ETV Bharat / state

Breaking : रजनी पाटील यांना राज्यसभेसाठी उमेदवारी, राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त होती जागा

breaking
breaking
author img

By

Published : Sep 20, 2021, 8:21 AM IST

Updated : Sep 20, 2021, 6:25 PM IST

17:50 September 20

रजनी पाटील यांना राज्यसभेसाठी उमेदवारी, राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त होती जागा

नवी दिल्ली - रजनी पाटील यांना काँग्रेसकडून राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. राजीव सातव यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती.

17:39 September 20

पोर्नोग्राफी प्रकरणात उद्योगपती राज कुंद्राला जामीन मंजूर

मुंबई - पोर्नोग्राफी प्रकरणात उद्योगपती राज कुंद्राला जामीन मंजूर करण्यात आला आहे.

17:20 September 20

चेन्नई येथून अपहरण झालेल्या चिमुकल्याची नागपूर लोहमार्ग पोलिसांनी केली सुटका

नागपूर - चेन्नई येथून अपहरण झालेल्या एका ४ वर्षीय चिमुकल्याची नागपूर लोहमार्ग पोलिसांनी सुखरूप सुटका केली आहे. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. मोनु गरीबदास केवट (२६) आणि शिब्बु गुड्डु केवट (२२) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत. नागपूर लोहमार्ग पोलिसांच्या सतर्कतेने अपहरण झालेल्या चिमुकल्याची सुटका करण्यात आली आहे.

15:08 September 20

नाशकात आठ महिन्यात 17 खून, 56 बलात्काराच्या घटना

नाशिक - शहरात मागील 8 महिन्यात 17 खून, 56 बलात्कार, 62 महिलांचे विनयभंग, 52 चेन स्नॅचिंगसह वाहन चोरी, हाणामाऱ्यांच्या घटना वाढल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक कमी झाल्याने गुन्हेगारी वाढल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

13:53 September 20

मुंबई -

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) काल रात्री गोरेगावात छापा टाकून नायजेरियन ड्रग पेडलरला अटक केली. त्याच्या ताब्यातून 5 लाख रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त केले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले आहे.

13:50 September 20

गोवा -

भाजप किरीट सोमय्या यांच्यावरील कारवाईवर देवेंद्र फडणवीसांची टीका

किरीट सोमय्या यांच्यावरील कारवाईने कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे

भ्रष्टाचाराविरुध्द लढणाऱ्या सोमय्या यांच्या विरोधात होत असलेली कारवाई महाराष्ट्रात नव्हे तर भरतातही अशा प्रकारची घटना यापूर्वी कधीही घडली नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते सध्या गोवा दौऱ्यावर आहेत.

12:30 September 20

मुंबई -

वर्सोवा येथील गणपती विसर्जनावेळी बुडालेल्या एका मुलाचा मृत्यू

मुंबईच्या वर्सोवा जेट्टी येथे विसर्जन करताना 5 मुले गेली होती वाहून

त्यातील 2 जणांना वाचवून रुग्णालयात पाठवले

आज एका मुलाला शोधण्यात यश

रुग्णालयात पाठवले असता त्याचा मृत्यू झाल्याची माहिती

12:11 September 20

पंजाबचे नवे मुख्यमंत्री म्हणून चरणजीत सिंह चन्नी यांनी घेतली शपथ

अमरिंदर सिंह यांनी राजीनामा दिल्याने चरणजीत हे पंजाबचे नवे मुख्यमंत्री बनले

12:03 September 20

मुंबई -

अभिनेत्री कंगना राणौत अंधेरी कोर्टात हजर

पुढील सुनावणी 15 नोव्हेंबरला

आज कोर्टात हजर न राहिल्यास कंगना विरोधात निघणार होते अटक वॉरंट

गीतकार जावेद अख्तर यांनी मानहाणी प्रकरणी कंगनाला खेचले आहे कोर्टात

त्या प्रकरणाची सुनावणी झाली

यापूर्वीच्या सुनावणीला ती हजर न राहिल्याने कोर्टाने तिच्याविरोधात अटक वॉरंट करण्याचा सूचक इशारा दिला होता

10:51 September 20

भिवंडी -

भिवंडी ते ठाणे रस्त्यावरील टोल नाका अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेना कार्यकर्त्यांनी फोडला.

