मुंबई Bogus Doctor Arrest Case: प्राप्त माहितीच्या अनुषंगाने, कक्ष ६ कार्यालयातील पोलीस पथक हे बृहन्मुंबई महानगरपालिकाचे सहाय्यक वैद्यकीय अधिकारी यांनी शिवाजीनगर परिसरातील एका क्लिनिकमध्ये छापा टाकला. तेथे बोगस डॉक्टर असलेला अल्ताफ हुसेन मोहमद निजाम खान (वय ५० वर्षे) हा रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर औषधोपचार करताना मिळून आला. यानंतर ही माहिती कक्ष ६ चे प्रभारी पोलीस निरीक्षक रविंद्र साळुंखे यांना देण्यात आली.
बोगस डॉक्टर विरुद्ध गुन्हा दाखल: अल्ताफ हुसेन मोहमद निजाम खान या बोगस डॉक्टरांकडे कोणताही अधिकृत वैद्यकीय परवाना नव्हता. तसेच महाराष्ट्र मेडीकल कौन्सिलमध्ये त्याच्या नावाची नोंदणीही नव्हती. तरीसुद्धा तो डॉक्टर असल्याचे भासवून बेकायदेशीररीत्या विविध आजारावरील रुग्णांवर औषधोपचार करायचा. त्याच्या ताब्यातून स्टेथेस्कोप, वेगवेगळ्या प्रकारचे इंजेक्शन बॉटल्स, सिरीज, एन्टीबायोटिक टॅबलेट्स असे वेगवेगळ्या प्रकारची औषधे आणि वैद्यकीय साहित्य पंचनाम्यांतर्गत पोलिसांनी जप्त केले. त्या बोगस डॉक्टरविरुध्द शिवाजीनगर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संविधान कलम ४१९, ४२० सह कलम ३३,३६ महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर्स एक्ट १९६१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
'या' पोलीस टीमने बजावले कर्तव्य: ही कारवाई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, गुन्हे विभागाचे पोलीस सह आयुक्त लखमी गौतम, गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त शशि कुमार मीना, प्रकटीकरण १चे पोलीस उप आयुक्त राज तिलक रौशन, सहाय्यक पोलीस आयुक्त (डी/पूर्व) चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या कक्ष ६ चे प्रभारी पोलीस निरीक्षक रविंद्र साळुंखे, पोलीस निरीक्षक प्रशांत पवार, पोलीस निरीक्षक हणमंत ननावरे, पोलीस उपनिरीक्षक सुभाष मुठे, पोलीस उपनिरीक्षक कल्पना माशेरे, पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार बेळणेकर, सहाय्यक फौजदार सावंत, सहाय्यक फौजदार सकपाळ, सहाय्यक फौजदार कुरडे, पोलीस हवालदार पारकर, पोलीस हवालदार चव्हाण, पोलीस हवालदार जाधव, पोलीस हवालदार शिंदे, पोलीस शिपाई घेरडे, पोलीस शिपाई कोळेकर, पोलीस शिपाई अभंग, पोलीस शिपाई पवार, पोलीस नाईक कदम आणि पोलीस शिपाई पाटील यांच्या पथकाने पार पाडली आहे.
हेही वाचा: