मुंबई : बॉलीवूड अभिनेता अरमान कोहली आणि त्याची गर्लफ्रेंड नीरु रंधावा यांच्यामध्ये वाद झाला होता. अरमानने तिला मारहाण केल्याची घटना 2018 मध्ये घडली होती. या प्रकरणी नीरु रंधावाने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. या संदर्भात अरमान कोहलीविरुद्ध दाखल केलेला एफआयआर मागे घेण्याचा निर्णय न्यायालयाने रद्द करावा, अशी विनंती देखील तिने केली होती. या प्रकरणी न्यायालयाने 18 जुलैपर्यंत 50 लाख रुपये आरमान कोहली याने दंड म्हणून देणे आवश्यक असल्याचे नमूद केले होते.
दंड भरण्याची शेवटची मुदत : मात्र आज या सुनावणीवेळी अरमान कोहलीने दंड भरण्यासाठी न्यायालयाकडून मुदत वाढवून घेतली आहे. तसेच केवळ वीस लाख रुपये जमा केले. त्यामुळे न्यायालयाच्या मागील आदेशानुसार परिपूर्ण समाधान झालेले नाही. न्यायाधीशांनी आज निर्देश दिले आहेत की, दंडाची रक्कम भरण्यासाठी दोन ऑगस्ट या दिवशी अखेरची संधी अरमान कोहलीला देण्यात येत आहे. त्यानंतर मात्र उच्च न्यायालय कायद्यानुसार कारवाईचे आदेश जारी करेल. न्यायमूर्ती आर. एन. लड्डा आणि न्यायमूर्ती नितीन सांबरे यांनी हे निर्देश दिले आहेत. न्यायालयासमोर वकील तारक सय्यद यांनी अरमान कोहलीसाठी बाजू मांडली. तर वकील कुशल मोर नीरू रंधावासाठी बाजू मांडत होते.
न्यायालयाची कोहलीला तंबी : या प्रकरणांत अरमान कोहली याने समझोत्याची विनंती केली होती. नीरू रंधावाच्या वकिलांनी तिच्या वतीने समझोत्यासाठी नुकसान भरपाईची मागणी केली होती. मागील सुनावणीमध्ये प्रेयसीला मारहाण केल्याप्रकरणी उच्च न्यायालयाने बॉलीवूड अभिनेता अरमान कोहलीला पन्नास लाख रूपयांचा दंड ठोठावला होता. हे प्रकरण मिटवण्यासाठी त्याला 50 लाख रुपये देण्याचा आदेश दिला होता. आता ही त्याला 2 ऑगस्टपर्यंत दंडाची रक्कम भरण्यासाठी मुदतवाढ दिली आहे.
हेही वाचा :