मुंबई: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याची घोषणा राणा दाम्पत्याने केली होती. कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी राणा दाम्पत्याच्या विरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्या संदर्भात मुंबईच्या विशेष न्यायालयामध्ये आज 22 फेब्रुवारी रोजी महत्त्वाची सुनावणी होती. मात्र सुनावणी आता पुढे ढकलण्यात आली आहे.
दोषमुक्त करण्याची मागणी: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खासगी निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याचा जो चंग बांधला होता. त्यातून वाद उभा राहिला होता. हनुमान चालिसा प्रकरणातून आम्हाला दोषमुक्त करा, अशी मागणी खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी विशेष न्यायालयात अर्जाद्वारे केली. न्यायालयाने त्यांच्या अर्जावर पोलिसांना फेब्रुवारीपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर 22 फेब्रुवारी रोजी आज त्यासंबंधीची सुनावणीची तारीख निश्चित केली गेली होती.
राणा दाम्पत्याला दिलासा: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याची घोषणा राणा दाम्पत्याने केली होती. त्यांच्या ह्या सार्वजनिकरित्या चेतवणाऱ्या भाषेमुळे दोन्ही बाजूकडील कार्यकर्ते इर्षेला पेटले होते. परिणामी मुंबई पोलिसांनी नवनीत राणा व रवी राणा ह्या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्या संदर्भात आज विशेष न्यायालयामध्ये सुनावणीची तारीख निश्चित झाली होती. मात्र विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती रोकडे आज अनुपस्थित असल्यामुळे आजची सुनावणी पुढे ढकलली गेली. त्यामुळे आजची तारीख पुढे ढकलण्यामुळे नवनवीन राणा यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.
राणा दाम्पत्यावरील आरोप: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याची घोषणा राणा दाम्पत्याने केली होती. असे करून, राणा दाम्पत्याने कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी, पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी राणा दाम्पत्य सध्या जामिनावर बाहेर आहेत. याप्रकरणी दोघांविरोधात आरोपपत्र दाखलही करण्यात आले आहे.
काय आहे प्रकरण: महाविकास आघाडी सरकारमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या खासगी बंगल्यावर हनुमान चालीसा पठण करण्याबाबतचा निर्णय खासदार नवनीत राणा व पती आमदार रवी राणा यांनी जाहीर केला होता. त्यांनी हा निर्णय सार्वजनिक रित्या जाहीर केल्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी हनुमान चालीसा पठण कार्यक्रम सुरू झाला. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या राहत्या घरी देखील त्यांनी हनुमान चालीसा पठण करायला येत आहोत, असे सार्वजनिक रित्या प्रसिद्ध केल्यामुळे वातावरण बिघडले. परिणामी दोन्ही बाजूनी वाद झाला. त्या अनुषंगाने मुंबई पोलिसांनी नवनीत राणा व रवी राणा यांच्या या हनुमान चालीसा पठणामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडते या कारणास्तव तक्रार दाखल केली होती.
हेही वाचा: Sanjay Raut News : संजय राऊतांविरोधात गुन्हा दाखल! ठाणे पोलिसांकडून जबाब नोंदवण्यास सुरुवात