मुंबई - भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आज (शुक्रवारी) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी ही भेट झाली.
भेटीचं कारण?
राज ठाकरेंसोबत नाशिकला अचानक भेट झाली होती. त्यावेळेला त्यांच्याशी बोलणं झालं होतं आणि त्यावेळी त्यांनी घरी यायचं आमंत्रण दिलं होतं. घरी चहा प्यायला बोलावणं ही महाराष्ट्राची संस्कृती, पंरपरा आहे. त्यानंतरच्या आमंत्रणानंतर आज भेटायला आलो. या भेटीत परप्रांतीयांच्या भूमिकाबाबत चर्चा झाली. राज यांनी क्लिप दाखवली. युतीची नाही तर एकमेकांच्या भूमिकांसदर्भात चर्चा झाली.
माणूस म्हणून आणि कार्यकर्ता म्हणून दोन भूमिका कोणाच्याही असतात. मोठ्या भूमिकेत येण्यासाठी, महाराष्ट्राचा नेता होण्यासाठी त्यांनी व्यापक भूमिका घेणं गरजेचं आहे, असेही चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
मनसे आणि भाजप एकत्र येण्याचा प्रस्ताव नाहीच, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. मात्र, यासोबतच युतीबाबत प्रत्येक गोष्टीची एक वेळ यावी लागते. त्यांच्या मनात परप्रांतीयांबाबत कोणतीच कटूता नाही. मात्र, ते त्यांच्या व्यवहारात प्रकट व्हावी. माझी भूमिका ही स्थानिकांना प्राधान्य द्या, अशाप्रकारे ते लोकांसमोर आणणं हे महत्त्वाचे आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
संजय राऊत यांच्याबाबत काय प्रतिक्रिया?
शिवसेनेचा प्रभाव मुंबईत असेल तर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय राऊत यांनी महानगरपालिकेची निवडणुक लढवून दाखवावी, असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केले.