ETV Bharat / state

राज्य सरकारकडून जनतेची घोर फसवणूक; भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्येंची टीका - महाराष्ट्र लॉकडाऊन न्यूज

दिवसेंदिवस मुंबईचा कोरोनाचा आकडा हा खूप वाढत चालला आहे. त्यामुळे राज्य सरकारने कोरोनाव्हायरस "ब्रेक द चैन" नावाने एक नवीन उपक्रम केला आहे. व्यावसायिकांची दुकाने ही दिवसभर बंद राहिल्याने काल संपूर्ण राज्यभरातून व्यावसायिकांनी या निर्बंधाविरुध्द रस्त्यावर आंदोलन केले. या सगळ्या प्रकरणावर भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

महाविकास आघाडी सरकारवर टीका
महाविकास आघाडी सरकारवर टीका
author img

By

Published : Apr 7, 2021, 3:36 PM IST

मुंबई - दिवसेंदिवस मुंबईचा कोरोनाचा आकडा हा खूप वाढत चालला आहे. त्यामुळे राज्य सरकारने कोरोनाव्हायरस "ब्रेक द चैन" नावाने एक नवीन उपक्रम केला आहे. व्यावसायिकांची दुकाने ही दिवसभर बंद राहिल्याने काल संपूर्ण राज्यभरातून व्यावसायिकांनी या निर्बंधाविरुध्द रस्त्यावर आंदोलन केले. या सगळ्या प्रकरणावर भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. महाविकास आघाडी सरकारने जनतेची घोर फसवणूक केलेली आहे. रोज बदलणारे नियम आणि मंत्र्यांची परस्परविरोधी विधाने पाहता राज्य सरकारची परिस्थिती म्हणजे "कन्फ्युजन ही कन्फ्युजन है सोल्युशन का कुछ पता नही" अशी झालेली आहे, अशी टीका पत्रकार परिषदेत उपाध्याय यांनी सरकारवर केली.

राज्यभरात गोंधळाची परिस्थिती...

केशव उपाध्याय यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर टीका करत बोलले की, राज्यात कठोर निर्बंध लावले जाणार आहेत. आठवड्याच्या अखेरीस शनिवार आणि रविवार पूर्ण लॉकडाऊन असेल, सरकारमधील चार मंत्र्यांनी विविध वृत्तवाहिन्यांवर सांगितले होते. जनतेच्या हिताचा सरासर विचार करून हा निर्णय घेतला होता, असेही मंत्र्यांनी आवर्जून सांगितले होते. मात्र, मंगळवारी राज्यभरातील गोंधळाची परिस्थिती पाहता राज्य सरकारने विरोधी पक्षांसह जनतेचीसुद्धा फसवणूक केली आहे. पोलीस आणि अधिकाऱ्यांच्या मदतीने प्रत्येक जिल्ह्यात बाजारपेठा तसेच दुकाने बंद केल्याचे चित्र मंगळवारी पाहायला मिळाले. महाविकास आघाडी सरकारला कठोर निर्बंध का लॉकडाऊन लागू करायचा असा सवाल केशव उपाध्याय यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

आर्थिक मदत द्यावी...
राज्यावरील हे संकट टाळण्यासाठी जबाबदार विरोधी पक्ष म्हणून सरकारला साथ देण्यास भाजपा तयार आहे. मात्र, सरकारने सामान्य गोरगरीब, कष्टकरी वर्गाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी सरकारने या वर्गाला आर्थिक मदत द्यावी असे भाजपने सुचवले होते. मात्र सरकारने या वरती कोणताही निर्णय जाहीर केले नाही. तसेच तात्काळ पोलीस आणि प्रशासन यंत्रणेद्वारे व्यापारी वर्गावर दबावतंत्र आणत व्यावसायिकांची दुकाने बंद केली. या सगळ्या प्रकरणाचा विरोधी पक्ष म्हणून आम्ही निषेध करत आहोत अशी प्रतिक्रिया केशव उपाध्याय यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.