ETV Bharat / state

Black Magic in Boriwali : बोरिवलीतील इमारतीत अंधश्रद्धेचे प्रकार? दक्ष रहिवाशांची कारवाईची मागणी

बोरिवलीतील गोराई दीपस्तंभ या इमारतीत अंधश्रद्धेचे प्रयोग केले जात असल्याचे आरोप तेथे राहणाऱ्या एका रहिवाशाने केले आहेत. याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांना देखील पत्र लिहिले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात त्याची कोणतीही दखल घेण्यात न आल्याने तक्रारदार रहिवाशाने बोरिवली पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि लेखी तक्रार दिली आहे.

Black Magic Type In Boriwali
अंधश्रद्धेचे प्रकार
author img

By

Published : Feb 23, 2023, 9:44 PM IST

तक्रादार अंधश्रद्धेच्या प्रकाराविषयी कैफियत मांडताना

मुंबई: तक्रारदार अमेय गावडे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले की, त्यांच्या इमारतीच्या आवारात इमारतीत लिंबू उतारे पडलेल्या अनेकदा दिसून आले आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्या दरवाजात देखील मीठ, मोहरी टाकल्याचा संतप्त प्रकार घडला होता. या प्रकारानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून कारवाई करण्याची विनंती केली होती. मात्र याची दखल घेण्यात आली नाही. त्यानंतर आता बोरिवली पोलीस ठाण्यात याबाबत लेखी तक्रार देण्यात आली आहे. बोरिवली पोलीस ठाणे याची दखल घेईल आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत कारवाई करेल अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे.

उल्टा चोर कोतवाल को डाटे: अमेय गावडे यांनी पोलिसांना दिलेल्या पत्रात असे नमूद केले आहे की, घडलेला सगळा विचित्र प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला. मात्र, बिल्डिंगच्या सेक्रेटरीने त्यांना सीसीटीव्ही फूटेज दाखविण्यास नकार दिला. यानंतर तक्रारदार गावडे यांनी स्वतःचे सीसीटीव्ही लावले यामध्ये कुंडीभोवती मंत्रोपचार होत असल्याचे दिसत आहे. यानंतर कुंडीवरून झालेल्या वादातून सेक्रेटरी गावडे यांच्या अंगावर धावत आला आणि त्यांना धमकावले. सेक्रेटरी अमेय गावडे यांना म्हणाला, तू जास्त बोललास तर मी तुझ्यावर ॲक्शन घेईल आणि वरून प्रेशर आणेन.

आता पोलीस म्हणतात, कारवाई करतो: सेक्रेटरीच्या धमक्यांना घाबरून इमारतीतील इतर लोक काहीही बोलायला तयार नाहीत. मीठ, मोहरी नाहीतर रेती पडलेली असल्याचे पोलिसांनी सांगितले. तक्रारदाराने इमारतीत सुरू असलेल्या अंधश्रद्धेचे प्रकार कमिटीला वारंवार निदर्शनास आणून दिले, असे पोलिसांना दिलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे. माझ्या घरात लहान मुले आणि वयोवृद्ध माणसे आहेत. त्यामुळे पेणकरांनी केलेल्या अंधश्रद्धेच्या प्रकारामुळे त्यांच्या मनावर परिणाम होऊ शकतो, असे अमेय गावडे यांनी सांगितले. याप्रकरणी बोरिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निनाद सावंत यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी हे पत्र आम्हाला प्राप्त झाले असून या प्रकरणाची शहानिशा करून योग्य ती कारवाई केली जाईल असे त्यांनी सांगितले.

पुण्यात जादुटोण्याचे प्रयोग? विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात जादूटोणा करुन अघोरी पूजा केली जात असल्याचे प्रकार सातत्याने समोर येत आहे. जानेवारी महिण्यात पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास दोन तृतीयपंथीयांनी चितेजवळ जादूटोण्यासारखे अघोरी कृत्य केल्याचे समोर आले होते. यानंतर आता पुण्यातील धायरी परिसरात घरामध्ये सुख शांती नांदावी भरभराट व्हावी व मुल बाळ व्हावे यासाठी पतीसह सासू सासऱ्यांनी महिलेची अघोरी पूजा केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता.

रुपाली चाकणकर यांची मागणी: विद्येच्या माहेरघर असलेल्या पुणे शहरात अघोरी कृत्य घडलेले होते. यात पैश्यासाठी विवाहितेचा छळ करण्यात आला होता. या महिला अंधश्रध्देच्या माध्यमातून मानवी हाडांची राख खाऊ घालण्यात आलेला होता. मुलं होत नसल्याच्या कारणांमुळे अश्या पद्धतीने अघोरी पूजा करण्यात आली होती. याबाबत सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी पोलिसांकडे कठोर कारवाईची मागणी केली होती.

हेही वाचा: BMC Doctor Saved Girl Child: जन्मताच 'तिचे' शरीर पडले निळे, मुंबई पालिकेच्या डॉक्टरांनी चिमुकलीला मृत्यूच्या दाढेतून खेचले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.