ETV Bharat / state

LIC Loan Fraud Case: सख्ख्या बहिणीला न कळविता तिच्या नावे घेतले कर्ज; बहीण-भावंडाला दोन वर्षांची शिक्षा

सख्ख्या बहिणीच्या नावे एलआयसीचे कर्ज काढून तिची फसवणूक करणाऱ्या बहीण-भावंडाला मुंबई न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. कुसुम हरसोरा असे पीडितेचे नाव आहे. बहीण अनिता हरसोरा आणि भाऊ प्रदीप हरसोरा यांनी तिला फसवले होते. यासंदर्भात पीडितेने मुंबई महानगर दंडाधिकारी न्यायालयात खटला दाखल केला होता. तब्बल 19 वर्षानंतर तिला न्याय मिळाला.

LIC Loan Fraud Case
मुंबई न्यायालय
author img

By

Published : May 1, 2023, 5:51 PM IST

मुंबई: कुसुम हरसोरा ही पायलट म्हणून नोकरी करते. बहिणीने आणि भावाने तिला न कळवता तिच्या नावावर 1 लाख 70 हजार रुपयांचे एलआयसी विम्यावर कर्ज उचलले; एलआयसी कडून पत्र आले त्यावेळेस कुसुम हरसोरा हिच्या लक्षात आले की, आपला भाऊ प्रदीप आणि बहीण अनिता यांनी आपल्या सहीची नक्कल करत पॉलिसीवर कर्ज घेतले आहे.

न्यायालयाचे मत: या खटल्याच्या सुनावणी वेळी महानगर दंडाधिकारी न्यायमूर्ती नदीम पटेल यांनी अधोरेखित केले की, कुसुम हरसोरा हिची बहिण अनिता, तिचा भाऊ प्रदीप तसेच कर्मचारी प्रशांत पारेख यांनी एकत्रितपणे हा बनाव रचला. कुसुमच्या नावे खोटी सही केली. त्यामुळे हा गुन्हा भारतीय दंड विधान कलम 420 आणि 471 यानुसार शिक्षेला पात्र आहेत; कारण यांना पूर्ण कल्पना होती की, ते जे कार्य करत आहेत ते बेकायदेशीर आहे. तरीही त्यांनी तसे कृत्य केल्यामुळे त्यांना तुरुंगवासाची शिक्षा भोगावीच लागणार.

काय होते संपूर्ण प्रकरण? कुसुम हरसोरा हिने एलआयसी पॉलिसी काढली होती. त्याची संपूर्ण रक्कम 6 लाख 50 हजार रुपये इतकी होती. कुसुमला फसवून बहीण अनिता व भाऊ प्रदीप यांनी 1 लाख 70 हजार रुपयांचे कर्ज उचलले होते. वीस वर्षांपासून हा खटला मुंबई मेट्रोपॉलिटीन न्यायालयात प्रलंबित होता; मात्र आता कुसुम हरसोरा हिला न्यायालयाकडून न्याय मिळाला आणि फसवणाऱ्या बहीण-भावंडाला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली गेली.

एलआयसी कर्मचारीही दोषी : एलआयसी मधील एक कर्मचारी प्रशांत पारेख याने देखील बनावट सही करताना मदत केली होती. तसेच पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतरही पोलिसांनी याबाबत दुर्लक्ष केले होते; मात्र मेट्रोपॉलिटीन न्याय दंडाधिकारी यांनी कुसुम हरसोरा यांच्या बाजूने निकाल देत त्यांना अखेर न्याय मिळवून दिला. विम्याच्या नावाखाली बनावटी स्वाक्षरी करून कर्ज उचलण्याचे प्रकार यापूर्वीही उघडकीस आले आहेत.

हेही वाचा: Umesh Pal Murder Case : गुड्डू मुस्लिम आता दिल्ली पोलिसांच्या रडारवर; घरावर चालणार बुलडोजर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.