ETV Bharat / state

Maharashtra Political Crisis: भाजपचे राजकारण जनतेला अमान्य, निवडणुकांमध्ये चित्र स्पष्ट होणार - Maharashtra Political Crisis

भारतीय जनता पक्षाने आधी शिवसेना पक्ष फोडला आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला आहे. (BJP politics is unacceptable) भाजपची ही राजकीय खेळी असली तरी यामुळे राज्यातील जनता संतापली असून जनतेला हे मान्य (Loksabha Election 2024) नसल्याचे जाणकार सांगत आहेत. (Maharashtra Political Crisis) मात्र आगामी निवडणुकांमध्येच याचे उत्तर मिळेल, असेही जाणकारांचे म्हणणे आहे. (Vidhansabha election 2024)

Maharashtra Political Crisis
भाजप
author img

By

Published : Jul 3, 2023, 10:56 PM IST

भाजपच्या राजकारणावर बोलताना राजकीय विश्लेषक

मुंबई: राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसला सुरुंग लावत भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा आपली कुटील राजकीय नीती दाखवून दिली आहे. (BJP politics is unacceptable) भाजपने आधी उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्ष फोडला (Loksabha Election 2024) आणि आता पुन्हा लोटस ऑपरेशन अंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेसलाही फोडण्यात यश मिळवले आहे. (Maharashtra Political Crisis) यासाठी त्याने साम-दाम-दंड-भेद वापरला असून अशा पद्धतीचे राजकारण हे महाराष्ट्रातल्या जनतेला पटणार राजकारण नाही, अशी प्रतिक्रिया राजकीय विश्लेषक राजेंद्र थोरात यांनी व्यक्त केली आहे. (Vidhansabha election 2024)

2014 पासून घाणेरडे राजकारण: राजकारणामध्ये 2014 पर्यंत नीती आणि मूल्ये यांचा वापर होताना दिसत होता. मात्र, भाजपने राजकारणामध्ये नीती मूल्यांचा ऱ्हास करीत राजकारण सुरू केले. त्यामुळे अशा पद्धतीने होत असलेल्या राजकारणाला महाराष्ट्रातील जनता थारा देणार नाही. आगामी निवडणुकांमध्ये राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तिघांनाही मतदार त्यांची जागा दाखवतील. निवडणुकांच्या माध्यमातून त्यांना फारसे यश येणार नाही; कारण त्यांच्यासोबत काही नेते गेले आहेत. जनता मात्र नाराज आहे, अशी प्रतिक्रिया थोरात यांनी व्यक्त केली आहे.

सत्ताधाऱ्यांची बाजू अधिक मजबूत: दरम्यान, या संदर्भात बोलताना ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अनिकेत जोशी म्हणाले की, भारतीय जनता पक्षाने शिवसेने पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्षसुद्धा फोडला आहे. भाजप हा अन्य पक्षांना फोडून सत्ता टिकवणारा पक्ष आहे, अशी प्रतिमा आता या पक्षाची होत आहे. भाजपने पुन्हा एकदा आपले राजकीय डावपेच दाखवून सत्ता टिकवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसही फोडून दाखवली. यामुळे महाविकास आघाडी कमकुवत झाली असून सत्ताधारी पक्ष अधिक मजबूत झाला आहे, अशी स्थिती सध्या दिसत आहे. याबाबत राज्यातील जनतेने हे किती स्वीकारले आहे हे आगामी निवडणुकीतच समजेल; मात्र सध्या तरी सत्ताधारी पक्ष सुस्थितीत असल्याचे यामुळे दिसून येत आहे असे जोशी म्हणाले.

योग्य जागा वाटप झाल्यास जोरदार टक्कर: शिवसेना-शिंदे गट, राष्ट्रवादी-अजित पवार गट आणि भाजप एकत्र आल्याने आता आगामी निवडणुकांमध्ये विचित्र परिस्थिती निर्माण होणार आहे. कारण यापूर्वी शिवसेना आणि भाजप एकत्र निवडणूक लढले होते. त्यावेळेस शिवसेनेच्या उमेदवारा विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार दिले होते. तर भाजपच्या विरोधात काँग्रेसने उमेदवार दिले होते. त्यानुसार जर आता पाहिले तर जिथे राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले आहेत त्या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार असल्याने नेमके कोणत्या पक्षाला उमेदवारी मिळणार आणि कोणाच्या वाट्याला जागा जाणार हा तिढा यापुढे निर्माण होणार आहे, जर हा प्रश्न या तिन्ही पक्षांनी सामंजस्यांनी सोडवला आणि योग्य जागा वाटप करण्यात ते यशस्वी झाले तर मात्र महाविकास आघाडीत उरलेल्या पक्षांना ते जोरदार शह देऊ शकतील अशी स्थिती सध्या दिसत असल्याचे जोशी म्हणाले.

हेही वाचा:

  1. NCP Political Crisis : शरद पवारांसोबत राष्ट्रवादीची यंगब्रिगेड; ज्येष्ठांची फळी मात्र....
  2. Maharashtra Political Crisis: राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष कोणाचा? कायदेतज्ज्ञ असिम सरोदे म्हणतात.....
  3. Maharashtra Political Crisis : शरद पवार पक्षाचे अध्यक्ष तर पटेल-तटकरेंवरील कारवाई मान्य आहे का, जितेंद्र आव्हाडांची रोखठोक सवाल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.