ETV Bharat / state

Gold Medal : अंध मुलींचा नवा विक्रम! पोहण्याच्या स्पर्धेत महाराष्ट्राला मिळवून दिले सुवर्णपदक - National Para Swimming Championship

नोव्हेंबर २०२२ गुवाहाटी आसाम इथे २२व्या राष्ट्रीय पॅरा-जलतरण स्पर्धा पार पडली ( National Para Swimming Championship ). कुमारी सिद्दी दळवी आणि रोशनी पात्रा या दोन्ही मुलींनी महाराष्ट्राची मान उंचावत ५० मीटर व १०० मीटर फ्री स्टाईल व १०० मीटर बॅक स्ट्रोक या प्रकारात ३ सुवर्ण पदकं मिळवत नवीन राष्ट्रीय विक्रम ( 3 gold medals for Maharashtra ) केला.

Gold Medal
Gold Medal
author img

By

Published : Nov 30, 2022, 5:21 PM IST

मुंबई : नोव्हेंबर २०२२ गुवाहाटी आसाम इथे २२व्या राष्ट्रीय पॅरा-जलतरण स्पर्धा पार पडली ( National Para Swimming Championship ). कुमारी सिद्दी दळवी आणि रोशनी पात्रा या दोन्ही मुलींनी महाराष्ट्राची मान उंचावत ५० मीटर व १०० मीटर फ्री स्टाईल व १०० मीटर बॅक स्ट्रोक या प्रकारात ३ सुवर्ण पदकं मिळवत नवीन राष्ट्रीय विक्रम (3 gold medals for Maharashtra ) केला. दोन्ही विद्यार्थिनी अंध आहेत. दोन्हींच्या या नव्या विक्रमामुळे महाराष्ट्र राज्याचे जलतरण स्पर्धेत नाव कोरले गेले. जाणून घेऊया सविस्तर वृत्तांत.

अंध मुलींचा नवा विक्रम

वास्तव स्वीकारले आणि मुलीला घडवले : पात्रा कुटुंबाला मुलगी झाली आणि आई साक्षी हिला दोन महिन्यानंतर लक्षात आलं की आपली मुलगी रोशनी तिचे नाव तर ठेवले आहे रोशनी. मात्र तिला डोळ्याने दिसत नाही. तेव्हा त्यांनी डॉक्टरांकडे तपासणी केली असता मुलगीला डोळ्याने दिसत नसल्याचे लक्षात आले. मात्र त्यांनी जिद्द सोडले नाही हिंमत हरले नाही आहे ते वास्तव स्वीकारलं आणि मुलीला घडवले आज रोशनीने सर्व मुलींसाठी आशेचा किरण दाखवलाय तर सिद्धी दळवीने देखील मूर्ती लहान आणि कीर्ती महान हे सिद्ध करून दाखवले (Siddi Dalvi Para Swimming Competition Winner ) आहे. गुहाटी येथे राष्ट्रीय पेरलिंपिक स्विमिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत दोघींनी सुवर्ण पदक मिळवले आहे.

सर्व अवयव सुदृढ : आई-वडिलांच्या पोटी जन्म घेताना जन्मतः सर्व अवयव सुदृढ असतात. त्यांना समाजामध्ये सर्व गोष्टींचा अनुभव सर्व इंद्रियांनी घेता येतो. मात्र जन्मतः ज्यांना कुठल्यातरी इंद्रिया मध्ये सक्षमता नसते. त्यांना मात्र त्या अनुभवापासून पारखे व्हावे लागते, असे असूनही रोशनी पात्रा 10 वी आणि सिद्धी दळवी इयत्ता 9 वी या दोन्ही अंध असलेल्या विद्यार्थिनींनी महाराष्ट्राचे नाव राष्ट्रीय स्तरावर चमकावले. नुकतेच त्यांनी राष्ट्रीय पॅरालिम स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक मिळवले. रोशनीचे वडील कल्याण येथे खाजगी कंपनीत काम करतात तर आई गृहिणी आहे. सिद्धी दळवीचे देखील अंधेरीत वडील खाजगी कंपनीत काम करतात आणि आई गृहिणी आहे. दोन्ही मुलींच्या पालकांनी आपल्या मुलींना पुढील आयुष्यात आव्हानांना तोंड द्यावे लागेल म्हणून लहानपणापासूनच खडतर आणि अथक मेहनत घेण्याची सुरुवात केली. त्याचा परिणाम असा झाला की राष्ट्रीय कार्यालय स्विमिंग स्पर्धेमध्ये अव्वल आल्या. राज्याची मान देखील उंचावली.

