मुंबई : प्रसिद्ध चित्रपट अभिनेता आणि बॉलिवूडचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा शाहरुख खानच्या मन्नत या बंगल्याबाहेर निदर्शने करण्यात आली. त्यानंतर मुंबई पोलिसांना शाहरुख खानच्या घराची सुरक्षा वाढवावी लागली. अनटच यूथ इंडिया फाउंडेशन या खाजगी संस्थेने ही निदर्शने केली. त्यांनी ऑनलाइन जुगार आणि गेमिंग अॅप्सचा प्रचार करणे थांबवावे, अशी त्यांची मागणी आहे.
तरुणांचा कल जुगाराकडे : अनटच यूथ इंडिया फाउंडेशनचे प्रमुख कृष्णचंद्र अडल यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, देशातील तरुणांचा कल जुगाराकडे झुकत आहे. तसेच ऑनलाइन गेमिंग अॅप्स आणि जुगारामुळे तरुण उद्ध्वस्त होत आहे. दुसरे ते बेकायदेशीर आहे. यामुळे लोक आत्महत्या करत आहेत. लोक डिप्रेशनमध्ये जात आहेत आणि चुकीच्या गोष्टीही करत आहेत. त्यामुळे हे निदर्शन करण्यात आली आहे.
अन्यथा पुन्हा आंदोलन करावे लागेल : फिल्म स्टारच्या ऑनलाइन जुगाराच्या जाहिरातीविरोधात निदर्शनासाठी केवळ शाहरुख खानचे घर का निवडले या प्रश्नाला उत्तर देताना कृष्णानंद म्हणाले की, शाहरुख खान हा चित्रपट जगतातील खूप मोठा स्टार आहे, जेव्हा तो त्याचे प्रमोशन थांबवतो तेव्हा त्याला पाहून इतर स्टारही पुढे अशा जाहिराती करताना विचार करतील. पोलिसांनी तरुण आणि मुले जुगार खेळताना पाहिल्यास त्यांना अटक करतात, असेही अडाल सांगतात. त्याच वेळी, चित्रपट कलाकारांना माहित आहे की, जुगार ही चुकीची गोष्ट आहे. तरीही ते त्याचा प्रचार करतात. त्यामुळे त्यांनी अशा गोष्टींचा अपप्रचार करू नये, अन्यथा आम्हाला पुन्हा पुन्हा आंदोलन करावे लागेल, असे सांगावेसे वाटते.
आंदोलकांना घेतले ताब्यात : शाहरुख खानचा 'पठाण' चित्रपट रिलीज झाला त्यावेळीही बराच गदारोळ झाला होता. नेते आणि हिंदू संघटनांनी जोरदार विरोध केली होती. आता त्यांचा 'जवान' हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहात दाखल होणार आहे. मात्र, हे आंदोलन चित्रपटाबद्दल नसून गॅम्बलिंग अॅप्सच्या जाहिराती विरोधात करण्यात आले होते. मात्र वेळीच पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन आंदोलन स्थगित केले आहे.
हेही वाचा -