ETV Bharat / state

'...तर शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असता का?' - chandrakant patil press conference mumbai

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर प्रथमच पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. तसेच 25 फेब्रुवारीला राज्यात 400 ठिकाणी धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती दिली.

चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील
author img

By

Published : Feb 17, 2020, 1:06 PM IST

मुंबई - आज दोन्ही काँग्रेस नेत्यांची बैठक आहे. यातून आज संध्याकाळपर्यंत तुम्हाला विसंवाद बाहेर आलेला दिसेल. म्हणून आम्ही सरकार पाडण्याऐवजी सरकार आपोआपच पडेल, असा दावा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. तसेच शिवसेनेने विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढती असती तर शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असता का? असा सवालही त्यांनी यावेळी केला. शिवसेनेने भाजपसोबत युती केली म्हणूनच त्यांनी इतक्या जागांवर मिळवला, असेही ते म्हणाले. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर प्रथमच पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. भाजपचे ज्येष्ठ नेते माधव भंडारी, माजी खासदार किरीट सोमय्या, केशव उपाध्याय आदी पत्रकार परिषदेला उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील यांच्या पत्रकार परिषदेतील प्रमुख मुद्दे -

  • हे सरकार पडणार, ते त्यांच्या विसंवादामुळे. यात भाजपमध्ये दुमत नाही.
  • सर्व तहसिल कार्यक्षेत्रात धरणे आंदोलन. ४०० ठिकाणी ही धरणे आंदोलन होतील.
  • 25 फेब्रुवारीला राज्यात महिला, शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत धरणे
  • नागरिकता संशोधन कायदा, कलम ३७० रद्द करणे, तीन तलाक रद्द करणे यासाठी पंतप्रधानांचे अभिनंदन करणारा ठराव मंजूर करण्यात आला.
  • सरकार पाडण्याची भाषा बंद केली, म्हणजे भाजपने भूमिका बदलली आहे का?
  • सरकारच्या विसंवादामुळे हे सरकार आपोआप पडेल, असे मी याआधी म्हटले होते. आम्हाला सरकार बनवण्यात काही स्वारस्य नाही. त्यामुळे सरकार पडल्यानंतर निवडणुका लागतील, असे मी म्हणालो होतो.
  • भाजप सत्तेत नसल्यामुळे त्यांचे मानसिक संतूलन बिघडले असल्याच्या नवाब मलिक यांच्या आरोपावर पाटील म्हणाले, गेल्या पाच वर्षांत त्यांचे संतूलन बिघडले होते. माझी चिंता करण्याची गरज नाही.
  • इंदूरीकर महाराजांच्या वक्तव्याचे समर्थन करत नाही. मात्र, ते इतरही विषय मांडतात, त्यांच्या एका वक्तव्याने त्यांचे इतर काम नाकारता येणार नाही. महिलांविषयी त्यांनी तसे म्हणायला नको होतो, हे मी पुन्हा सांगतो.
  • भाजपचे नुकतेच राज्य अधिवेशन नवी मुंबईत झाले. त्यात काहीही नवीन नाही तर तो पक्षाचा नियमीत भाग होता. दर तीन वर्षांनी पक्षाचे राज्य अधिवेशन झाले आहे.
  • जनादेशाचा अनादर हा ठराव या अधिवेशनात मंजूर झाला आहे. सरकार पाडण्यात आम्हाला काहीही स्वारस्य नाही. प्रमुख विरोधीपक्ष म्हणून आम्ही काम करणार आहोत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.