ETV Bharat / state

धक्कादायक! मोबाईलवर सतत गेम खेळत असल्यानं रागावले वडील; मुलानं संपवलं जीवन - व्हिडिओ गेम

Boy Commits Suicide : आजकालच्या मुलांना मोठ्या प्रमाणात मोबाईलचं व्यसन लागलंय. मुंबईतील मालवणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोबाईलवर गेम खेळताना वडील रागावल्यानं एका 16 वर्षीय मुलानं आत्महत्या केलीय.

Boy Commits Suicide
संग्रहित छायाचित्र
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 18, 2023, 7:46 AM IST

मुंबई Boy Commits Suicide : मोबाईलवर सतत गेम खेळत असल्यानं वडिलांनी रागवल्यानं 16 वर्षीय मुलानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. याप्रकरणी मुंबईतील मालवणी पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आलीय.

रात्री वडील रागवल्यानं उचललं टोकाचं पाऊल : मालवणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इयत्ता 11 वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यानं यापूर्वीही गेम खेळण्यापासून रोखल्यास स्वत:चं नुकसान करण्याची धमकी घरच्यांना दिली होती. या मुलाला मोबाईलवर ऑनलाइन गेम खेळण्याचं व्यसन होतं. गुरुवारी रात्री वडिलांनी त्याला शिवीगाळ करुन त्याचा फोन हिसकावून घेतला. यानंतर शुक्रवारी सकाळी ८ च्या सुमारास कुटुंबीयांना त्याचा मृतदेह स्वयंपाकघरात आढळला. वडिलांनी तात्काळ मुलाला खासगी रुग्णालयात नेलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. त्यानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी बोरिवली येथील भगवती रुग्णालयात पाठवण्यात आला आणि नंतर कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला.

मालवणी पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद : या प्रकरणी मालवणी पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आलीय. मालवणी पोलिसांनी सांगितलं की, कुटुंबीयांचे जबाबही नोंदवले आहेत. क्षुल्लक कारणामुळं 16 वर्षीय मुलानं आपला जीव संपवल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. वडिलांनी आपल्या मुलाच्या चांगल्यासाठीच मोबाईलवर गेम खेळण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला होता. मात्र उलटच घडलं. कुटुंबीयांना मुलाच्या आत्महत्यामुळं धक्का बसला आहे.

आजकाल मोबाईलचं व्यसन : मोबाईल किंवा व्हिडिओ गेम खेळताना कितीही मजा येत असली, तरी हे व्यसन चांगलं नाही. पालकांनी मुलांच्या मोबाईल गेम खेळण्यावर नियंत्रण आणायला हवं. मुळात लहान वयात मोबाईलची सवय लावू नये. मूल रडू लागल्यावर पालक मोबाईल देतात. परंतु, ही कृती पुढं त्रासदायक ठरू शकते. मुलांना मोबाईल तसंच गेम्सपासून लांब ठेवणं खूपच कठीण होऊन जातं. मुलांच्या गेम खेळण्यावर पूर्णपणे बंदी आणता येणार नाही, पण त्यावर नियंत्रण नक्कीच आणता येईल. आजकाल अनेक मुलं मोबाईल दिल्याशिवाय जेवण करत नाहीत. त्यांना दिवसभर मोबाईल हवा असतो. यामुळे चीड चीड होणं, स्वस्थ झोप न लागणं अशा अनेक त्रासांना लहान मुलांना सामोरं जावं लागतं. वेळीच पालकांनीही आवर न घातल्यानं मूल सुद्धा मग ऐकून घेत नाही आणि नाइलाजानं पालकांना त्याचा हट्ट पुरवावा लागतो, ही आजची स्थिती झाल्याचं मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

हेही वाचा :

  1. Pakistani Player Suicide : नैराश्याने ग्रस्त पाकिस्तानी स्नूकर खेळाडूची आत्महत्या; लाकूड कापण्याच्या मशीनने संपवले जीवन
  2. Student Suicide : नांदेडच्या विद्यार्थ्याची साताऱ्यात गळफास घेऊन आत्महत्या

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.