ETV Bharat / state

रेल्वेचा विक्रोळी स्थानकात धोकादायक पादचारी पूल; लवकर पाडण्याची प्रवाशांची मागणी - bmc

या घटनेनंतर खबरदारी म्हणून मध्य रेल्वे, पालिका आणि आयआयटी यांच्या संयुक्त तपासणीत पाच पादचारी पूल धोकादायक ठरवले होते.

रेल्वेचा विक्रोळी स्थानकात धोकादायक पादचारी पूल
author img

By

Published : May 10, 2019, 11:33 PM IST

Updated : May 10, 2019, 11:54 PM IST

मुंबई - सीएसएमटी येथे झालेल्या पादचारी पूल दुर्घटनेनंतर मध्य रेल्वेवरील पाच पादचारी धोकादायक पूल 30 एप्रिलपर्यत तोडण्यात येणार होते. प्रत्येक आठवड्याला एक पादचारी पूल मध्य रेल्वेच्या इंजिनिअरींग विभागाकडून तोडण्यात येणार होते. मात्र, एक महिना उलटून गेला तरी रेल्वेकडून विक्रोळी स्थानकामधला पादचारी पूल पाडण्याचे काम पूर्ण झाले नाही. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

रेल्वेचा विक्रोळी स्थानकात धोकादायक पादचारी पूल; लवकर पाडण्याची प्रवाशांची मागणी

सीएसएमटी स्थानकालगतचा पादचारी पूल कोसळल्याने अनेकांना जीव गमवावा लागला होता. या घटनेनंतर खबरदारी म्हणून मध्य रेल्वे, पालिका आणि आयआयटी यांच्या संयुक्त तपासणीत पाच पादचारी पूल धोकादायक ठरवले होते. मध्य रेल्वेच्या मार्गावरील भांडुप स्थानकातील कल्याण दिशेचा, दिवा स्थानकातील ठाणे दिशेचा, विक्रोळीचा सीएसएमटी दिशेचा, कुर्ला स्थानकातील कल्याण दिशेचा आणि कल्याण स्थानकातील पादचारीपुलाचा यात समावेश आहे. पूल जुने झाले असून त्यांना पाडण्यात आले आहे. मात्र, या धोकादायक पुलांमध्ये विक्रोळीचा सीएसएमटी दिशेचा पुलावर अद्याप हातोडा पडलेला नाही.

या धोकादायक पुलाच्या शेजारी नव्या पुलाचे काम सुरू आहे. हे पूर्ण झाल्याशिवाय हा पूल पाडण्यात येणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या नव्या पुलाच्या कामाला तीन महिन्यापेक्षा जास्त कालावधी जावू शकतो यामुळे हा पूल तोपर्यंततरी रहदारीसाठी बंद करावा अशी मागणी आता प्रवाश्यांकडून होत आहे.

जेव्हा ट्रेन या पुलाच्या खालून जाते तेव्हा या पुलाला हादरे बसतात. हा पादचारी पूल अनेक वर्षे जुना आहे. दुसरा पूल जेव्हा बनेल तेव्हा बनेल परंतु हा पूल बंद करण्यात आला पाहिजे असे सामाजिक कार्यकर्ते रॉबर्ट डिसोझा यांनी सांगितले.

Intro:मुंबई

सीएसएमटी येथे झालेल्या पादचारी पूल दुर्घटनेनंतर
मध्य रेल्वेवरील पाच पादचारी धोकादायक पूल 30 एप्रिल पर्यत तोडण्यात येणार होते. दर आठवड्याला एक पादचारी पूल मध्य रेल्वेच्या इंजिनिअरींग विभागाकडून तोडण्यात येणार होत. मात्र एक महिना उलटून गेला तरी रेल्वेकडून विक्रोळी स्थानकातील मधला पादचारी पूल पाडण्याचे काम पूर्ण झाले नाही. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.Body:सीएसएमटी स्थानकालगतचा पादचारी पूल कोसळल्याने अनेकांना जीव गमवावा लागला आहे. या घटनेची खबरदारी म्हणून मध्य रेल्वे, पालिका आणि आयआयटी यांच्या संयुक्त तपासणीत पाच पादचारी पूल धोकादायक ठरवले होते. मध्य रेल्वेच्या मार्गावरील भांडुप स्थानकातील कल्याण दिशेचा, दिवा स्थानकातील ठाणे दिशेचा, विक्रोळीचा सीएसएमटी दिशेचा, कुर्ला स्थानकातील कल्याण दिशेचा आणि कल्याण स्थानकातील पादचारीपुलाचा यात समावेश आहे. पुल जुने झाले असून त्यांना पाडण्यात आले आहे. मात्र या धोकादायक पुलांमध्ये विक्रोळीचा सीएसएमटी दिशेचा पुलावर अद्याप हातोडा पडलेला नाही.

या धोकादायक पुलाच्या शेजारी नव्या पुलाचे काम सुरू आहे. हे पूर्ण झाल्याशिवाय हा पूल पाडण्यात येणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या नव्या पुलाच्या कामाला तीन महिन्यापेक्षा जास्त कालावधी जावू शकतो यामुळे हा पूल तिथपर्यत तरी रहदारीसाठी बंद करावा अशी मागणी आता प्रवाश्यांकडून होत आहे.

जेव्हा ट्रेन या पुलाच्या खालून जाते तेव्हा इथे हादरे बसतात. हा पादचारी पूल अनेक वर्षे जुना आहे. दुसरा पूल जेव्हा बनेल तेव्हा बनेल परंतु हा पूल बंद करण्यात आला पाहिजे असे सामाजिक कार्यकर्ते रॉबर्ट डिसोझा यांनी सांगितले.Conclusion:
Last Updated : May 10, 2019, 11:54 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.