ETV Bharat / state

७२ हजार रेमडिसीवीर इंजेक्शन विकत घेण्याचा पालिकेचा निर्णय, १० हजार उपलब्ध - मुंबई लेटेस्ट न्यूज

रेमडिसीवीर या इंजेक्शनचे १० हजार नग (व्हायल) महानगरपालिकेला उपलब्ध झाले आहेत. महानगरपालिकेच्या अखत्यारितील विविध रुग्णालये आणि जम्बो कोविड सेंटर्समध्ये सदर इंजेक्शन्स उपलब्ध करून देण्यात आले असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

७२ हजार रेमडिसीवीर इंजेक्शन विकत घेण्याचा पालिकेचा निर्णय, १० हजार उपलब्ध

author img

By

Published : Oct 1, 2020, 1:34 AM IST

मुंबई - कोरोना रुग्णांसाठी महत्त्वाचे असणाऱ्या रेमडिसीवीर इंजेक्शनचा साठा मुंबई महापालिकडे कमी असल्याचे समोर आले होते. त्यानंतर ७२ हजार इंजेक्शन नग (व्हायल) खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी रेमडिसीवीर या इंजेक्शनचे १० हजार नग (व्हायल) महानगरपालिकेला उपलब्ध झाले आहेत. महानगरपालिकेच्या अखत्यारितील विविध रुग्णालये आणि जम्बो कोविड सेंटर्समध्ये सदर इंजेक्शन्स उपलब्ध करून देण्यात आले असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची रोग प्रतिकार शक्ती कमी होते. रुग्णांची रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी रेमडिसीवीर इंजेक्शन दिले जाते. मार्केटमध्ये या इंजेक्शनचा साठा कमी असल्याने काळ्या बाजारात ही इंजेक्शन विकली जातात. यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना आर्थिक भुर्दंड पडत असतो. त्यासाठी पालिकेने आपल्या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना रेमडिसीवीर इंजेक्शन देता यावीत म्हणून महापालिकेने २० हजार इंजेक्शन म्हणजेच व्हायल खरेदी केले होते. त्यापैकी ३ हजार इंजेक्शन बाकी राहिले होते.

कोरोनाबाधित रुग्णांना आवश्यक ते सर्व उपचार, औषधी पुरविण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने कोणतीही कमतरता ठेवलेली नाही. रेमडिसीवीर या इंजेक्शनची संभाव्य परिणामकारकता लक्षात घेता कोविड बाधितांवर उपचारासाठी महानगरपालिकेने ७२ हजार इंजेक्शन नग (व्हायल) खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करुन संबंधित कंपनीकडे मागणीदेखील नोंदविण्यात आली आहे. त्यानुसार एकूण ७२ हजार पैकी पहिल्या टप्प्यातील १० हजार रेमडिसीवीर इंजेक्शन नग ३० सप्टेंबर रोजी प्राप्त झाले आहेत.

पुरविण्यात आलेले रेमडिसिवीर इंजेक्शन -

सेव्हन हिल्स रुग्णालय १,५००; के. ई. एम. रुग्णालय, परळ ८००; नायर रुग्णालय, मुंबई सेंट्रल ८००; संचालक वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये १७००; लोकमान्य टिळक महानगरपालिका रुग्णालय, शीव (सायन) ८००; कूपर रुग्णालय, विलेपार्ले ६००; हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे, ट्रॉमा रुग्णालय, जोगेश्वरी ५००; प्रमुख वैद्यकीय अधीक्षक व उपनगरीय रुग्णालये १०००; बी. के. सी. (एम.एम.आर.डी.ए.) कोविड सेंटर ५००; दहिसर कोविड सेंटर ५००; नेस्को कोविड सेंटर, गोरेगांव ५००; एन. एस. सी. आय. कोविड सेंटर, वरळी ५००; रिचर्डसन ऍण्ड क्रुडास, मुलुंड ३०० असे एकूण १०,०००.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.