ETV Bharat / state

मुंबईत भाजप-मनसेची युती होणे कठीण, राजकीय विश्लेषकाचे मत - Mumbai election news

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महापालिकेतील सत्ता ताब्यात घेण्यासाठी राजकीय पक्षाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सध्या भाजपा आणि मनसेच्या युतीची चर्चा सुरू असून ही युती मुंबईसाठी होण्याची शक्यता कमी आहे आणि झालीच तर त्याचा फटका भाजपाला बसण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केली जात आहे.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Aug 7, 2021, 7:43 PM IST

मुंबई - राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षी होत आहेत. या स्थानिक स्वराज्य संस्था आपल्या ताब्यात घेण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. त्याचप्रमाणे देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमधील महापालिकाही ताब्यात घेण्यासाठी राजकीय पक्षांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सध्या भाजपा आणि मनसेच्या युतीची चर्चा सुरू असून ही युती मुंबईसाठी होण्याची शक्यता कमी आहे आणि झालीच तर त्याचा फटका भाजपाला बसण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केली जात आहे.

मुंबईत भाजप-मनसेची युती होणे कठीण,

भाजपचे शिवसेनेला आव्हान

मुंबई महानगरपालिकेवर गेले २५ वर्षाहून अधिक काळ शिवसेनेची सत्ता आहे. या सत्तेच्या काळात शिवसेना आणि भाजपाची युती होती. २०१४ मध्ये देशात नरेंद्र मोदी पंतप्रधान होताच राज्यातही भाजपची सत्ता आली. त्यानंतर मात्र भाजपाने मुंबई महापालिका ताब्यात घेण्याची तयारी सुरू केली. २०१६ मध्ये मुंबईमधील वॉर्डची पुनर्रचना केली. त्यामाध्यमातून २०१७ च्या निवडणुकीत भाजपाने एकट्याने निवडणूक लढवून आपले ८२ नगरसेवक निवडून आणले. २०१२ च्यानिवडणुकीत भाजपचे ३२ नगरसेवक होते. मात्र २०१७ मध्ये सत्ताधाऱ्यांच्या बरोबरीने नगरसेवक निवडून आणल्याने भाजपाने सत्ताधारी शिवसेनेला आव्हान दिले आहे.

भाजपा मनसे युती

२०१९ मध्ये राज्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. शिवसेना आणि भाजपाची युती तुटल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्याने त्याचा फायदा आघाडीमधील पक्षांना होत आहे. मुंबई महापालिकेसह इतर महापालिकांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला फायदा होईल या शक्यतेने भाजपा आणि मनसे या दोन राजकीय पक्षांमध्ये युतीची चर्चा सुरू झाली आहे.

राजकीय पक्षांची मुंबईतील ताकद

मुंबई महापालिकेत शिवसेनेचे ९७ नगरसेवक आहेत. भाजपाचे ८३ नगरसेवक आहेत. काँग्रेसचे २९, राष्ट्रवादीचे ८, समाजवादी पक्षाचे ६, मनसेचा १, एमआयएमचे २ तर अरुण गवळी यांच्या अभासेचा १ नगरसेवक आहे. पालिकेच्या नियमानुसार ज्या पक्षाचे जास्त नगरसेवक त्या पक्षाचा महापौर असा नियम आहे. त्यानुसार महापालिकेत शिवसेनेचा महापौर आहे. २०१७ च्या निवडणुकीत शिवसेनेचे ८४ नगरसेवक निवडून आले होते. अपक्ष नगरसेवकांच्या मदतीने शिवसेनेने आपला महापौर मुंबई महापालिकेत बसवला आहे. महापौर पदावरचा दावा आणखी घट्ट व्हावा म्हणून मनसेच्या ७ पैकी ६ नगरसेवकांना शिवसेनेने पक्षात प्रवेश दिला आहे.

भाजपाला राजकीय दृष्ट्या घाट्याचे

भाजपाला आपला महापौर मुंबई महापालिकेवर बसवण्यासाठी संख्याबळ लागणार आहे. त्यासाठी इतर कोणतेही राजकीय पक्ष मदत करण्याची शक्यता कमी आहे. यासाठी मनसेसोबत युती करण्याची चाचपणी सुरू झाली आहे. त्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. भाजपा आणि मनसेची युती झाल्यास ती मुंबई बाहेर होऊ शकते. मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीय मतदार आहेत. मनसेने खुलेआम उत्तर भारतीयांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. उत्तर भारतीयांच्या विरोधात भूमिका घेतल्याने मनसे सोबत युती करणे भाजपाला राजकीय दृष्टया घाट्याचे ठरू शकते. पश्चिम उपनगरात भाजपचे नगरसेवक मोठ्या प्रमाणात निवडून आले आहेत. या विभागात भाजपचे ८२ पैकी सुमारे ५० नगरसेवक निवडून आले आहेत. मनसेसोबत युती झाल्यास भाजपाचे संख्याबळ कमी होऊ शकते अशी शक्यता राजकीय विश्लेषक व जेष्ठ पत्रकार सुनिल शिंदे यांनी व्यक्त केली आहे. भाजपमध्ये नुकताच उत्तर भारतीय नेते म्हणून ओळख असलेल्या कृपा शंकर सिंग, राजहंस सिंग यांनी प्रवेश केला आहे. हे नेते उत्तर भारतीयांचे नेते म्हणून ओळखले जातात. भाजपाने मनसे सोबत युती केल्यास या नेत्यांना ही युती आवडणार नाही नाही. हे नेते यावरून नाराज होतील असे विश्लेषकांचे म्हणणे आहे.

मनसेची मुंबईत ताकद किती

मनसेचे २०१२ च्या महापालिका निवडणुकीत २९ नगरसेवक निवडून आले होते. २०१७ च्या निवडणुकीत मनसेचे ७ नगरसेवक निवडून आले आहेत. त्यापैकी ६ नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे मुंबईमध्ये सध्या मनसेचा एकच नगरसेवक आहे. मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची संख्याही मुंबईत कमी आहे. यामुळे भाजप मुंबईसोडून पुणे, नाशिक अशा ठिकाणी मनसेची युती करू शकते, अशी शक्यता राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केली जात आहे.

मुंबई महापालिकेतील सध्याचे पक्षीय बलाबल

शिवसेना – ९७

भाजप – ८३

काँग्रेस – २९

राष्ट्रवादी – ८

समाजवादी पक्ष – ६

मनसे – १

एमआयएम – २

अभासे – १

हेही वाचा - तेजस ठाकरे बनणार का शिवसेनेचे आक्रमक बॅट्समन?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.