ETV Bharat / state

BMC News : लोकसहभागातून मुंबई होणार हिरवीगार, गृहनिर्माण संस्थांच्या जागांवर हरितीकरणासाठी लवकरच मार्गर्शक तत्त्वे - वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान

मुंबईला पर्यावरण सक्षम बनविणे व जैवविविधता वाढविण्यासाठी हरितीकरणाची कामे खोलवर रुजवणे आवश्यक झाले आहे. त्यासाठी ८ मार्च २०२३ रोजी वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात महापालिकेचे अधिकारी, हरितीकरण क्षेत्रातील तज्ज्ञ, पर्यावरण तज्ज्ञ, बिगर शासकीय संस्थांचे प्रतिनिधी आदी सहभागी होणार आहेत.

BMC News
मुंबई होणार हिरवीगार
author img

By

Published : Mar 4, 2023, 9:53 AM IST

मुंबई : मुंबईत नागरी वनांच्या माध्यमातून ५ लाखांवर झाडांची लागवड करण्याचा अभिनव उपक्रम यशस्वी झाला आहे. त्यानंतर आता मुंबईच्या हरितीकरणाला गृहनिर्माण संस्था व व्यक्ती स्तरापर्यंत नेण्यासाठी हरितीकरणाची मार्गदर्शकतत्त्वे आखली जाणार आहेत. यावर धोरण तयार करण्यासाठी एका चर्चासत्राचे आयोजन महापालिकेकडून करण्यात आल्याची माहिती पालिकेचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली. ८ मार्चला वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

मुंबईच्या हरितीकरणाला चालना : मुंबईत हरित क्षेत्रामध्ये वाढ व्हावी व मुंबईचे पर्यावरण समृद्ध व्हावे या उद्देशाने महापालिकेच्या उद्यान विभागाने भर दिला आहे. उद्याने, मोकळ्या जागांवर वृक्षारोपण, रस्ते दुभाजकांवर हरितपट्टे आदी ठिकाणी साडेचार लाखांपेक्षा अधिक वृक्षलागवडकरून नागरी वने निर्माण केली जाणार आहेत. नव्याने १ लाख वृक्ष लागवड केली जात आहे. अशा अनेक उपक्रमांमधून मुंबईच्या हरितीकरणाला चालना देण्यात आली आहे.

मुंबई लोकसहभागातून हिरवीगार : वर्ल्ड रिसोर्सेस इंडिया या संस्थेच्या सहकार्यातून महापालिकेच्या उद्यान विभागाने डिसेंबर २०२२ मध्ये कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेमध्ये मुंबईला लोकसहभागातून हिरवेगार करण्याची गरज असल्याचा अहवाल तयार करण्यात आला होता. नागरिकांनी, गृहनिर्माण संस्थांनी तसेच लहान जागांवर देखील वृक्षारोपण, वेगवेगळे हरित उपक्रम राबवणे, नागरिक संस्था यांनी वृक्ष दत्तक घेणे, यासारख्या अनेक संकल्पना त्यामध्ये पुढे आल्या होत्या.

हरितीकरणाबाबत मार्गदर्शक तत्त्वे : हरितीकरणाबाबत मार्गदर्शक तत्त्वे तयार केली तर महानगराला अधिक लाभ मिळेल, याचा विचार करुन यंदाच्या पावसाळ्यापूर्वी मुंबई हरितीकरणाची मार्गदर्शक तत्वे आणि कृती आराखडा तयार करण्याचे प्रस्तावित असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. महापालिकेच्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या प्रयत्नांना गृहनिर्माण संस्था व नागरिकांकडून व्यक्तिगत स्तरावरुन सहभाग मिळावा, यासाठी पालिकेकडून मार्गदर्शक धोरण आखण्याचे ठरले आहे.

हरित क्षेत्र वाढवण्यासाठी संकल्पना : मुंबईत हिरवळ राखण्यासाठी सूक्ष्म मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात येणार आहेत. ही मार्गदर्शक तत्वे हँडबुक प्रसिद्ध करण्यात येतील. हा उपक्रम महापालिकेचा उद्यान विभाग आणि वर्ल्ड रिसोर्सेस इंडिया यांच्याद्वारे संयुक्तपणे राबविला जाणार आहे. या मार्गदर्शक तत्वांच्या आधारे घर, गृहनिर्माण संस्थांच्या अखत्यारितील जागा व शहरातील लहान भूखंड यावर हरित क्षेत्र वाढवण्यासाठी संकल्पना आणि पद्धती यांची माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

हेही वाचा : Old Man Murdered: शेतातच प्रेमी जोडपे करत होते 'तसले' चाळे.. म्हाताऱ्याने गुपचूप काढले फोटो.. वादानंतर म्हाताऱ्याची हत्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.