ETV Bharat / state

'बाळासाहेबांच्या पुतळ्याच्या नव्या जागेचा प्रस्ताव मंजूर, पुढील परवानग्या घेऊन लवकरच पुतळा उभारणार' - बाळासाहेब ठाकरे पुतळा

दक्षिण मुंबईत 'गेट वे ऑफ इंडिया'जवळील रिगल सिनेमा, छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, महाराष्ट्र पोलीस महासंचालक कार्यालयासमोरील श्यामाप्रसाद मुखर्जी चौकातील बेटावर शिवसेना प्रमुखांचा ९ फुटी पुतळा उभारला जाणार आहे. यासाठी २ फूट उंच हिरवळ (लँडस्केप) सह ११ फूट उंच चबुतरा उभारला जाणार आहे.

balasaheb thackeray statue
महापौर किशोरी पेडणेकर
author img

By

Published : Jan 21, 2020, 8:42 PM IST

मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा मुंबईत उभारण्यात येणार आहे. पुतळ्याची जागा बदलल्याने नव्याने परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे पुतळ्याचे बाळासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी लोकार्पण होण्याची शक्यता नाही. मात्र, बाळासाहेबांच्या जयंतीचे औचित्य साधून आज पुतळ्याच्या नव्या जागेचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. यानंतर आता पुढील परवानग्या घेऊन पुतळा लवकरच उभारला जाईल, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.

बाळासाहेबांच्या पुतळ्याच्या नव्या जागेचा प्रस्ताव मंजूर

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा १७ नोव्हेंबर २०१२ ला मृत्यू झाला. बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा गेटवे ऑफ इंडिया येथील महाराष्ट्र पोलीस मुख्यालयाच्यासमोर उभारण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समितीचे तत्कालीन अध्यक्ष यशोधर फणसे यांनी ऑक्टोबर २०१५ ला गटनेत्यांच्या बैठकीत मांडला. त्याला तत्कालीन महापौर स्नेहल आंबेकर यांनी मंजुरी देऊन पालिका आयुक्तांच्या मंजुरीसाठी पाठवला होता. पालिका आयुक्तांच्या अभिप्रायानंतर हा प्रस्ताव महाराष्ट्र पुरातत्व कमिटी, मुंबई अर्बन आर्टस् कमिशन तसेच राज्य सरकाराच्या गृह विभागाकडे मंजुरीसाठी पाठवला होता. याच दरम्यान पुतळा उभारण्यासाठी जागा अपूरी पडणार असल्याने स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय आणि नॅशनल गॅलरी ऑफ मॉर्डन आर्टस इमारतीसमोरील चौकात बसवावा, अशी सूचना केली. त्याप्रमाणे प्रस्ताव बनवण्यात आला. त्यावर चौकात आणि दुभाजकाच्या जागी पुतळा उभारता येत नाही. पुतळा उभारणीसाठी विशेष बाब म्हणून पालिका सभागृहाची परवानगी आवश्यक असल्याचा अहवाल प्रशासनाने दिला. त्याप्रमाणे आज पालिका सभागृहात विशेष बाब म्हणून बाळासाहेबांचा पुतळा उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली.

balasaheb thackeray statue
बाळासाहेबांच्या पुतळ्याच्या नव्या जागेचा प्रस्ताव मंजूर

आज बाळासाहेब ठाकरे यांच्या नव्या पुतळ्याच्या जागेचा प्रस्ताव सभागृहात मंजूर झाला आहे. बाळासाहेब ठाकरे यांची येत्या २३ जानेवारीला जयंती आहे. या जयंतीचे औचित्य साधून हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. आजपासून खऱ्या अर्थाने पुतळा उभारण्यासाठी परवानगी मिळवण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. आता लवकरच राज्य शासन, कला संचालक महाराष्ट्र राज्य (सर जेजे स्कुल ऑफ आर्टस्) यांचे ना हरकत प्रमाणपत्र, प्रमुख वास्तूविशारद महाराष्ट्र शासन, पोलीस आयुक्त वाहतूक, कार्यकारी अभियंता वाहतूक व समन्वय यांचे ना हरकत प्रमाणपत्र, हेरिटेज कंझर्व्हेशन कमिटी यांची परवानगी घेतली जाईल. या विभागांची परवानगी मिळताच पुतळ्याचे अनावरण केले जाईल. पुतळ्याला परवानग्या मिळाव्यात म्हणून सभागृह नेत्या विशाखा राऊत, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव आणि मी स्वतः पाठपुरावा करत असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले. बाळासाहेबांचा पुतळा उभारताना कोणत्याही प्रकारच्या त्रुटी शिल्लक राहू नये यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे महापौरांनी सांगितले.

हे वाचलं का? - 'आव्हान म्हणून स्वीकारल्यास डॉ.आंबेडकरांचे स्मारक दोन वर्षात होणार पूर्ण'

'या' ठिकाणी उभारणार पुतळा -

दक्षिण मुंबईत गेट वे ऑफ इंडियाजवळील रिगल सिनेमा, छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, महाराष्ट्र पोलीस महासंचालक कार्यालयासमोरील श्यामाप्रसाद मुखर्जी चौकातील बेटावर शिवसेना प्रमुखांचा ९ फुटी पुतळा उभारला जाणार आहे. यासाठी २ फूट उंच हिरवळ (लँडस्केप) सह ११ फूट उंच चबुतरा उभारला जाणार आहे.

