतल्या आहेत. कायद्याप्रमाणे सर्व काही होत आहे. चार्जशीट पण लवकरात लवकर दाखल होईल. राजकारणी लोक यामध्ये का आले? हा सुद्धा प्रश्न आहे. योग्य प्रकारे तपास पूर्ण झाल्यावरच दोषींना शिक्षा देण्यात येईल. निःपक्ष व पारदर्शकपणे तपास होईल, असा विश्वास मी तुम्हाला देतो. आम्ही खूप संवेदनशील पणाने हा विषय हाताळत आहोत, असेही ठाकूर म्हणाले. तसेच कुठल्याही प्रकरणाच्या चौकशीला उशीर लागतो व ती चौकशी पूर्ण होण्याअगोदरच कुठलाही निर्णय घेतला जाऊ शकत नाही,असेही ते म्हणाले आहेत.

प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य : मोदी सरकारच्या ९ वर्षाच्या उपलब्धि बाबत बोलताना अनुराग ठाकूर म्हणाले की, आतंकवाद, गुन्हेगारी, काळा पैसा या विषयी मोदींनी नेहमी आवाज उचलला आहे. कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमलाला शोधण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जगभरातील लोक भारतावर विश्वास दाखवत आहेत. इथे अभिव्यक्ती आझादी आहे, म्हणून इथे स्वतंत्र आहे. काही विषय असतील तर, त्यावर चिंता, चिंतन दोन्ही होऊ शकतात. केरला स्टोरीला सक्सेस भेटली आहे. या विषयावर फिल्म अभिनेते नसुरुद्दीन शहा यांनी काही भाष्य केले असेल तर, तो त्यांचा प्रश्न असल्याचेही ठाकूर म्हणाले.

विदेशात राहुल गांधी करतात भारताची बदनामी : अनुराग ठाकूर पुढे म्हणाले की, विदेशात पाय ठेवताच प्रायोजित कार्यक्रमात भारताला अपमानित करण्याचं काम राहुल गांधी करत आहेत. भारताचा तिरंगा विदेशात अपमानित होतो आहे. राहुल गांधी चिनी अधिकाऱ्यांबरोबर वार्तालाप करतात. भारताला बुडवण्याच काम राहुल गांधी यांनी हातात घेतले आहे. असेही ठाकूर म्हणाले. तसेच १९८४ मध्ये इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर पूर्ण बहुमताने काँग्रेसच सरकार आले. ती एक भावनिक निवडणूक होती. त्यानंतर २०१४ मध्ये नरेंद्र मोदींनी दोनवेळा पूर्ण बहुमताने सरकार बनवले. राहुल गांधी यांना खासदारकी सुद्धा टिकवता आली नाही. १९८४ च्या दंगली शीख बांधव अजूनही विसरले नसल्याचही ठाकूर म्हणाले आहेत.

सकाळी घेतले सिद्धिविनायक बाप्पाचे दर्शन : आज सकाळी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी प्रभादेवी येथील सिद्धीविनायक मंदिरात जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी सिद्धिविनायक वास्तुविशारद शशी प्रभू यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर शिवाजी पार्क येथे संगीतकार पद्मजा फेणाणी यांचीही भेट घेतली. दुपारी हिंदुजा हॉस्पिटलचे सीईओ जॉय चक्रवर्ती यांची त्यांच्या निवास्थानी भेट घेतली. त्याचबरोबर व्यावसायिक बकुल शहा यांचीही भेट अनुराग ठाकूर यांनी घेतली. याप्रसंगी त्यांच्या सोबत भाजप आमदार प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड उपस्थित होते.

हेही वाचा -

  1. Wresters Protest : शेतकरी संघटनांचाही जंतरमंतरवरील पैलवानांना पाठिंबा, राजधानीत होणार कडक सुरक्षा व्यवस्था
  2. Brij Bhushan Sharan Singh: गंगेत मेडल विसर्जित करून मला फाशी होणार नाही, ब्रिजभूषण सिंग यांची तर्पोक्ती

Last Updated : Jun 1, 2023, 10:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.