ETV Bharat / state

Film Shyamchi Aai Poster Released : 'श्यामची आई' चित्रपट आता ब्लॅक अँड व्हाईटमधून होणार प्रदर्शित; पोस्टर रिलीज

साने गुरुजी या नावाने सर्वांच्या परिचित असणारे पांडुरंग सदाशिव साने यांनी लिहिलेल्या 'श्यामची आई' या कादंबरीवर याच नावाने मराठी सिनेमा बनवण्यात आला आहे. साने गुरुजींच्या अंतर्मनातून आलेली आईच्या आकृतीचे प्रतिबिंब रुपेरी पडद्यावर सादर करण्याचे शिवधनुष्य 'श्यामची आई' या चित्रपटाच्या माध्यमातून उचलण्यात आले आहे. या चित्रपटाचे नवे कोरं कृष्णधवल पोस्टर नुकतच रिलीज करण्यात आलं आहे.

Black and White Poster of Black and White Film Shyamchi Aai has been released
नवीन चित्रपट 'श्यामची आई' चित्रपट आता ब्लॅक अँड व्हाईटमधून होणार प्रदर्शित; पोस्टर रिलीज
author img

By

Published : Jan 26, 2023, 7:53 PM IST

मुंबई : आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात जिथे कृष्णधवल चित्रपटांना रंगीत बनवण्याची अद्भुत किमया केली जाते, तिथे 'श्यामची आई' हा चित्रपट कृष्णधवल रूपात पहायला मिळणार आहे. यात 'श्याम'च्या भूमिकेत शर्व गाडगीळ, तर आईच्या रूपात गौरी देशपांडे दिसणार आहेत. 'श्यामची आई' ही कादंबरी साने गुरुजी यांनी १९३३मध्ये लिहिली असून, त्यात आईबद्दलचे प्रेम, भक्ती व कृतज्ञता व्यक्त केली आहे.

चित्रपटाद्वारे आईला दैवता मानणारी भारतीय संस्कृती सर्वदूर पोहोचणार : आचार्य अत्रे यांनी या पुस्तकाचे वर्णन 'मातृप्रेमाचे महामंगल स्तोत्र' असे केले आहे. त्यांचाच वारसा जपत 'श्यामची आई' या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली. आईला दैवता मानणारी भारतीय संस्कृती सर्वदूर पोहोचावी, या उद्देशाने 'श्यामची आई' चित्रपटाची निर्मिती करण्यात आल्याची भावना निर्मात्या अमृता अरुण राव यांनी व्यक्त केली आहे.

निर्मात्या अमृता अरुण राव यांची निर्मिती : अमृता फिल्म्सच्या बॅनरखाली निर्मात्या अमृता अरुण राव यांनी 'श्यामची आई' चित्रपटाची निर्मिती केली आहे. सुजय डहाके या प्रयोगशील तरुण दिग्दर्शकानं या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटाच्या टायटलसोबत 'पांडुरंग सदाशिव साने (साने गुरुजी) यांच्या कादंबरीवर आधारीत' असं लिहून हा चित्रपट नेमका कशावर आधारलेला आहे याचा खुलासा करण्यात आला आहे. या चित्रपटात ओम भुतकरनं साने गुरुजींची भूमिका साकारली असून, यापूर्वी एका लक्षवेधी पोस्टरच्या माध्यमातून ओमचा साने गुरुजी लुक रिव्हील करण्यात आला आहे.

'श्यामची आई' या चित्रपटातील प्रमुख कलाकार : प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर 'श्यामची आई' या चित्रपटाचे नवे कोरं कृष्णधवल पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. या निमित्ताने गौरी आणि शर्व हे दोन चेहरे प्रकाशझोतात आले आहेत. या चित्रपटात ओम भूतकर मयूर मोरे, संदीप पाठक, सारंग साठ्ये, उर्मिला जगताप, दिशा काटकर, गंधार जोशी, अनिकेत सागवेकर, ज्योती चांदेकर आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक सुनिल सुकथनकर यांनी या चित्रपटासाठी संहितालेखन केलं आहे. छायांकन विजय मिश्रा यांनी केलं असून, बी. महातेश्वर यांनी संकलन केलं आहे. मेकअप महेश बराटे यांनी केला असून, वेशभूषा नामदेव वाघमारे यांची आहे. संगीत अशोक पत्कींनी दिलं असून, पार्श्वसंगीत साकेत-आभा यांचं आहे. आकीब सय्यद यांनी ध्वनी आरेखन, तर कुणाल लोणसुरे यांनी ध्वनीमुद्रण केलं आहे. कला दिग्दर्शन अमेय भालेराव यांनी केलं आहे.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.