ETV Bharat / state

Pravin Darekar On Bhupesh Baghel : भूपेश बघेल यांच्या सट्टेबाजांशी असलेल्या कनेक्शनचे काँग्रेसने उत्तर द्यावे; दरेकर यांचा सवाल - सट्टेबाजांशी असलेल्या कनेक्शन

Pravin Darekar On Bhupesh Baghel : छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (CM Bhupesh Baghel) यांचे सट्टेबाजांशी संबंध असल्याची माहिती उघड करण्यात आली आहे. याप्रकरणी आतापर्यंत 14 जणांना अटक केली आहे. काँग्रेसने नैतिकतेचे कांदे आता नाकाने सोलू नयेत, याबाबत काँग्रेसने उत्तर द्यावे, असा सवाल भारतीय जनता पक्षाच्या वतीनं करण्यात आला आहे.

Pravin Darekar On  Bhupesh Baghel
भूपेश बघेल आणि प्रवीण दरेकर
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 4, 2023, 10:15 PM IST

माहिती देताना प्रवीण दरेकर

मुंबई Pravin Darekar On Bhupesh Baghel : मुख्यमंत्री भूपेश बघेल (CM Bhupesh Baghel) यांचे नाव महादेव ॲप (Mahadev App) प्रकरणात समोर आले आहे. भूपेश बघेल यांचा सट्टेबाजांशी संबंध असून त्यांनी या ॲपच्या माध्यमातून गोळा झालेला पैसा निवडणुकीसाठी वापरल्याची माहिती ही हाती येत आहे. याप्रकरणी ईडीने त्यांच्यावर छापेमारी केली आहे. यातून आता अनेक बाबी समोर येतील असा दावा प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी केला आहे. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

450 कोटी जप्त : महादेव ॲपच्या माध्यमातून काही लोक परदेशात बसले असून, कोट्यावधी रुपये गोळा करत आहेत. या माध्यमातून गोळा झालेला पैसा अवैधरित्या निवडणुकीसाठी आणि अन्य कामांसाठी वापरला गेल्याची माहिती ईडीच्या हाती लागली होती. त्यानुसार ईडीने छापेमारी करून कारवाई केली आहे. या कारवाईत भूपेश बघेल यांचंही नाव पुढे आले आहे. याप्रकरणी असीमदास याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून पाच कोटी 38 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. तर अन्य काही खातेधारकांच्या नावावर बँकेत पैसे असल्याचे समोर आल्यामुळे, पंधरा कोटी रुपये विविध खात्यांमधील गोठवण्यात आल्याची माहिती दरेकर यांनी दिली. दरम्यान या सर्व प्रकारातून 450 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहे. या रकमेच्या वापराशी काँग्रेसचा संबंध स्पष्ट होत असल्याने, नैतिकतेच्या गप्पा मारणाऱ्या काँग्रेसने आता या प्रश्न उत्तर द्यायला पाहिजे अशी मागणी दरेकर यांनी केली आहे.

संजय राऊत अदखलपात्र : संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका केली आहे. यासंदर्भात विचारले असता दरेकर म्हणाले की, संजय राऊत हे आता अदखलपात्र झालेले आहेत. देशात अमित शहा सक्षमपणे काम करत आहेत. तर राज्यात फडणवीस अत्यंत चांगले काम करत आहेत. हे त्यांना पहावत नाही त्यामुळे ते सतत बोलत राहतात. संजय राऊत हे ड्रग न घेता ड्रग घेतल्यासारखे बोलत राहतात. तर एकनाथ शिंदे हे लोकनेते आहेत त्यांना अनेक लोक भेटत असतात. एसटी कामगारांसाठी सरकारने अत्यंत धाडसी निर्णय घेतला आहे. एसटी कामगारांसाठी सरकार चांगले निर्णय यापुढेही घेईल, एसटीला फायदात आणण्याचा प्रयत्न सरकारच्या वतीनं सुरू असल्याचेही त्यांनी सांगितलं

हेही वाचा -

  1. BJP Leader Murder In Mohla Manpur : भाजपा नेत्याची अज्ञात मारेकऱ्यांकडून हत्या; माजी मुख्यमंत्री रमण सिंग यांचा छत्तीसगड सरकारवर हल्लाबोल
  2. Bhupesh Baghel: तुरुंगातून सुटल्या नंतर सावरकरांची कृती क्रांतिकारी प्रतिमेच्या विरुद्ध होती - भूपेश बघेल
  3. भाजपाच्या टीकेचा काँग्रेसकडून समाचार; गेल्या 70 वर्षांचा दिला हिशोब

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.