ETV Bharat / state

लग्नाचा हट्ट धरणाऱ्या प्रियसीला दिले विषारी इंजेक्शन; प्रियकराला पोलीस कोठडी

२९ मेला एका महिलेचा मृतदेह नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात असणाऱ्या कोल्ही-कोपर परिसरात आढळून आला होता. त्यानंतर तूरमाळे गावाच्या हद्दीत संबंधित महिलेचे पॅन कार्ड, कपडे, पर्स इत्यादी सामान असल्याची पिशवी एका रिक्षाचालकाला आढळून आली होती. याप्रकरणी अधिक चौकशी दरम्यान आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

boyfriend killed his girlfriend in new mumbai
प्रियकराने लग्नाचा अट्टाहास धरणाऱ्या प्रेयसीला मारले ठार
author img

By

Published : Jun 1, 2021, 8:22 AM IST

Updated : Jun 1, 2021, 1:06 PM IST

नवी मुंबई - प्रियसी लग्नाचा सतत हट्ट धरते व वाद घालते, म्हणून एका व्यक्तीने त्याच्या प्रियसीला विषारी इंजेक्शन देऊन ठार मारल्याची घटना येथे घडली आहे. याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी आरोपी चंद्रकांत गायकर याला अटक केले आहे.

बहिणीच्या मृत्यू संदर्भात केला होता संशय व्यक्त -

२९ मेला एका महिलेचा मृतदेह नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात असणाऱ्या कोल्ही कोपर परिसरात आढळून आला होता. त्यानंतर तूरमाळे गावच्या हद्दीत संबंधित महिलेचे पॅन कार्ड, कपडे, पर्स इत्यादी सामान असल्याची पिशवी एका रिक्षाचालकाला आढळून आली होती. अधिक तपास केला असता हा मृतदेह पनवेल तालुक्यातील नानोशी गावच्या रमेश ठोंबरे यांच्या बहिणीचा असल्याची समजले. ठोंबरे यांनी बहिणीच्या मृत्यू संदर्भात संशय व्यक्त केला होता. अधिक चौकशी दरम्यान आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

वॉर्डबॉय सोबत प्रेमसंबंध -

संबधित मृत महिलेचे तुरमाळे गावच्या चंद्रकांत गायकर (३६) या वॉर्डबॉयसोबत प्रेमसंबंध असल्याची संबंधित मृत महिलेच्या भावाने सांगितले व त्यांचे काही दिवसांपूर्वी वाद झाल्याची देखील माहिती दिली.

ओळख पटू नये म्हणून केले हे कृत्य -

आरोपी चंद्रकांत गायकर याच्या पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याने संबंधित महिलेसोबत सहा महिन्यांपूर्वीपासून प्रेमसंबंध असल्याची कबुली दिली. तसेच तिला गंभीर आजार असून देखील ती आरोपी चंद्रकांत याला तिच्यासोबत सोबत लग्न करावे म्हणून अट्टाहास करत होती. शिवाय त्यावरून त्यांच्यात सतत वाद होत होते. त्यामुळे संबंधित महिलेला संपविण्याच्या उद्देशाने पूर्वनियोजित कट करून तिला नियोजित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात बोलावले. व आजारातून बरे होण्यासाठी इंजेक्शन देत असल्याचे सांगितले. तिला ४ इंजेक्शन देऊन त्यानंतर तिला विषारी इंजेक्शन देऊन ठार मारले. तिची ओळख पटू नये म्हणून तिचे कपडे व मोबाईल काढून घेऊन फरार झालो असल्याची कबूली आरोपीने दिली आहे.

आरोपीला पोलीस कोठडी -

३१ मे ला आरोपी चंद्रकांत गायकर याला पनवेल शहर पोलिसांनी अटक केली असून त्याला पाच जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

हेही वाचा - बेवारस कोविड मृतांना माती द्यायला गेला; अन् समोर आला आपल्याच आईचा मृतदेह!

Last Updated : Jun 1, 2021, 1:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.