ETV Bharat / state

धनंजय मुंडे प्रकरणी भाजपाची कोलांटी उडी; आता म्हणतात रेणू शर्मावर कारवाई करा - भाजपा नेत्या चित्रा वाघ धनंजय मुंडे पाठींबा

एका महिलेने सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात बलात्काराची तक्रार दाखल केल्याने खळबळ उडाली होती. आता त्या महिलेने आपली तक्रार मागे घेतली आहे. भाजपानेही लगेच पलटी मारत रेणू शर्मावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Chitra Wagh
चित्रा वाघ
author img

By

Published : Jan 22, 2021, 9:52 AM IST

मुंबई - राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात रेणू शर्मा या महिलेने बलात्काराची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर भाजपाने आक्रमक होत मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. आता रेणू शर्माने ही तक्रार मागे घेतली आहे. तर, भाजपाने देखील पलटी मारत, एखाद्यावर खोटे आरोप करणे चुकीचे आहे. त्यामुळे रेणू शर्मावर कलाम 192 नुसार कारवाई व्हावी, अशी मागणी केली आहे. भाजपा महिला मोर्चाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी याबाबत एक व्हिडिओ जाहीर केला आहे.

रेणू शर्मावर कारवाई करण्याची मागणी करताना चित्रा वाघ

चित्रा वाघ यांनी केले होते आंदोलन -

भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या नेतृत्वाखाली महिला मोर्चाकडून आंदोलन करण्यात आले होते. सामाजिक न्याय या सारखे खाते सांभाळणाऱ्या व्यक्तीवर एका महिलेकडून झालेले आरोप पाहता धनंजय मुंडे यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली होती. एखाद्या महिलेने कॅबिनेट मंत्र्यावर आरोप करणे हे गंभीर आणि धक्कादायक आहे. राजकीय दबावाला बळी न पडता पोलिसांनी चौकशी करावी, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली होती. पोलिसांनी या प्रकरणी कोणत्याही दबावाला बळी न पडता तपास केला पाहिजे. मुलीने केलेल्या आरोपामध्ये काही जर तथ्य असेल आणि धनंजय मुंडे दोषी आढळले तर नियमाप्रमाणे शिक्षा व्हावी, असेही त्यांनी म्हटले होते.

आता काय म्हणाल्या चित्रा वाघ -

धनंजय मुंडे यांच्याविरोधात लैंगीक अत्याचाराची तक्रार दाखल केलेल्या महिलेने ती मागे घेतली आहे. सुरुवातीला आम्हाला वाटले की, या आरोपांमध्ये तथ्य आहे म्हणूनच ही महिला जाहीरपणे आरोप करत आहे. राज्यात चुकीचे उदाहरण रूढ होऊ नये, म्हणून आम्ही धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र, आता त्या महिलेने आरोप मागे घेतले आहेत. एखादी सामान्य व्यक्ती असो किंवा राजकीय नेता, अशा आरोपांमुळे त्याचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते. काही महिलांमुळे ज्या खरोखर पीडित महिला आहेत त्यांनाही न्याय मिळत नाही. रेणू शर्मावर पोलिसांनी कलाम 192 नुसार कारवाई करावी, अशी मागणी चित्रा वाघ यांनी आता केली आहे.

काय आहे प्रकरण -

रेणू शर्मा या महिलेने धनंजय मुंडे यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली होती. या महिलेचा आरोप आहे की, 'धनंजय मुंडे यांनी मला सांगितले की तुम्हाला गायक बनायचे असेल तर मी चित्रपट जगतातील बड्या चित्रपट दिग्दर्शक आणि निर्मात्यांसमवेत तुझी भेट करुन देतो आणि बॉलीवूडमध्ये लॉन्च करेन. याचे आमिष दाखवून त्यांनी माझ्या इच्छेविरूद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मुंडे यांनी सतत लैंगिक अत्याचार केले. जेव्हा-जेव्हा माझी बहीण कामानिमित्त बाहेर पडली, तेव्हा ते मला शारीरिक संबंध बनवण्यास भाग पाडत असत. बलात्काराचा आरोप झाल्यानंतर भाजपाने धनंजय मुंडे यांच्या विरोधात आघाडी उघडली होती. त्यांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र, धनंजय मुंडे यांनी या आरोपांचे खंडन करत सोशल मीडियावर स्पष्टीकरणही दिले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.