ETV Bharat / state

BMC Demolishes Silver Smelting unit : सोनं चांदी वितळवण्याच्या कारखान्यांच्या चिमण्या उद्ध्वस्त, 5 हजार कोटींहून अधिक नुकसान, सोनं व्यापारी चिंतेत - BMC demolished silver Smelting unit

BMC Demolishes Silver Smelting unit : 'पालिकेच्या एका नोटीसमुळे आमचं तब्बल 5 हजार कोटींहून अधिकचं नुकसान होणार आहे' असं व्यापारी असोसिएशनचे राष्ट्रीय प्रवक्ते कुमार जैन यांनी सांगितलंय. महापालिकेनं सोन्या-चांदीच्या स्मेल्टिंग युनिटवर कारवाई केल्यानंतर त्यांनी ईटीव्ही भारतशी संवाद साधलाय.

BMC Demolishes Silver Smelting unit
BMC Demolishes Silver Smelting unit
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 10, 2023, 5:42 PM IST

कुमार जैन यांची प्रतिक्रिया

मुंबई BMC Demolishes Silver Smelting unit : बृहन्मुंबई महानगरपालिकेनं दक्षिण मुंबईतील काळबादेवी, झवेरी बाजार परिसरात सोन्या-चांदीच्या स्मेल्टिंग युनिटच्या चार चिमण्या पाडल्या आहेत. महानगरपालिकेच्या म्हणण्यानुसार, महानगरातील मार्गदर्शक सूचनांचं पालन न केल्यानं महानगरपालिकेच्या सी-वॉर्ड विभागानं चार युनिट्सवर कारवाई केली आहे. सणासुदीच्या काळात पालिकेनं कारवाई केल्यानं सराफ व्यापारी चिंतेत आहेत.

दिवाळीत सोन्याच्या किंमतीत वाढ : या संदर्भात ईटीव्ही भारतशी बोलताना व्यापारी असोसिएशनचे राष्ट्रीय प्रवक्ते कुमार जैन म्हणाले की, "बर्‍याच दिवसांनी दिवाळीच्या हंगामात सोन्याच्या दरात वाढ झाली होती. त्यातच पालिकेनं केलेल्या कारवाईचा मोठा परिणाम कारागिरांवर होत आहे. येथील कारागिरांना अगोदरच अत्यल्प काम मिळत होतं. जिथं चिमणी वापरली जाते, तिथं सोनं वितळवणं तसंच त्यासंबंधीची रासायनिक कामं केली जातात. याकडं नगरपालिकेनं लक्ष दिलेलं नाही. आधीच या कारागिरांना काम मिळत नव्हतं. त्यामुळं पालिकेनं केलेल्या कारवाईमुळं कारागिरांची दिवाळी गोड होणार नसल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय.

कारागिरांवर उपासमारीची वेळ : पुढं बोलताना जैन यांनी सांगितलं, "पालिकेनं कारागिरांचं काम बंद करून चुकीचं पाऊल टाकलं आहे. सरकारनं आधी या कामगारांना इतर ठिकाणी स्थलांतरित करणं आवश्यक होतं. त्यांच्या हाताला काम देणं आवश्यक होतं. मात्र, तसं न करता प्रशासनानं थेट यांना काम बंद करण्याचे आदेश दिले आहेत. पालिकेच्या एका नोटीसमुळं कारागिरांवर सध्या उपासमारीची वेळ आहे', असं जैन म्हणाले.

5 हजार कोटींचं नुकसान : पालिकेनं सराफांना पाठवलेल्या नोटीचा फटका सर्वांनाच बसणार आहे. कारागिरांचं काम बंद झाल्यानं, सोन व्यापाऱ्यांना देखील दागिने मिळणार नाही. त्यामुळं त्याचा संपूर्ण सोन्याच्या बाजारपेठेवर परिणाम होणार आहे. तब्बल 5000 कोटी रुपयांहून नुकसान या कालावधीत होणार असल्याचं जैन यांनी सांगितलं.

हेही वाचा -

  1. Chief Minister Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांकडून एमएमआरडीएच्या कर्मचाऱ्यांसह मुंबईकरांना दिवाळी भेट, केली 'ही' घोषणा
  2. Mumbai Delhi Pollution : मुंबई-दिल्लीच्या धर्तीवर प्रदूषणाची पातळी नियमित राखण्यासाठी जिल्ह्यातील यंत्रणा सज्ज
  3. Mumbai Air Pollution : वायू प्रदूषण टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी कसली कंबर; 'इतक्या' वाहनांवर केली कारवाई

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.