ETV Bharat / state

कोरोना काळात पालिकेची बायोमेट्रिक हजेरी; कामगार संघटनांचा आंदोलनाचा इशारा - employees against bio metric punching

मुंबई महापालिकेच्या दोन हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूची लागण झाली असून 90 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. अशा परिस्थितीत बायोमेट्रिक हजेरी सक्तीची केल्यास बायोमेट्रिक मशीनला कामगारांच्या हाताचा स्पर्श होईल. यामुळे कोरोना प्रसार वाढेल या भीतीमुळे कामगारांनी बायोमेट्रिक हजेरीला विरोध केला आहे. महापालिकेच्या निर्णयाविरोधात कामगार संघटनांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

Mumbai corona news
मुंबई कोरोना न्यूज
author img

By

Published : Jul 2, 2020, 10:54 AM IST

मुंबई- मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना महापालिकेच्या कार्यालयांमध्ये बायोमेट्रिक हजेरी बंद करण्यात आली होती. मात्र, तीन महिन्यांनी बायोमेट्रिक हजेरी सक्तीची केल्याने त्याला कामगार आणि कामगार संघटनांकडून विरोध केला जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव मुंबईत आजही असल्याने कामगारांना बायोमेट्रिक हजेरीची सक्ती करु नये, अशी मागणी केली जात आहे. दरम्यान, कामगार संघटनांनी पालिका आयुक्तांच्या निर्णयाविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे.

मुंबईत कोरोनाचे रोज हजारांहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. त्यांना आरोग्य सेवा देण्याचे तसेच शहरातील स्वच्छता ठेवण्याचे नागरिकांना पाणीपुरवठा करण्याचे काम पालिका कर्मचारी करत आहेत. हे पालिका कर्मचारी बहुतेक करुन मुंबई बाहेरुन येतात. मुंबईच्या बाजूच्या जिल्ह्यांमध्येही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यामुळे कंटेनमेंट झोनमध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावर येणे शक्य होत नाही. कर्मचाऱ्यांना बस स्टॉप किंवा रेल्वे स्टेशनपर्यंत जाण्यासाठी वाहतुकीची सोय नसल्याने त्यांना वेळेवर कामावर पोहोचणे अशक्य आहे. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होई पर्यंत बायोमेट्रिक हजेरी लागू करू नये, अशी मागणी कामगारांची आहे.

मुंबई महापालिकेच्या दोन हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूची लागण झाली असून 90 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. अशा परिस्थितीत बायोमेट्रिक हजेरी सक्तीची केल्यास बायोमेट्रिक मशीनला कामगारांच्या हाताचा स्पर्श होणार असल्याने, कोरोनाचा प्रसार होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. बायोमेट्रिक हजेरी सक्तीचे करण्याच्या पालिका आयुक्तांच्या निर्णयाचा दि म्युनिसिपल युनियनने निषेध व्यक्त केला आहे. याविरेाधात तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे युनियनचे सरचिटणीस रमाकांत बने यांनी स्पष्ट केले. बायोमेट्रीक हजेरी आणि 100 टक्के उपस्थितीबाबत परिपत्रक काढून करून प्रशासनाने कर्मचाऱ्यांना कामचुकार ठरवून अवसान घातकी निर्णय घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मुंबई मनपा कामगार कर्मचारी संघटना समन्वय समितीचे निमंत्रक अ‌ॅड. प्रकाश देवादास यांनीही याचा निषेध नोंदवत आंदोलनाचा इशारा दिला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.