मुंबई - भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीच्या प्रचाराला २४ मार्चला सुरुवात होणार आहे. युतीची पहिली जाहीर सभा कोल्हापूर येथून होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे इत पदाधिकारी उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मंगळवारी रात्री गेले होते. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील युतीच्या नेत्यांनी तीन ते चार प्रचार सभा आपल्या क्षेत्रात घ्याव्यात. या सभा पहिल्या महासभेच्या आधी व्हाव्यात असे निर्देश वरिष्ठांनी दिल्याचे सांगण्यात येत आहे.
महाराष्ट्रात ४८ लोकसभेच्या जागा आहेत. महाराष्ट्र हे उत्तर प्रदेशानंतरचे लोकसभा जागा असणारे दुसरे मोठे राज्य आहे. भाजप आणि शिवसेनेने अनुक्रमे २५ ते २३ जागा लढण्याचे ठरवले आहे.
लोकसभेच्या ५४३ जागांसाठी या निवडणुका होत आहेत. एकूण सात टप्प्यात मतदान होईल. ११ एप्रील ते १९ मे च्या दरम्यान देशभरात मतदान होईल. २३ मे ला या देशात कुणाचे सरकार स्थापन होणार हे स्पष्ट होईल.