मुंबई : आयसीआयसीआय बँक घोटाळा प्रकरणात ( ICICI Bank scam case) चंदा कोचर यांनी सीबीआयने केलेली अटक ही बेकायदेशीर असल्याचे म्हणत उच्च न्यायालयात ( Bombay High Court ) याचिका दाखल केली होती. या याचिकेवर तातडीने सुरुवणे घेण्याची मागणी करत अंतरिम दिलासा ( Kochhar couple plea for interim relief ) देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र सुट्टीकालीन कोर्टाने कोचर दांपत्य यांची ही मागणी फेटाळून लावली ( Bombay High Court reject the Kochhar couple plea ) असल्याने कोचर दांपत्यना मोठा धक्का बसला आहे. कोचर दाम्पत्य यांची उद्या सीबीआयला देण्यात आलेली कोठडी संपणार असल्याने उद्या त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
तीन दिवसांची सीबीआय कोठडी : आयसीआयसी बँकेच्या माजी एमडी चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर आणि वेणूगोपाल धूत यांना आज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टाने 3 दिवसाची सीबीआय कोठडी दिली आहे. चंदा कोचर, दीपक कोचर यांना सीबीआयने दिल्लीतून शुक्रवार रात्री अटक केल्यानंतर आज या प्रकरणात तिसरी अटक वेणूगोपाल धूत यांना करण्यात आली आहे या ठिकाण नाही आज न्यायालयात हजर केल्यानंतर पुन्हा तीन दिवसाची सीबीआय कोठडी रवानगी करण्यात आली आहे.
पदाचा गैरवापर केल्याचा आरोप : 2009 मध्ये 300 कोटी रुपयांच्या व्हिडीओकॉन कर्ज घोटाळा प्रकरणात दोघांना अटक झाली होती. मात्र गेल्यावर्षी त्यांची जामिनावर सुटका झाली. मुंबई सीबीआय कोर्टात हजर करण्यात आले. याआधी दोघांनाही ईडीने अटक केली होती. ईडीकडूनही याप्रकरणी चौकशी सुरू असून सप्टेंबर 2020 मध्ये दीपक कोचर यांना अटक करण्यात आली होती. मनी लाँडरिंगच्या आरोपाखाली ही अटक झाली होती. व्हिडीओकॉन कर्ज प्रकरणात आयसीआयसीआय बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांना मोठा हादरा बसला असून सीबीआयने चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना अटक केली आहे. चंदा कोचर यांनी पती दीपक कोचर यांना फायदा मिळवून देण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप आहे.
काय आहे प्रकरण : चंदा कोचर या आयसीआयसीआय बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी असताना बँकेने व्हिडीओकॉन समूहाला 3 हजार 250 कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. एप्रिल 2012 मध्ये हे कर्ज दिले गेले होते. यातील 2 हजार 810 कोटी रुपयांचे कर्ज थकीत होते आणि 2017 मध्ये ते बुडीत कर्ज म्हणून जाहीर केले गेले होते. याप्रकरणी सीबीआयकडून चौकशी सुरू होती. त्यानंतर आज अटकेची कारवाई करण्यात आली. चंदा कोचर यांनी बँकेचे धोरण आणि नियम मोडून व्हिडीओकॉन समूहाला कर्ज मंजूर केल्याचा आरोप आहे. व्हिडीओकॉनचे एक भागधारक अरविंद गुप्ता यांनी याबाबत पत्र लिहून पंतप्रधान, रिझर्व्ह बँक आणि सेबीकडे तक्रार केली होती.
चंदा कोचर यांची कारकीर्द : 1984 मध्ये ट्रेनी व्यवस्थापक म्हणून आयसीआयसीआय बँकेत रुजू झालेल्या चंदा कोचर यांचा यशाचा आलेख चढता राहिला. उपमहाव्यवस्थापक, महाव्यवस्थापक, कार्यकारी संचालक, कॉर्पोरेट बिझनेस हेड, मुख्य वित्त अधिकारी अशा विविध पदांवर काम केल्यानंतर 2009 मध्ये त्या बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महाव्यवस्थापक बनल्या होत्या.