ETV Bharat / state

घड्याळाची टिकटिक वाढली; भाजप-मनसेच्या 'या' माजी आमदारांचा आज राष्ट्रवादीत प्रवेश

author img

By

Published : Oct 2, 2019, 3:02 PM IST

Updated : Oct 2, 2019, 3:13 PM IST

विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट वाटप सुरू झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इनकमिंग सुरू झाले आहे. आज नाशिकमधील मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राहुल ढिकले हे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. राहुल ढिकले हे माजी खासदार उत्तमराव ढिकले यांचे चिरंजीव आहेत. ढिकले हे नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून ईच्छूक आहेत. याचबरोबर भाजपचे माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी देखील राष्ट्रवादीची वाट धरली आहे.

भाजप-मनसेच्या 'या' माजी आमदारांचा आज राष्ट्रवादीत प्रवेश

मुंबई - विधानसभेची रणधुमाळी सुरू झाली आहे. निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठ्या प्रमाणात गळती लागली होती. त्यात राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते भाजपच्या गळाला लागले. त्यामुळे राष्ट्रवादीची दयनीय अवस्था निर्माण झाली होती. मात्र शरद पवारांनी राज्यात झंझावती दौरे करून राष्ट्रवादी अजून मजबूत असल्याचे दाखवून दिले होते. दरम्यान, आता सर्वच पक्षांनी तिकीट वाटप सुरू केले आहे. त्यामुळे आता सर्वच पक्षातून नाराजी नाट्याचा अंक सुरू झाला आहे. सुरुवातीला आऊट गोईंचा फटका बसलेल्या राष्ट्रवादीमध्ये जोरदार इनकमिंग सुरू झाले आहे. राष्ट्रवादीमध्ये आजही काही दिग्गज नेत्यांचा प्रवेश होणार आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट वाटप सुरू झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इनकमिंग सुरू झाले आहे. आज नाशिकमधील मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राहुल ढिकले हे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. राहुल ढिकले हे माजी खासदार उत्तमराव ढिकले यांचे चिरंजीव आहेत. ढिकले हे नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून ईच्छूक आहेत. याचबरोबर भाजपचे माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी देखील राष्ट्रवादीची वाट धरली आहे. ते आज राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. ते सिन्नर मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी ईच्छूक आहेत. त्यांनी २०१४ मध्ये भाजपातून निवडणूक लढवली होती. मात्र शिवसेना उमेदावरा वाजे यांनी त्यांचा पराभव क ेला होता.

याच बरोबर आज दुपारी नाशिकमधील मनसेचे माजी आमदार वसंत गिते हे देखील आज मुंबईत राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. वंसत गिते हे मनसेमधून भाजपमध्ये गेले होते. मात्र भाजपने पहिली उमेदवारी जाहीर केल्यानंतर उमेदवारी न मिळाल्यामुळे वसंत गिते हे भाजपमधून बाहेर पडणार आहेत. ते आज कमळाची साथ सोडून हातात घड्याळ बांधणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसला सुरूवातील मोठी गळती लागली होती. मात्र आता त्यांचे इनकमिंग जोरात सुरू झाले आहे. अनेक पक्षांतील नाराज व दिग्गज नेते आता राष्ट्रवादीच्या आश्रयाला येऊ लागले आहेत. यापूर्वीच पंढरपूरचे काँग्रेसचे आमदार भारत भालकेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यावेळी अजित पवार म्हणाले होते,की उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत निघून गेल्यानंतर सर्व चित्रं स्पष्ट होईल. त्यांनी आमचे उमेदवार पळवले.. सुरुवात त्यांनी केली होती. मात्र शेवट आम्ही करणार असे म्हणत आम्ही आता काट्याने काटा काढणार असल्याचे वक्तव्य केले होते. आता भाजप, मनसे, शिवसेना पक्षातील अनेक नेते राष्ट्रवादीच्या गळाला लागायला सुरुवात झाली आहे. मात्र तिकीट न मिळाल्याने हे नेते राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत. पंरतु हे आयाराम निवडणुकींच्या रणांगणात निवडून येणार का हे येणारा काळचं ठरवेल.

Intro:Body:

राष्ट्रवादी मध्ये या नेत्यांचा प्रवेश होणार आहे

राहुल ढिकले, (माजी खासदार उत्तमराव ढिकले यांचे चिरंजीव )

माणिकराव कोकाटे, (माजी आमदार भाजप)

तर दुपारनंतर

वसंत गिते, माजी आमदार मनसे (नाशिक) यांचा प्रवेश होणार आहे

Conclusion:
Last Updated : Oct 2, 2019, 3:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.