मुंबई : सध्या महाराष्ट्रात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराची प्रकरण चर्चेत आहे. कोरोना काळात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी केंद्रीय तपास यंत्रणा करत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसआयटी स्थापन करून या भ्रष्टाचाराच्या चौकशीचे आदेश दिले. आता ठाकरे गटाच्या शाखा सरकारच्या निशाण्यावर आल्या आहेत. वांद्रे पूर्व येथील ठाकरे गटाच्या शाखेवर पालिकेने थेट बुलडोझर चालवला आहे. यामुळे राज्यातील वातावरण अजून जास्त तापण्याची शक्यता आहे.
दुहेरी संकट : एका बाजूला केंद्रीय तपासणीच्या चौकशीच्या फेऱ्यात ठाकरे गटाचे माजी नगरसेवक व पालिकेचे काही अधिकारी अडकलेले आहेत. या चौकशीचे धागेदोरे मातोश्रीपर्यंत देखील जाऊ शकतात, असा आरोप वेळोवेळी भाजपकडून केला जात आहे. ठाकरे गटासमोर दोन्ही बाजुने संकट आले आहे. एका बाजूला केंद्रीय तपास यंत्रणांचे संकट आहे. तर दुसऱ्या बाजूला पालिकेच्या कारवाईचे संकट ठाकरे गटासमो उभे राहिले आहे. कोविड काळात विविध कामांमध्ये तब्बल 12 हजार 024 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप कॅगच्या अहवालातून करण्यात आला केला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात चौकशीचे आदेश दिले आहेत. यामुळे खुद्द मातोश्रीच चौकशीच्या फेऱ्यात अडकली आहे.
जाणून बुजून कारवाई ? : बृहन्मुंबई महानगरपालिकेने वांद्रे पूर्व येथील ठाकरे गटाच्या एका शाखेवर बुलडोझर चालवला आहे. कारवाई करताना पालिकेच्या अधिकाऱयांनी ही शाखा अनधिकृत असल्याचे सांगितले. महत्त्वाची बाब म्हणजे मातोश्रीपासून अगदी हाकेच्या अंतरावर ही शाखा आहे. दरम्यान ही कारवाईवरुन सरकार जाणूनबुजून ठाकरे गटाला डिवचाण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप, ठाकरे गटाकडून केला जात आहे. आधी ज्या-ज्या लोकांनी बीएमसीतील कामावरून शिवसेनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांच्यावर बीएमसीने कारवाई केली होती. मग ती रेडिओ जॉकी मलिष्का असो की अभिनेत्री कंगना राणावत. आता थेट बीएमसीने ठाकरे गटाला टार्गेट केले आहे.
ठाकरे गटावर उलटला बुलडोझर : काही वर्षांपूर्वी आरजे मलिष्काने रस्त्यांवरील खड्ड्यांच्या मुद्द्यावरून बृहन्मुंबई महानगरपालिकेला काही प्रश्न विचारले होते. यासंदर्भातील तिचे गाणे देखील व्हायरल झाले होते. त्यानंतर लगेचच पालिकेने आरजे मलिष्काच्या घरावर कारवाई केली होती. दुसरीकडे अभिनेत्री कंगना राणावतने सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणावेळी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खडेबोल सुनावले होते. यावेळी देखील पालिकेने कंगनाच्या कार्यालयावर कारवाई केली होती. मागील कित्येक वर्ष पालिकेत सत्ताधारी असलेल्या शिवसेनेने आपल्या विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी पालिकेच्या यंत्रणेचा वापर केल्याचा आरोप वेळोवेळी केला जात होता. आता पालिकेने थेट ठाकरे गटाविरोधातच बुलडोझर उभा केल्याने चर्चांना उधाण आले आहे.
हेही वाचा-