ETV Bharat / state

मंत्रालयात गटारी? दारूच्या बाटल्यांप्रकरणाची 15 दिवसात चौकशी करा- प्रवीण दरेकर - मुंबई मंत्रालय

राज्यातील जनतेसाठी जेथे महत्त्वाचे निर्णय घेतले जातात. त्या मंत्रालयातच आता दारूच्या बाटल्या आढळल्या आहेत. त्यामुळे विरोधकांनी आता ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. या प्रकरणाची 15 दिवसात चौकशी करा, अशी मागणी प्रवीण दरेकरांनी केली आहे.

mumbai
mumbai
author img

By

Published : Aug 10, 2021, 5:39 PM IST

मुंबई - मंत्रालयात दारूच्या बाटल्यांचा खच पाहायला मिळाला आहे. ही महाराष्ट्रातील परंपरेला काळीमा फासणारी घटना आहे. या दारूच्या बाटल्या मंत्रालयात आल्याच कशा? याची चौकशी करून दोषींवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली. तसेच या गंभीर प्रकरणाची अप्पर मुख्य सचिव (गृह) यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करुन १५ दिवसांच्या आत उच्चस्तरिय चौकशी करण्याची मागणीही दरेकर यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे.

मंत्रालयात सापडल्या दारूच्या बाटल्या

चीड, शरम आणणारी घटना - दरेकर

प्रवीण दरेकर

'राज्याचा गाडा ज्या मंत्रालयातून हाकला जातो, तेथे जर सर्वसामान्यांना प्रवेश करायचा असेल तर येथील सुरक्षा यंत्रणांचा सामना करावा लागतो. मंत्रालयात जाणाऱ्या प्रत्येकाची कसून चौकशी केली जाते. मात्र, मंत्रालयाची सुरक्षा यंत्रणा भेदून या दारूच्या बाटल्या आत गेल्याच कशा', असा सवाल दरेकरांनी उपस्थित केला आहे. 'दारूच्या बाटल्या मंत्रालयामध्ये मिळणे ही दुर्दैवी, चीड आणणारी व शरम आणणारी अशी घटना आहे', अशी टीका दरेकर यांनी केली.

दरेकरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

प्रवीण दरेकरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
प्रवीण दरेकरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

या गंभीर प्रकरणासंदर्भात दरेकर यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र दिले आहे. 'मंत्रालायात आपले प्रश्न सोडविण्यासाठी दर दिवशी हजारो नागरिक मंत्रालायत येत असतात. पण या नागरिकांना मंत्रालय प्रवेशासाठी सुरक्षेच्या कारणास्तव अडवणूक केली जाते. त्यांच्याकडील सर्व सामानाची काटेकोरपणे तपासणी केली जाते. त्यानंतरही त्यांना सुरक्षेच्या कारणास्तव कधी-कधी प्रवेश नाकारण्यात येतो. सामान्य नागरिकांच्या बाबतीत एवढी दक्षता घेतली जात असताना मंत्रालय उपहारगृह परिसरापर्यंत मात्र दारुच्या बाटल्या सर्रासपणे कशा पोहचतात?', असा सवालही दरेकर यांनी या पत्रात उपस्थित केला आहे.

15 दिवसात चौकशी करा - दरेकर

मंत्रालयात दारूच्या बाटल्या सापडल्या आहेत. त्यामुळे या घटनेवरून विरोधक आक्रमक झाले आहेत. प्रवीण दरेकरांनी सरकारवर टीका केली आहे. शिवाय आता पत्र लिहिले आहे. 'या गंभीर प्रकरणाची 15 दिवसांच्या आत उच्च स्तरिय चौकशी करावी', अशी मागणी दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्रातून केली आहे.

मंत्रालयात गटारी ?

गटारी रविवारी (8 ऑगस्ट) झाली. यानिमित्ताने पार्टी करण्यासाठी दारू आणली गेली असेल, अशी चर्चा आता रंगू लागली आहे. शिवाय, सुरक्षाव्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. वाचा गटारी संबंधीच्या बातम्या

हेही वाचा - पुण्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा विद्यापीठ : क्रीडा मंत्री सुनिल केदार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.