मुंबई: पीडित मुलाचा अपघातामध्ये गुढ मृत्यू झाला आहे. त्यामुळे चौकशी व्हावी यासंदर्भात याचिका पीडित मुलाच्या नातेवाईकाने दाखल केली होती. याची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती हे एस गडकरी आणि न्यायमूर्ती प्रकाश डी नाईक यांच्या खंडपीठाने पुरण पोलीस ठाण्याला आदेश दिले. या संदर्भात घटनेची कालबद्ध पद्धतीने चौकशी करावी. तसेच ही चौकशी नियमानुसार करून त्याचा अहवाल देखील न्यायालयाला सादर करावा असे देखील आदेश न्यायालयाने दिले.
प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश: लहान मुलावर ज्याने लैंगिक अत्याचार केला त्या संशयित आरोपीचे नाव डॉक्टर अब्दुल रहमान अंजरिया आहे. ज्याने मुलावर लैंगिक अत्याचार केला होता. त्यानंतर पोस्को कायद्याअंतर्गत अब्दुल रहमान अंजारीयावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु गुन्हा दाखल झाल्यानंतर 2020 पासून तो मुंबईमध्ये किंवा इतर ठिकाणी पोलिसांना सापडला नाही. तसेच ज्याच्यावर अल्पवयीन असताना अत्याचार झाला होता. त्यांचा 28 सप्टेंबर 2022 रोजी उरण मध्ये ट्रकने धडक दिल्यामुळे अपघातात मृत्यू झाला. त्या संदर्भात पुढील सुनावणी नऊ मार्च रोजी होणार आहे. मात्र उरण पोलीस ठाण्यामध्ये नोंदवलेला सीआर क्रमांक 275 2022 या याचिकेला उत्तर म्हणून, सह पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नवी मुंबई यांना प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश देतो असे देखील मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने नमूद केले. तसेच या गुन्ह्यांमधील हेतूबाबत याचिका करता यांनी केलेल्या आरोपाच्या संदर्भात देखील चौकशी होणे जरुरी आहे हे देखील नमूद केले.
संक्षिप्त अहवाल दाखल : मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठांसमोर याचिका कर्त्याच्या संदर्भातील बाजू अधिवक्ता घनश्याम उपाध्याय आणि अधिवक्ता मनोज सिंह या दोन्ही वकिलांनी मांडली. मात्र सरकारी वकिलाने न्यायालयाला सांगितले की, तपास अधिकाऱ्याने या प्रकरणाचा संक्षिप्त अहवाल दाखल केला आहे. खटला बंद केला आहे. हे कळताच मुंबई उच्च न्यायालयाने गंभीरपणे या सगळ्याची नोंद घेत नवी मुंबई पोलिसांना तपास अधिकाऱ्यांची भूमिका नेमकी काय आहे हे देखील पाहण्यास बजावले आहे.
अनेकदा लैंगिक अत्याचार केले: अल्पवयीन मुलगा ज्याच्यावर लैंगिक शोषण केले गेले. त्या संदर्भात जो आरोपी आहे, त्या आरोपीने 2019 च्या काळात लोकसभा निवडणूक वंचित बहुजन आघाडीकडून लढवली होती. तो स्थानिक राजकारणी आणि प्रभावशाली व्यक्ती असल्यामुळे त्याचा प्रभाव त्या भागात आहे. हे देखील याचिककर्ता कडून नमूद करण्यात आले. त्या मुलीवर 2019 ते 20 या एका वर्षाच्या काळात विक्रोळी येथे संशयित आरोपीने अनेकदा लैंगिक अत्याचार केले. त्या संदर्भात एफआयआर क्रमांक 25/ 2020 साकीनाका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील नोंदवला गेला. आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला होता.
पुढील सुनावणी 9 मार्चला: गूढ मृत्यू झालेल्या आणि ज्या मुलावर अत्याचार झाला होता. त्याच्या नातेवाईकाने याचिकेत म्हटले, की 28 सप्टेंबर 2022 रोजी संशयास्पदरित्या पीडित मुलाचा अपघातात मृत्यू झाला. अपघातामध्ये वाहनाचा न दिसणारा नोंदणी क्रमांक आढळला. नोंदणी क्रमांक जाणून बुजून अस्पष्ट स्थितीमध्ये ठेवण्यात आला होता. ही बाब अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी न्यायालयासमोर मांडली. त्या वाहनाने धडक दिली त्या वाहनाचा चालकाचा कधीच पत्ता लागला नाही. तसेच पुढे असाही आरोप करण्यात आला की, डॉक्टर अंजारीया यांनीच त्या खटल्यातील महत्त्वाचा एक साक्षीदार होता त्याला देखील एका ठिकाणी काम करत असताना त्या कामावरून काढून टाकण्यात आले. त्यामुळे संपूर्ण प्रकरणमध्ये डॉक्टर अंजरिया या यांच्या संदर्भातला संशय बळावतो हे देखील त्यांनी याचिकेमध्ये नमूद केले. या संदर्भातील पुढील सुनावणी 9 मार्च रोजी होणार आहे.