ETV Bharat / state

अर्णब गोस्वामी यांचा न्यायालयीन कोठडीतील मुक्काम वाढला; उच्च न्यायालयाने राखून ठेवला निर्णय - अर्णब गोस्वामी लेटेस्ट न्यूज

अर्णब गोस्वामी यांच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस.एस शिंदे व एस.एम कर्णिक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. सर्व पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने अर्नब गोस्वामी यांच्या जामीन अर्जावर निर्णय राखून ठेवला

अर्णब गोस्वामी
अर्णब गोस्वामी
author img

By

Published : Nov 7, 2020, 6:58 PM IST

मुंबई - वास्तु रचनाकार अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात रायगड पोलिसांनी रिपब्लिकन वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक केली. अर्णब गोस्वामी यांच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस.एस शिंदे व एस.एम कर्णिक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान मुंबई पोलिसांतर्फे देवदत्त कामत, नाईक कुटुंबीयांतर्फे सुबोध देसाई व शिरीष गुप्ते तर अर्णब गोस्वामी यांच्यातर्फे हरीश साळवे व आबाद पोंडा यांच्याकडून युक्तिवाद करण्यात आला होता. या सर्व पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने अर्नब गोस्वामी यांच्या जामीन अर्जावर निर्णय राखून ठेवला. येणाऱ्या काही दिवसात याबद्दल निर्णय दिला जाईल, असे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एस.एस शिंदे व एस.एम कर्णिक यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले आहे. यामुळे अर्णब गोस्वामी यांचा न्यायालयीन कोठडीतील मुक्काम वाढला आहे.

शिरीष गुप्ते यांचा युक्तीवाद -

अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील शिरीष गुप्ते यांनी युक्तिवाद करताना म्हटलं की, या प्रकरणांमध्ये जामिनासाठी याचिका दाखल करणाऱ्यांनी ( अर्णब गोस्वामी ) पीडित कुटुंबियातील अक्षता नाईक यांना या संदर्भात प्रतिवादी करण्याचं विचार केलेला नव्हता. मात्र, कोर्टाच्या निर्देशानंतर यामध्ये आम्हाला प्रतिवादी करण्यात आले आहे. अन्वय नाईक यांच्या मृत्यू संदर्भातील प्रकरणाचा तपास करत असताना क्लोजर रिपोर्टबद्दल नाईक कुटुंबीयांना कुठलीही माहिती देण्यात आलेली नव्हती. एका महिलेने तिचा पती गमावला. मात्र, त्याच्या क्लोजर रिपोर्ट संदर्भातील बातम्या या नाईक कुटुंबियांना मीडियामधूनच मिळाल्या होत्या. यासंदर्भात पीडित कुटुंबीयांना किती मोठे नुकसान सहन करावे लागले आहे, याचा आपण विचार केलाय का? या प्रकरणांमध्ये अर्णब गोस्वामी यांना जामीन दिल्यास पीडित कुटुंबासोबत अन्याय झाल्यासारखे होईल.

या प्रकरणाचे मुंबई पोलिसांशी संबंध नाही -

मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या तर्फे देवदत्त कामत हे युक्तिवाद करताना म्हटले आहे की, यासंदर्भात प्रतिवादी करण्यात आलेले परमवीर सिंग हे मुंबई पोलीस आयुक्त आहेत. प्रतिवादी म्हणून त्यांचे नाव काढून टाकण्यात यावे, हे प्रकरण रायगड पोलिसांच्या अंतर्गत असून यामध्ये कुठल्याही प्रकारे मुंबई पोलिसांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आलेली नाहीये. मुंबई पोलीस आयुक्तांना या प्रकरणांमध्ये प्रतिवादी करणं हे निरर्थक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. अॅड. देवदत्त कामत यांनी त्यांचे युक्तिवाद यामध्ये म्हटले आहे की, एखाद्या गोष्टीत आरोप करताना काही जबाबदारी सुद्धा असते. हे कुठलं टीव्ही चॅनल नाहीये, तर संविधानिक आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.