मुंबई : प्रसिद्ध चित्रपट निर्माते राकेश रोशनची 2011 मध्ये बनावट सीबीआय अधिकारी असल्याचे सांगून 50 लाख रुपयांची फसवणूक केली होती. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींकडून सीबीआयने 50 लाख रुपये जप्त केले होते. यारक्कम पैकी 30 लाख रुपये राकेश रोशन यांना देण्यात आले होते. उर्वरित 20 लाख रुपयाची रक्कम परत मिळावी याकरिता उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायमूर्ती आर जी अवचट यांच्या एकल न्यायाधीशांच्या खंडपीठाने राज्य सरकार आणि सीबीआयसह प्रतिवादींना नोटीस बजावली आहे. उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहे. या याचिकेवर पुढील सुनावणी चार आठवड्यापर्यंत तहकूब करण्यात आली आहे.
रक्कम परत करण्याची मागणी : रोशनने यांनी म्हटले होते की त्यांची फसवणूक करणाऱ्या दोघांपैकी एकाने सीबीआय अधिकारी असल्याचा आव आणला त्यांनी तक्रार दाखल केल्यानंतर सीबीआयने आरोपींकडून रोशनचे 50 लाख रुपये जप्त केले होते. तथापि जेव्हा रोशनने त्यांना रक्कम परत करण्याची मागणी केली तेव्हा त्याला 2012 मध्ये सीबीआयच्या विशेष न्यायालयाने केवळ 30 लाख रुपये परत देण्याची परवानगी दिली होती. 2020 मध्ये त्याने उर्वरित 20 लाख रुपयांचा रक्कम परत मिळावा यासाठी अर्ज केला होता. ते अर्ज 2021 मध्ये सत्र न्यायालयाने फेटाळला होता.
अटक वॉरंट जारी : 23 डिसेंबर 2022 रोजी दाखल केलेल्या याचिकेत रोशनने म्हटले आहे की हे दोघे जण जून 2011 मध्ये त्याच्या घरी आले होते. त्यापैकी एकाने स्वतला सीबीआय अधिकारी असल्याचे खोटे म्हटले होते. त्याच्याविरुद्ध केलेल्या कथित तक्रारीवरून त्याच्याविरुद्ध कारवाईची धमकी दिली होती. आरोपींकडून राकेश रोशन यांना म्हटले होते की त्याच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आले होते.
दोघांविरुद्ध तक्रार दाखल : रोशनने त्यापैकी एकाला 50 लाख रुपये सुपूर्द केले. पण आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने सीबीआय आणि एसीबीकडे या दोघांविरुद्ध तक्रार दाखल केली होती. ऑगस्ट 2011 मध्ये एफआयआर नोंदवण्यात आला. नंतर आरोपींना अटक करण्यात आले होते. या आरोपींकडून सीबीआयने सोने आणि रोख रक्कम जप्त केली होती. या प्रकरणात 2011 मध्ये, सीबीआय अधिका-यांनी काईट्स चित्रपटाशी संबंधित पेमेंटच्या प्रकरणी रोशनच्या विरोधात दिवाणी खटला बंद करण्यात मदत करण्याच्या बहाण्याने चित्रपट निर्मात्याकडून 50 लाख रुपये उकळले होते.