ETV Bharat / state

बंदी घातलेले चिनी अ‌ॅप वापरतो महाराष्ट्र भाजप, सचिन सावंत यांचा आरोप - sachin sawant on bjp app use

स्वतः खोट्या राष्ट्रप्रेमाचे गोडवे गायचे आणि दुसऱ्यांना मात्र देशद्रोही ठरवायचा भाजप व त्यांच्या परिवारातील संघटनांचा उद्योग सुरूच असतो. मात्र, त्यांचे हे राष्ट्रप्रेम बनावटी असून त्यांचा खरा चेहरा पुन्हा एकदा उघडा पडला आहे, असे सावंत म्हणाले.

सचिन सावंत
सचिन सावंत
author img

By

Published : Aug 25, 2020, 3:20 PM IST

मुंबई- मोदी सरकारने देशात चिनी कंपनी निर्मित अ‌ॅप्स वापरावर बंदी घातलेली असताना, त्यांचाच भारतीय जनता पक्ष अत्यंत निर्लज्जपणे बंदी घातलेले चिनी अ‌ॅप्स आजही वापरत आहेत. भाजपाची ही कृती प्रचंड चिड आणणारी आहे. बंदी घातलेले चिनी अ‌ॅप्स वापरून भाजपने चीनबद्दल आजही प्रचंड प्रेम असल्याचे दाखवून दिले आहे. अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

भाजपच्या बेगडी राष्ट्रप्रेमाचा फुगा फुटला असून भाजप गद्दार असल्याची टीका देखील सावंत यांनी केली आहे. सावंत पुढे म्हणाले की, चीनने आगळीक करत भारताच्या सीमेत घुसखोरी करून २० भारतीय सैनिकांची हत्या केली. त्यावेळी, देशभरातून प्रचंड संताप व्यक्त होत असताना काहीतरी कारवाई केल्याचे भासवण्यासाठी चिनी कंपन्यांच्या ५९ अ‌ॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला. यामध्ये कॅमस्कॅनर या अ‌ॅपचाही समावेश आहे. परंतु, महाराष्ट्र भाजप आजही हे अ‌ॅप वापरत आहे.

कालच (२४ ऑगस्ट २०२०) जारी केलेल्या एका प्रेस नोटसाठी त्यांनी बंदी घातलेल्या कॅमस्कॅनर या अ‌ॅपचा वापर केलेला आहे. मोदी सरकारने बंदी घातलेली असतानाही असे अ‌ॅप्स वापरणारे महाराष्ट्र भाजप हे भारतात नाही का? का त्यांना विशेष सवलत देण्यात आली आहे ? असे सवाल उपस्थित करून चिनी अ‌ॅप्सवर बंदी घालण्याचा मोदी सरकारचा निर्णय आणि ‘आत्मनिर्भर अभियान’ हे सुद्धा धुळफेकच आहे, असे सावंत म्हणाले.

तसचे, स्वतः खोट्या राष्ट्रप्रेमाचे गोडवे गायचे आणि दुसऱ्यांना मात्र देशद्रोही ठरवायचा भाजप व त्यांच्या परिवारातील संघटनांचा उद्योग सुरूच असतो. मात्र, त्यांचे हे राष्ट्रप्रेम बनावटी असून त्यांचा खरा चेहरा पुन्हा एकदा उघडा पडला आहे, असे सावंत म्हणाले. चीनने सीमेवर आगळीक केल्यानंतर देशभरातील संतापाचे भांडवल करत भाजप व त्यांच्या समर्थक संघटनांना राष्ट्रप्रेमाची भरती आली होती. चिनी कंपन्यांचे कोणतेही साहित्य खरेदी करू नये, ‘बॅन चायना’ या कॅम्पेनमध्ये हेच ‘तथाकथित राष्ट्रप्रेमी’ लोकंं होते. विशेष म्हणजे, बंदी घातलेले चिनी ‘टीकटॉक’ हे आपल्या खास उद्योगपती मित्राला मिळावे यासाठी धडपड कोण करत होते, हेही काही लपून राहिलेले नाही. अशा खरमरीत शब्दात सावंत यांनी भाजपच्या खोट्या राष्ट्रप्रेमाचा बुरखा फाडला.

हेही वाचा- 'सामना' : विकासनिधीच्या उपोषणावर काँग्रेस आमदारांची कान उघडणी, तर राष्ट्रवादीला टोला

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.