ETV Bharat / state

BMC Expenditure : पालिकेने केलेल्या खर्चाचे कॅगद्वारे ऑडिट; प्रशासन अडचणीत येणार?

author img

By

Published : Dec 25, 2022, 6:24 PM IST

मुंबई महानगरपालिकेने ( Brihanmumbai Municipal Corporation ) केलेल्या खर्चाचे कॅग द्वारे ऑडिट ( audit by CAG ) केले जात आहे. त्यानंतर हिवाळी अधिवेशनात ( Winter session ) औषध खरेदी तसेच उंदीर मारण्यासाठी करण्यात आलेल्या खर्चाची चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत. यामुळे पालिकेतील तत्कालीन सत्ताधारी आणि प्रशासन अडचणीत येण्याची शक्यता आहे.

BMC
मुंबई महापालिका

मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार जाऊन शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आले. त्यानंतर हिवाळी अधिवेशात ( Winter session ) मुंबई महानगरपालिकेच्या कामकाजावर ( BMC Expenditure ) प्रश्न उपस्थित करण्यात आले. यामुळे आता मुंबई महापालिकेच्या कामकाजाची कॅगद्वारे चौकशी ( BMC Expenditure expenditure incurred audit by CAG )

कॅग द्वारे ऑडिट : मुंबई पालिकेवर गेले २५ वर्षे शिवसनेचे राज्य होते. राज्यातही शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आदी पक्षांचे महाविकास सरकार अडीच वर्षे सत्तेवर होते. शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड करून हे सरकार पाडले. त्यानंतर शिंदे यांनी भाजपाच्या सोबत जाऊन सरकार स्थापन केले. पावसाळी अधिवेशनात पालिकेने गेल्या अडीच वर्षात केलेल्या १२ हजार कोटींच्या कामांचे ऑडिट कॅग द्वारे केले जावे, अशी सूचना केंद्र सरकारला करण्यात आली होती. त्यानंतर नोव्हेंबरपासून पालिकेत कॅगद्वारे ऑडिट केले जात आहे. या ऑडिटचे भाजपा, काँग्रेस, समाजवादी आदी पक्षांनी स्वागत केले आहे.

औषध खरेदीची चौकशी : अडीच वर्ष कोरोना विषाणूचा प्रसार असल्याने नागपूर येथे अधिवेशन झाले नव्हते. यंदा नागपूर येथे अधिवेशन सुरू असून त्यात पालिकेच्या इतर करण्यात आलेल्या खर्चावरही आक्षेप घेण्यात आला आहे. पालिकेने कोरोना प्रसारादरम्यान औषधे, मास्क, ग्लोज, पिपीई किट आदी वस्तू जास्त किमतीने घेतल्या. या सर्व खर्चाची चौकशी करण्याची मागणी पालिकेतील भाजपाचे माजी गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली होती. या संदर्भात भाजपा आमदार आशिष शेलार यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

उंदीर मारण्यासाठीच्या खर्चाची चौकशी : मुंबई पालिकेच्या २४ पैकी ५ विभागात उंदीर मारण्याचे कंत्राट दिले. एका वर्षात पालिकेने केवळ ५ वॉर्डमध्ये उंदीर मारले. त्यावर तब्बल १ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या प्रकरणीही भाजपाने पालिकेकडे चौकशीची मागणी केली होती. मात्र पालिकेने त्याकडे दुर्लक्ष करत तात्कालीन स्थायी समिती अध्यक्षांनी हा खर्चाचा प्रस्ताव मंजूर केला होता. या प्रकरणी आशिष शेलार यांनी चौकशीची मागणी केली असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.