1 सप्टेंबर रोजी टोल नाक्यावर श्राद्ध आंदोलन घालीत रस्त्याची दुरुस्ती करावी अन्यथा टोल वसुली बंद करण्याची मागणी केली होती.

भिवंडी-ठाणे रस्त्यावरील खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळण झाली आहे.

यापूर्वी 20 ऑगष्ट रोजी खारबाव कामण रस्त्यावरील टोल नाक्याची तोडफोड मनसे कार्यकर्त्यांनी केली होती.

10:19 September 20

मुंबई -

कुणी कितीही आरोप केले तरी महाराष्ट्र सरकार झुकणार नाही, असे खासदार संजय राऊतांनी म्हटले आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

10:08 September 20

मुंबई

भाजप नेते किरीट सोमय्यांच्या आरोपांनंतर शिवसेना खासदार संजय राऊतांची पत्रकार परिषद सुरू

09:54 September 20

कंगना आज कोर्टात हजर न राहिल्यास अटक वॉरंट निघण्याची शक्यता

गीतकार जावेद अख्तर यांनी अभिनेत्री कंगना रानावत विरोधात मानहाणीचा दावा दाखल केला आहे. या प्रकरणी कंगनाला वेळोवेळी नोटीस बजावली आहे. तरीही ती कोर्टात हजर झाली नसल्याने आज २० सप्टेंबरला कोर्टात हजर झाली नाही तर आम्ही अटक वॉरंट काढू, असा अंधेरी कोर्टाकडून कंगणाला सूचक इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे आज कंगना कोर्टात हजर न राहिल्यास तिच्या विरोधात कोर्टाकडून अटक वॉरंट काढले जाण्याची शक्यता आहे.

09:29 September 20

नागपूर -

कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी नागपूर तयार आहे का? याविषयावर एक संयुक्त चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. प्राजक्ता वर्मा, नागपूर विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी श्रीमती विमला आर., महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी., अमितेश कुमार, पोलीस आयुक्त आणि पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या उपस्थितीत २० सप्टेंबरला सकाळी १० वाजता हॉटेल सेंटर पॉईंट रामदासपेठ येथे हा कार्यक्रम होणार आहे.

09:07 September 20

पंजाबचे नवे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी आज शपथ घेणार

पंजाबचे नवे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी आज शपथ घेणार, 

आज सकाळी 11 वाजता शपथविधी होणार,

शपथविधीपूर्वी चरणजीत सिंह चन्नी रुपनगरमधील गुरुद्वारामध्ये प्रार्थना करणार

07:56 September 20

BIG BREAKING

वर्सोवा बीचवर गणपती विसर्जनादरम्यान 5 मुले अचानक समुद्रात बुडाली. त्यापैकी 2 मुलांना वर्सोवा पोलीस ठाण्याच्या कॉन्स्टेबलने सुखरूप बाहेर काढले. तर तीन मुले अद्याप बेपत्ता आहेत. चार तासांहून अधिक काळ उलटला आहे. तरीही पाण्यात बुडालेल्या तीन मुलांचा शोध सुरू आहे. समुद्रात बुडालेली तीनही मुले वर्सोवा गावाजवळची रहिवासी आहेत. ज्यांचे वय 18 ते 22 वर्षांच्या दरम्यान सांगितले जात आहे.

बेपत्ता मुलांची नावं -

1. विजय पाटील

2. शुभम

3. अक्षय तावडे (असेही समजते)

तर शिवम आणि विजय अशी कॉन्स्टेबलने वाचवलेल्या 2 मुलांची नावे आहेत.

Last Updated : Sep 20, 2021, 6:25 PM IST

For All Latest Updates

TAGGED:

Breaking
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.