ETV Bharat / state

BMC Initiative For Green Revolution : मुंबई हिरवीगार करण्यासाठी पालिकेचा संकल्प, दोन दिवसीय विचारमंथन कार्यशाळेचे आयोजन

मुंबईमध्ये झाडांची संख्या वाढवण्यासाठी पालिकेकडून विविध उपाययोजना केल्या (BMC Initiative For Green Revolution) जातात. त्याचाच एक भाग म्हणून मुंबईत १४ आणि १५ डिसेंबर रोजी दोन दिवसीय विशेष कार्यशाळेचे (Organizing two day workshop) आयोजन करण्यात आले आहे. यात 'हरित क्षेत्र जपणूक व संवर्धन' (Green Area Preservation and Conservation) यावर विचारमंथन होणार असल्याची माहिती, महानगरपालिकेचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली.

BMC Initiative For Green Revolution
मुंबई हिरवीगार करण्यासाठी पालिकेचा संकल्प
author img

By

Published : Dec 13, 2022, 5:18 PM IST

प्रतिक्रिया देतांना जितेंद्र परदेशी

मुंबई : मुंबईसारख्या जागतिक दर्जाच्या शहरात नागरिकांच्या संख्येच्या तुलनेत झाडांची संख्या खूपच कमी आहे. मुंबईमध्ये काँक्रीटच्या जंगलामुळे कमी प्रमाणात जागा उपलब्ध असून; त्यात झाडांची संख्या वाढवण्यासाठी पालिका प्रयत्नशील आहे. मुंबईमध्ये झाडांची संख्या वाढवण्यासाठी पालिकेकडून विविध उपाययोजना केल्या जात (BMC Initiative For Green Revolution) आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मुंबईत १४ आणि १५ डिसेंबर रोजी दोन दिवसीय विशेष कार्यशाळेचे (Organizing two day workshop) आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत देशभरातील ७५ तज्ज्ञ सहभागी होणार आहे. यात हरित क्षेत्र जपणूक व संवर्धन यावर विचारमंथन होणार (Green Area Preservation and Conservation) असल्याची माहिती, महानगरपालिकेचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली.

देशभरातील ७५ तज्ज्ञ सहभागी होणार : मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेच्या अनुषंगाने परदेशी बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, मुंबईमध्ये ३० लाख झाडे आहेत. मुंबईत मोकळ्या जागा कमी आहेत. यामुळे झाडांची संख्या वाढवणे शक्य नाही. यासाठी जपानी मियावाकी पद्धतीने झाडे लावण्यात आली आहेत. मियावाकी पद्धतीने ४ लाख झाडे लावण्यात आली आहेत. पुलांच्या खाली मोकळी जागा आहे. त्याठिकाणी तसेच मुलांच्या पिलरवर उभी गार्डन उभारण्याचा पालिकेने प्रयत्न केला आहे. इमारतीच्या टेरेसवर उद्यान बनवण्यास पालिकेने परवानगी दिली आहे. आणखी कोणत्या पद्धतीने मुंबईत हिरवळ निर्माण करता येईल यासाठी विचारमंथन होणे गरजेचे आहे. यासाठी दोन दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. यात देशभरातून ७५ तज्ज्ञ सहभागी होणार आहेत. हे तज्ज्ञ जे सल्ले देतील त्याचा एक कृती आराखडा बनवला जाणार आहे. त्यानुसार कार्यवाही करून मुंबईमध्ये झाडांची संख्या वाढवली जाणार असल्याची माहिती परदेशी यांनी दिली.

या संस्थांचा सहभाग : बृहन्मुंबई महानगरपालिकेचा उद्यान विभागाच्या पुढाकाराने आयोजित या कार्यशाळेमध्ये टाटा समाज विज्ञान संस्था (TISS), वर्ल्ड रिसोर्स इन्स्टिट्यूट इंडिया (WRI), युथ फॉर युनिटी अँड वॉलिंटरी एक्शन यांचाही सहभाग असणार आहे. या कार्यशाळेत हरितक्षेत्र व्यवस्थापन व संवर्धन समुदाय आधारित कार्यक्रम अंमलबजावणी, विविध स्तरीय उपाययोजनांसाठी आंतरविद्याशाखीय सहभाग, दीर्घकालीन परिरक्षणासाठी पर्यावरणाच्या अनुषंगाने उपजीविका विषयक बाबीं विषयी उहापोह इत्यादी विविध विषयांवर सविस्तर चर्चा आणि विचारमंथन होणार आहे, असे परदेशी यांनी सांगितले.

राणीबाग वनस्पती उद्यान : मुंबईमध्ये सर्वात मोठे गार्डन हे राणीबागेत आहे. या राणीबागेत ५३ एकर जागेत ४ हजाराहून अधिक झाडे आहेत. त्यात वनस्पस्तीची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत. त्यातील अनेक झाडे १०० वर्षाहून अधिक वर्षाची आहेत. यामुळे राणी बागेला वनस्पती उद्यान म्हणून ओळखले जाते. राणीबागेत झाडांच्या सोबत ३०० हुन अधिक जातीचे प्राणी आणि पक्षी आहेत. जे पाहायला मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी असते.

आरेचे जंगल : मुंबईच्या गोरेगाव येथे १९४९ साली वसवलेल्या या भागात आरे दूध या कंपनीचा दूध एकत्रीकरण व शुद्धिकरण करण्याचा कारखाना आहे. याच्या आसपास बगीचे, तलाव तसेच फिरण्यासाठीच्या जागा आहेत. या भागात अंदाजे १,२८७ हेक्टर क्षेत्रात ३२ पशुपालनक्षेत्रे असून; त्यात सुमारे १६,००० दुभती जनावरे आहेत. याच जवळ आरेचे जंगल आहे. त्यात २७ आदिवासी पाडे आहेत. या पाड्यात आदिवासी मोठ्या संख्येने राहतात. या जंगलात विविध प्रकारचे प्राणीही मोठया प्रमाणात आहेत. ३ सप्टेंबर २०२० मध्ये राज्य सरकारने आरेला जंगल म्हणून सुरक्षित केले आहे. आरेला मुंबईचे फुफ्फुस बोलले जाते. मुंबईची लोकसंख्या - १ कोटी ३० लाख (२०११ च्या जनगणने नुसार) आहे. मुंबईत एकूण झाडे - ३० लाख आहेत. आणि मियावाकी पध्दतीची झाडे - ४ लाख आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.