ETV Bharat / state

OBC RESERVATION : भाजपचे चक्का जाम आंदोलन, चित्रा वाघसह अनेकांना पोलिसांनी घेतले ताब्यात

author img

By

Published : Jun 26, 2021, 4:53 PM IST

नवी मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक व कळंबोली टोलनाका परिसरातही भाजप कार्यकर्त्यांचा आक्रोश पाहायला मिळाला. ओबीसी राजकीय आरक्षणासाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांनी भाजप नेत्या चित्रा वाघसह अनेक आंदोलनकांना ताब्यात घेतले.

new mumbai
new mumbai

नवी मुंबई - स्थानिक स्वराज्य निवडणुकीत ओबीसी आरक्षण रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यासाठी शनिवारी (26 जून) राज्यभरात चक्काजाम आंदोलने करण्यात आली. नवी मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक व कळंबोली टोलनाका परिसरातही भाजप कार्यकर्त्यांचा आक्रोश पाहायला मिळाला.

भाजप नेत्या चित्रा वाघ

आंदोलनामुळे कळंबोली टोल नाक्यावर वाहनांच्या रांगाच रांगा -

नवी मुंबई परिसरातील कळंबोली टोल नाक्यावर मुंबई-पुणे महामार्गावर ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी भाजप नेत्यांनी आंदोलन केले. या आंदोलनामुळे मुंबई-पुणे महामार्गावर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या. परिणामी सामान्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.

भाजप आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात -

स्थानिक स्वराज्य निवडणुकीत आरक्षण रद्द झाल्यामुळे राज्य सरकारच्या विरोधात नवी मुंबई भाजपच्या वतीने आज छत्रपती शिवाजी महाराज चौकात चक्का जाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनावेळी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी भाजप नेत्या चित्रा वाघ, माजी खासदार संजिव नाईक, आमदार रमेश पाटील, जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत तसेच नवी मुंबई भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

हेही वाचा - ओबीसी आरक्षण :पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर भाजपाचा रास्ता-रोको; माजी मंत्र्यांना घेतले ताब्यात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.