मुंबई Body Bag Scam Case: किरीट सोमैय्या यांनी दुपारी अडीचच्या सुमारास ईडी कार्यालयात जाऊन ईडीचे स्पेशल डायरेक्टर सत्यब्रत कुमार यांना पत्राद्वारे नागपाडा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या ऑक्सिजन घोटाळ्याच्या गुन्ह्याची माहिती दिली. तसेच या घोटाळ्याबाबत मुंबईचे माजी पालकमंत्री यांनी देखील तक्रार दाखल केली होती. त्याची तक्रार प्रत देऊन महापालिकेचे आयुक्त इक्बाल चहल आणि माजी पालकमंत्री अस्लम शेख यांना चौकशी दरम्यान बोलवण्यात यावे, अशी विनंती पत्राद्वारे करण्यात आली आहे. त्यानंतर किरीट सोमैय्या यांनी आर्थिक गुन्हे शाखेत येऊन ऑक्सिजन घोटाळ्या प्रकरणी अस्लम शेख यांना अधिक माहिती घेण्यासाठी बोलावण्यात यावे अशी विनंती केली असल्याची माहिती सोमय्या यांनी दिली आहे. (ED investigation of Kishori Pednekar)
मी जनतेसाठी कामं केली: ईडी कार्यालयात पोहोचल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना किरीट सोमैय्या यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या नेत्यांना उत्तर द्यावेच लागेल अशी प्रतिक्रिया दिली. त्याचप्रमाणे ईडी कार्यालयात पोहोचण्याआधी किशोरी पेडणेकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की, उद्धव ठाकरे यांच्या नेत्यांना घेरून ईडीतर्फे चौकशी केली जात आहे. मी अभिमानानं सांगेन की, मी मुंबईची महापौर होते आणि जनतेसाठी कामे केली आहेत, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
बॉडी बॅग घोटाळ्यात गुन्हा दाखल: पेडणेकर यांच्या विरुद्ध बॉडी बॅगमधील कथित अनियमिततेच्या चौकशीसाठी ऑगस्ट महिन्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पेडणेकर, BMC च्या इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांवर भारतीय दंड विधानाच्या कलम ४०९, ४२०,१२०B अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहा तास चालली चौकशी: ईडीने 7 नोव्हेंबरला मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त वेलरासू यांची कोविड दरम्यान झालेल्या विविध गैरप्रकारांबाबत सुमारे ६ तास चौकशी केली. माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना 8 नोव्हेंबरला ईडीनं कोविड काळात वाढीव दरानं मृत कोविड रुग्णांच्या मृतदेहासाठी वापरण्यात येणारी बॉडी बॅग खरेदी केल्याप्रकरणी चौकशीसाठी बोलावलं होतं. मात्र, किशोरी पेडणेकर यांच्या वकिलानं ईडी अधिकाऱ्यांकडे चार आठवड्यांची मुदतवाढ मागितली आहे. त्यामुळं ईडी पुढील आठवड्यात पेडणेकरांना तिसऱ्यांदा समन्स बजावून आज चौकशीला बोलावलं होतं. त्यानुसार आज सहा तास चौकशी पार पडली आहे.
निविदा प्रक्रियेत घोटाळा: अंमलबजावणी संचालनालयानं मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, माजी अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प), माजी उपमहापालिका आयुक्त (खरेदी/सीपीडी) यांच्या विरुद्ध मनी लॉन्ड्रिग प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. यांच्यावर कोरोनाच्या काळात मुंबई महापालिकेत घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. कोविड काळात झालेल्या निविदा प्रक्रियेत किशोरी पेडणेकर यांचा सहभाग असल्याचा आरोप आहे. मुंबईतील कोविड रुग्णांच्या मृतदेहासाठी वापरण्यात बॉडी बॅग २ हजार रुपयांऐवजी ६८ हजारांना विकत घेतल्याचा आरोप आहे. तत्कालीन महापौरांच्या सूचनेवरून हे कंत्राट देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. कोविड काळात किशोरी पेडणेकर मुंबईच्या महापौर होत्या. या प्रकरणी अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू, खरेदी विभागाचे तत्कालीन उपायुक्त रमाकांत बिरादार आणि वेदांत इनोटेक लिमिटेड या कंपनीवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा: