ETV Bharat / state

नव्या वर्षात महापालिका मुख्यालयात पर्यटकांसाठी 'हेरिटेज वॉक', आदित्य ठाकरेंकडून आढावा - Aditya thackeray on Heritage Walks

१५० वर्षांच्या आणि गॉथिक शैलीतील उभारण्यात आलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या इमारतीचा जानेवारीपासून पर्यटकांना 'हॅरीटेज वॉक' घेता येणार आहे. या पार्श्वभूमीवर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी पालिका मुख्यालयातील पूर्व तयारीचा आढावा घेतला.

BMC Headquarters Opens To Tourists For Heritage Walks
नव्या वर्षात महापालिका मुख्यालयात पर्यटकांसाठी 'हेरिटेज वॉक', आदित्य ठाकरेंकडून आढावा
author img

By

Published : Dec 21, 2020, 2:13 AM IST

मुंबई - जागतिक दर्जाचे शहर असलेल्या मुंबईमधील तब्बल दोन कोटी नागरिकांना मुंबई महापालिकेकडून सोयी सुविधा पुरवल्या जातात. अशा या महापालिकेची इमारत इंग्रजांच्या काळात बांधली असल्याने तिला ऐतिहासिक असे महत्व आहे. १५० वर्षांच्या आणि गॉथिक शैलीतील उभारण्यात आलेल्या या इमारतीचा जानेवारीपासून पर्यटकांना 'हॅरीटेज वॉक' घेता येणार आहे. या पार्श्वभूमीवर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी पालिका मुख्यालयात येऊन पूर्व तयारीचा आढावा घेतल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.

पर्यटन मंत्र्यांनी घेतला आढावा -
मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयाची हेरिटेज इमारत केवळ मुंबईकरांनाच नव्हे तर देश-विदेशातील पर्यटक-सर्वसामान्यांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिली आहे. त्यामुळे या वास्तूचे पर्यटन घडावे यासाठी पालिका आणि महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ यांच्यात सामंजस्य करार ऑक्टोबरमध्ये करण्यात आला आहे. त्यादृष्टीने ही इमारत पर्यटनासाठी खुली करण्याच्या दृष्टीने पालिकेच्या माध्यमातून कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. या तयारीचा आढावा पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी पालिका आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या अधिकार्‍यांसोबत घेतला. दरम्यान, पालिका मुख्यालयाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अलीकडेच ८४ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.

गाईडसोबत 'हेरिटेज वॉक' -
मुंबई महानगर पालिकेची चार मजल्यांची मुख्यालयाची इमारत गॉथिक शैलीतील दगडी कामातून तयार करण्यात आलेली आहे. गॉथिक शैलीतील हे काम जागतिक वारसा असलेल्या वास्तूंमध्ये मोडते. या इमारतीबरोबरच पालिकेची सहा मजली विस्तारित इमारतही आहे. ही इमारत पर्यटनासाठी खुली झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या धर्तीवर गाईडच्या मदतीने पर्यटकांना पाहता येणार आहे. यावेळी पर्यटकांना गार्डडच्या माध्यमातून इमारतीचा इतिहास, आताचे महत्त्व सांगितले जाईल. ही सफर मोफत राहणार असल्याचे सामंजस्य करारात स्पष्ट करण्यात आले आहे.

वास्तूत काय पाहता येणार -
मुख्यालयाच्या इमारतीत पालिका आयुक्तांचे कार्यालय असून विविध महत्त्वाच्या समित्यांची सभागृहे आहेत. यात मुंबईतील २३२ नगरसेवकांसाठी असलेले मुख्य सभागृह, त्यातील महापुरुषांचे पुतळे, स्थायी समिती, शिक्षण समितीचे सभागृह आहे. हेरीटेज वास्तू असल्यामुळे महापौर तसेच पालिका आयुक्तांच्या दालनांसह अनेक प्रशस्त दालने आहेत. आधुनिकतेचा साज म्हणून इमारतीत लिफ्ट आणि वातानुकूलित यंत्रे बसवण्यात आली आहेत. मात्र, वास्तूच्या कोणत्याही रचनेत बदल न करता ही वास्तू जपण्यात आली आहे. इमारतीसमोर फिरोजशहा मेहता यांचा पुतळा आहे. तर समोरच सेल्फी पॉईंट आहे.

हेही वाचा - मोबाईल हिसकावणाऱ्या टोळीच्या खेरवाडी पोलिसांनी आवळल्या मुसक्या

हेही वाचा - मुंबई मेट्रोची कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करावीत – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.