ETV Bharat / state

MNS Toll Plaza Vandalise : टोलनाका राड्यानंतर मनसे-भाजपमध्ये जुंपली; मनसेकडून भाजपला जशाच तसे उत्तर - संदीप देशपांडेंची भाजपवर टीका

मनसेच्या कार्यकर्त्यांनी रविवारी नाशिक येथील टोलनाका फोडला होता. त्यानंतर आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या राड्यानंतर मनसे आणि भाजपमध्ये जुंपली आहे. याप्रकरणी अमित ठाकरे खोटे बोलत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. तर, भाजपला कंत्रादारांची दलाली करायची आहे का? असा सवाल मनसेने विचारला आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Jul 25, 2023, 5:27 PM IST

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी नाशिकमध्ये टोल नाक्याची तोडफोड केली होती. ही घटना रविवारी रात्री अडीच वाजता घडली होती. राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे शनिवारी मुंबईच्या दिशेने येत होते. यादरम्यान रात्री ९.१५ च्या सुमारास सिन्नर येथील गोंदे टोल नाका येथे फास्टटॅगमध्ये गडबड झाल्याने अमित ठाकरे यांचा ताफा काही काळ थांबला होता. त्यामुळे संतप्त झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी रात्री टोल नाक्याची तोडफोड केली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता भाजप आणि मनसेमध्ये जुंपली आहे.

  • अमीत ठाकरे टोल नाका फोडणे म्हणजे राजकारण नाही. कधीतरी बांधायलाही शिका आणि शिकवा.#Tollnaka #BJPMaharashtra #BJPGovt pic.twitter.com/BBRfDT9rlP

    — भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) July 24, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मनसे विरुद्ध भाजपा - एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी बंड केल्यानंतर भाजप आणि मनसेमध्ये जवळीक वाढल्याचे पाहायला मिळत होते. आगामी निवडणुकीत हे दोन्ही पक्ष एकत्र येऊन निवडणुका लढवतील अशा चर्चा होत्या. मात्र, त्यातच आता या टोल नाकावरील राड्यानंतर मनसे आणि भाजपमध्ये जुंपल्याचे पाहायला मिळत आहे. मनसे कार्यकर्त्यांनी टोल नाका फोडण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अमित ठाकरे यांनी सदर घटनेवर स्पष्टीकरण दिले. मात्र, अमित ठाकरे खोटे बोलत असल्याचे भाजपचे म्हणणे आहे. या संदर्भात महाराष्ट्र भाजपच्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला असून, त्याला 'अमित ठाकरे टोल नाका फोडणे म्हणजे राजकारण नाही. कधीतरी बांधायलाही शिका आणि शिकवा' असे कॅप्शन देण्यात आले आहे.

मणिपूरमधील घटनेबद्दल थोबाड बंद ठेवणाऱ्या भाजपाला महाराष्ट्राला मुजोर टोल कंत्रादारांची दलाली करायची आहे का? - संदीप देशपांडे, मनसे नेते

या देशात संविधान आहे. कायदा आहे. येथे कायद्याने राज्य चालते. त्यामुळे कायदा हाती घेण्याचा अधिकार कोणालाही नाही. आता अमित ठाकरेंना का अडवले? त्यांच्या फास्ट टॅगमध्ये काय अडचणी होत्या याचा तपास करावा लागेल. पण, अमित ठाकरेंना का अडवले त्याची तक्रार करू शकता. त्यासाठी तोडफोड करण्याची गरज नाही. या राज्याला कार्यक्षम आणि तात्काळ निर्णय घेणारे गृहमंत्री लाभले आहेत. ते म्हणाले मणिपूर विषयावर भाजप गप्प का? पण, मणिपूर आणि या घटनेचा काय संबंध? मणिपूर विषयावर चर्चा करायला भाजपा तयार आहे. पण विरोधी पक्ष आगीत तेल ओतण्याचे काम करते - राम कदम, आमदार, भाजप

मनसेचे भाजपला उत्तर - भाजपने पोस्ट केलेल्या या व्हिडिओला आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी देखील जशास तसे उत्तर दिले आहे. या संदर्भात संदीप देशपांडे यांनी ट्विट केले असून, त्यांनी आपल्या ट्विटमध्ये, 'मणिपूरमधील घटनेबद्दल थोबाड बंद ठेवणाऱ्या भाजपा महाराष्ट्राला मुजोर टोल कंत्रादाराची दलाली करायची आहे का?' असा सवाल देशपांडे यांनी विचारला आहे.

नेमके प्रकरण काय - समृद्धी महामार्गावरील गोंदे फाटा टोल नाक्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. या प्रकरणी पोलिसांनी मनसेच्या 8 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले असून, एकूण 12 ते 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तोडफोडीत पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद याप्रकरणी दाखल गुन्ह्यात करण्यात आली आहे.

हेही वाचा -

  1. MNS Vandalise Toll Plaza : टोलनाका फोडण्याच्या सूचना राज ठाकरेंच्या मुलाने दिल्या नसतील- मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
  2. MNS Workers Vandalize Toll Plaza: अनधिकृत टोलनाक्याविरोधात आंदोलन करणाऱ्या मनसेकून पुन्हा राडा, अमित ठाकरेंच्या दौऱ्यात काय घडले?
  3. MNS Toll Vandalism : टोलनाका फोडणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याची राष्ट्रवादीची मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.