ETV Bharat / state

BMC Seized 3789 kg of Plastic : मुंबई महापालिकेकडून पाच महिन्यांत ३७८९ किलो प्लास्टिक जप्त; ३४ लाखांचा दंड वसूल - BMC Seized 3789 kg of Plastic in Five Months

मुंबई महापालिकेने १ जुलैपासून पुन्हा प्लास्टिक विरोधात जोरदार ( BMC has Seized 3798 kg of Plastic ) कारवाई सुरू केली आहे. मुंबई महापालिकेने मागील पाच महिन्यांत ३७९८ किलो प्लास्टिक जप्त केले आहे. यातून पालिकेने ३४ लाख ७५ हजार रुपयांचा दंड ( BMC Collected a Fine of Rs. 34 Lakh 75 Thousand ) वसूल ( BMC has Seized 3798 kg of Plastic ) करण्यात आल्याची माहिती उपायुक्त संजोग कबरे यांनी दिली.

BMC Seized 3789 kg of Plastic
मुंबईत पाच महिन्यांत ३७८९ किलो प्लास्टिक जप्त
author img

By

Published : Nov 29, 2022, 6:59 PM IST

मुंबई : मुंबईत १ जुलैपासून पुन्हा प्लास्टिक विरोधात कारवाई सुरू करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेने मागील पाच महिन्यांत ३७९८ किलो प्लास्टिक जप्त केले आहे. यातून पालिकेने ३४ लाख ७५ हजार रुपयांचा दंड ( BMC Collected a Fine of Rs. 34 Lakh 75 Thousand ) वसूल ( BMC has Seized 3798 kg of Plastic ) करण्यात आल्याची माहिती उपायुक्त संजोग कबरे यांनी ( Deputy Commissioner Sanjog Kabare Informed ) दिली. प्लास्टिक विरोधातील कारवाई आणखी तीव्र केली जाणार असल्याचे कबरे यांनी सांगितले.

राज्यात प्लास्टिकवर बंदी : मुंबईमध्ये २६ जुलै २००५ रोजी जलप्रलय आला होता. यावेळी प्लास्टिक पिशव्यांमुळे गटारे नाल्यातील पाण्याचा निचरा झाला नसल्याचे समोर आले होते. यासाठी राज्य सरकारने सिंगल युज प्लास्टिकवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. जून २०१८ मध्ये राज्य सरकारने सिंगल युज प्लास्टिकवर बंदी घातली. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्यांची विक्री, वापर करणारे व उत्पादन करणार्‍यांवर कारवाई करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला. महानगरपालिकेच्या लायसन्स विभागाकडून जून २०१८ ते मार्च २०२० पर्यंत प्रतिबंधित प्लास्टिकवर कारवाई करण्यात आली. मुंबईमध्ये मार्च २०२० मध्ये कोरोना विषाणूचा प्रसार सुरू झाल्याने ही कारवाई बंद करण्यात आली होती. आता कोरोनाचा प्रसार कमी झाल्यावर १ जुलैपासून पुन्हा प्लास्टिक विरोधी कारवाई तीव्र करण्यात आली आहे.

३७९८ किलो प्लास्टिक जप्त : मुंबईत प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्यांवर कारवाई धडाक्याने सुरू झाली होती. मात्र, कोरोनाचे संकटामुळे दोन वर्षे प्लास्टिक कारवाई थांबली होती. गेल्या १ जुलैपासून ही कारवाई पुन्हा सुरू करण्यात आली आहे. मॉल, मार्केट, दुकाने, फेरीवाले अशा ठिकाणी कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. १ जुलैनंतर आतापर्यंत मागील पाच महिन्यांत ३७९८ किलोवर प्लास्टिक जप्त केले आहे. तर ३४ लाख ७५ हजार रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे.

हे आहेत पालिकेच्या रडारवर : मुंबईत ऑनलाईन फूड चैन आणि हॉटेल, रेस्टॉरंटकडून वाढलेल्या प्लास्टिकच्या वापराकडे पालिकेने लक्ष वेधले आहे. प्लास्टिकचा वापर नियंत्रणात आणण्यासाठी लवकरच महापालिकेकडून पावले उचलली जाणार आहेत. त्याचाच भाग म्हणून हॉटेल इंडस्ट्रीचे प्रतिनिधीत्व करणारी आहार संघटना आणि ऑनलाईन फूड चैनच्या प्रतिनिधींची लवकरच बैठक घेतली जाणार आहे. या बैठकीत प्लास्टिकचा वापर नियंत्रणात आणण्यासाठी तसेच प्लास्टिकला पर्याय आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला जाणार असल्याचे कबरे यांनी सांगितले.

या प्लास्टिकवर बंदी : ५० मायक्रॉन प्लास्टिकपासून बनवल्या जाणार्‍या पिशव्या (हँडल असलेल्या व नसलेल्या) प्लास्टिकपासून बनवण्यात येणार्‍या व एकदाच वापरून टाकून दिल्या जाणार्‍या (डिस्पोजेबल) वस्तू उदा. ताट, कप, प्लेट, ग्लास, चमचे इत्यादी हॉटेलमध्ये अन्नपदार्थ पॅकेजिंगसाठी वापरल्या जाणार्‍या प्लास्टिकच्या वस्तू, द्रव्य पदार्थ साठवण्यासाठी वापरात येणारे कप/पाऊच, सर्व प्रकारचे अन्नपदार्थ, धान्य इत्यादी साठवण्यासाठी व पॅकेजिंगसाठी वापरले जाणारे प्लास्टिक आणि प्लॅस्टिक वेष्टन यांचा समावेश आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.