ETV Bharat / state

रेल्वे कर्मचाऱ्याने विद्याविहार रेल्वे स्थानकातील कार्यालयात घेतला गळफास - Mumbai breaking news

मुंबईतील विद्याविहार रेल्वे स्थानकात कार्यरत असलेले बुकिंग हेड सुपरवायझरने कार्यालयात गळफास घेत आत्महत्या केली आहे.

कैलास कदम
कैलास कदम
author img

By

Published : Jan 7, 2021, 5:07 PM IST

Updated : Jan 7, 2021, 6:40 PM IST

मुंबई - विद्याविहार रेल्वे स्थानकात कार्यरत असलेले बुकिंग हेड सुपरवायझरने गुरुवारी (दि. 7 जाने.) सकाळी त्यांच्या कार्यालयातच गळफास घेत आत्महत्या केली आहे. कैलास कदम, असे त्या अधिकाऱ्याचे नाव आहे.

विद्या विहार रेल्वे स्थानक

कार्यालयातच वायरीच्या सहायाने घेतला गळफास

गुरुवारी (दि. 7 जाने.) सकाळी ते 9 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या विद्याविहार रेल्वे स्थानक येथील कार्यालयात आले होते. त्यानंतर त्यांनी त्यांच्या कार्यालयाचा दरवाजा बंद करून घेतला. काही वेळाने कार्यालयात वायरीच्या सहायाने गळफास घेतला.

इतर अधिकाऱ्यांच्या लक्षात आाला प्रकार

काही वेळाने इतर अधिकाऱ्यांनी जेव्हा त्यांचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना ते गळफास लावलेल्या स्थितीत आढळले. त्यांनी तत्काळ याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर घाटकोपर पोलीस घटनास्थळी दाखल झाले व मृतदेह ताब्यात घेऊन राजावाडी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. त्यांनी आत्महत्या का केली याचा शोध पोलीस घेत आहेत.

हेही वाचा - शिवसेनेने सत्तेची लाचारी सोडल्यानंतरच औरंगाबादचे नामकरण शक्य - संदीप देशपांडे

हेही वाचा - विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर रेल्वे प्रशासनाची कारवाई; दोन कोटींचा दंड वसूल

Last Updated : Jan 7, 2021, 6:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.