हे वाचलं का? - बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीदिनी पुतळ्याचे अनावरण अशक्य; महापौरांचे संकेत

धोरण शिथिल -
महानगरपालिकेच्या नियमानुसार, वाहतूक बेटे आणि फुटपाथवर पुतळा उभारण्यात येऊ नये, असे धोरण आहे. मात्र, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा उभारणे ही एक अपवादात्मक आणि विशेष बाब म्हणून फक्त या पुतळा उभारणीस मुंबई महानगरपालिकेने हे धोरण शिथिल केले आहे.

Intro:मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा मुंबईत उभारण्यात येणार आहे. पुतळ्याची जागा बदलल्याने नव्याने परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे पुतळयाचे बाळासाहेबांच्या जयंतीदिनी लोकार्पण होण्याची शक्यता नाही. मात्र बाळासाहेबांच्या जयंतीचे औचित्य साधून आज पुतळ्याच्या नव्या जागेचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. यानंतर आता पुढील परवानग्या घेऊन पुतळा लवकरच उभारला जाईल अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. Body:शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा १७ नोव्हेंबर २०१२ ला मृत्यू झाला. बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा गेटवे ऑफ इंडिया येथील महाराष्ट्र पोलीस मुख्यालयाच्या समोर उभारण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समितीचे तत्कालीन अध्यक्ष यशोधर फणसे यांनी ऑक्टोबर २०१५ ला गटनेत्यांच्या बैठकीत मांडला. त्याला तत्कालीन महापौर स्नेहल आंबेकर यांनी मंजुरी देऊन पालिका आयुक्तांच्या मंजुरीसाठी पाठवला होता. पालिका आयुक्तांच्या अभिप्रायानंतर हा प्रस्ताव महाराष्ट्र पुरातत्व कमिटी, मुंबई अर्बन आर्टस् कमिशन, तसेच राज्य सरकाराच्या गृह विभागाकडे मंजुरीसाठी पाठवला होता. याच दरम्यान पुतळा उभारण्यासाठी जागा अपूरी पडणार असल्याने स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय आणि नॅशनल गॅलरी ऑफ मॉर्डन आर्टस इमारतीसमोरील चौकात बसवावा, अशी सूचना केली. त्याप्रमाणे प्रस्ताव बनवण्यात आला. त्यावर चौकात आणि दुभाजकाच्या जागी पुतळा उभारता येत नाही. पुतळा उभारणीसाठी विशेष बाब म्हणून पालिका सभागृहाची परवानगी आवश्यक असल्याचा अहवाल प्रशासनाने दिला. त्याप्रमाणे आज पालिका सभागृहात विशेष बाब म्हणून बाळासाहेबांचा पुतळा उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली.

याबाबत बोलताना आज बाळासाहेब ठाकरे यांच्या नव्या पुतळ्याच्या जागेचा प्रस्ताव सभागृहात मंजूर झाला आहे. बाळासाहेब ठाकरे यांची येत्या २३ जानेवारीला जयंती आहे. या जयंतीचे औचित्य साधून हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. आजपासून खऱ्या अर्थाने पुतळा उभारण्यासाठी परवानगी मिळवण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. आता लवकरच राज्य शासन, कला संचालक महाराष्ट्र राज्य (सर जेजे स्कुल ऑफ आर्टस्) यांचे ना हरकत प्रमाणपत्र, प्रमुख वास्तूविशारद महाराष्ट्र शासन, पोलीस आयुक्त वाहतूक, कार्यकारी अभियंता वाहतूक व समन्वय यांचे ना हरकत प्रमाणपत्र, हेरिटेज कंझर्व्हेशन कमिटी यांची परवानगी घेतली जाईल. या विभागांची परवानगी मिळताच पुतळ्याचे अनावरण केले जाईल. पुतळ्याला परवानग्या मिळाव्यात म्हणून सभागृह नेत्या विशाखा राऊत, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव आणि मी स्वता पाठपुरावा करत असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले. बाळासाहेबांचा पुतळा उभारताना कोणत्याही प्रकारच्या त्रुटी शिल्लक राहूनये यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे महापौरांनी सांगितले.

इथे उभारणार पुतळा -
दक्षिण मुंबईत गेट वे ऑफ इंडियाजवळील रिगल सिनेमा, छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, महाराष्ट्र पोलीस महासंचालक कार्यालयासमोरील श्यामाप्रसाद मुखर्जी चौकातील बेटावर शिवसेनाप्रमुखांचा ९ फुटी पुतळा उभारला जाणार आहे. यासाठी २ फूट उंच हिरवळ (लँडस्केप) सह ११ फूट उंच चबुतरा उभारला जाणार आहे.

धोरण शिथिल -
महानगरपालिकेच्या नियमानुसार, वाहतूक बेटे आणि फुटपाथवर पुतळा उभारण्यात येऊ नये, असे धोरण आहे. मात्र, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा उभारणे ही एक अपवादात्मक आणि विशेष बाब म्हणून फक्त या पुतळा उभारणीस मुंबई महानगरपालिकेने हे धोरण शिथिल केले आहे.

महापौर किशोरी पेडणेकर बाईट Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.