रोशनीने आशेचा किरण दाखवला : यासंदर्भात रोशनी पात्रा हिला विचारले वतीने सांगितले की," जेव्हा आईला लक्षात आलं की मला डोळ्याने दिसत नाही परंतू 2017 मध्ये आमच्या वाधवा स्पोर्ट्स क्लबमध्ये गेले आणि तिथून आम्हाला संधी मिळाली. आणि माझ्या मनातील भीती गेली. आत्मविश्वासा आला आणि मी पोहायला शिकले .अर्थात आमच्यासारख्यांना सर्व प्रकारची मदत सर्व प्रकारचे प्रशिक्षण तर शासनाने दिले पाहिजे. नुकतेच आम्ही राष्ट्रीय पेरलिंपिक या स्पर्धेमध्ये अव्वल सुवर्ण पदक मिळवलेले ( Roshni Patra Para Swimming Competition Winner ) आहे. 100 मीटर फ्रीस्टाइल तसेच बॅक स्ट्रोक पोहणे, अशा दोन्ही रीतीने आणि 50 मीटर मध्ये देखील पोहणे यामध्ये पदक मिळवलेल आहे. आणि यामध्ये माझ्या आईचा मीनाक्षी पात्रा हीच वाटा आणि आमचे व्यवस्थापक सुनीता जोशी यांचा वाटा मोठा आहे."

आईची जिद्द देखील कामी आली : रोशनी पात्रा हिची आई मीनाक्षी ईटीवी सोबत संवाद साधताना म्हणाल्या जेव्हा आम्हाला ही डोळ्याने अंध आहे असे समजले तेव्हा खूप ताण आला. परंतू त्यानंतर मनाला समजावले आणि तिच्यासाठी आम्ही सर्व प्रकारची तयारी सुरू केली. 2017 मध्ये हिला पोहण्यासाठी स्पोर्ट क्लब येथे होण्याची हलकीशी संधी मिळाली तिचं तिने सोने केले. दिव्यांग व्यक्तींना प्रशिक्षक मिळणे मोठी अवघड समस्या असते. पण प्रशिक्षक यांनी जे अवघड मार्गदर्शन केलं व्यवस्थापक त्यांनी मार्गदर्शन केलं त्यामुळे आमची मुलगी विक्रम करू शकली."

मूर्ती लाहान पण कीर्ती महान सिद्धी दळवी : सिद्धी दळवी देखील जन्मताच दोन्ही डोळ्याने अंध आहे. त्यामुळे तिला देखील अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला. सिद्धी दळवी म्हणते "2017 पासून मी देखील पोहायला सुरुवात केली. मात्र आम्हाला कोच नेमके मिळाले नव्हते. कारण दोन्ही डोळयांना दिसतनाही तेव्हा वेगळ्या प्रकारच्या प्रशिक्षणाची गरज आम्हाला असते. एकेक महिना फक्त मला कोच मिळायचे मात्र वेगवेगळ्या कोच कडून शिकून शिकून प्रशिक्षण घेतले. जर प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थिनीने ते दिव्यांग असो किंवा नसो नियमितपणे आपल्या आवडीचा खेळ किंवा विषय यामध्ये झोकून द्या आणि त्यावर मेहनत घ्या म्हणजे तुम्हाला नक्की यश मिळेल. निराश होऊ नका. तसेच माझ्या आई आणि वडिलांनी कायम मला पाठिंबा दिला समर्थन दिले. माझ्या शाळेने देखील मला खूप प्रोत्साहित केले." असे सिद्धी म्हणाली." मला देखील डोळ्याने कमी दिसते आणि हिचा भाऊ देखील डोळ्याने कमीच दिसणार आहे. मात्र हिला मी 2017 पासून पोहोण्याची संधी दिली आणि सर्व परीने मेहनत घेतली आणि जिद्दीमुळे हिला यश मिळाले." असे सिद्धीची आई प्रतीक्षा दळवी म्हणाल्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.