मुंबई : गेल्या पंचवीस वर्षांपासून मित्रपक्ष असलेल्या शिवसेना भाजपमध्ये 2014 नंतर दरी निर्माण झाली. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने अजित पवार यांना सोबत घेऊन सरकार स्थापन केले. शिवसेनेने भाजपला प्रतिउत्तर देण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कट्टर विरोधक असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सोबत हात मिळवणी करत महाविकास आघाडी केली. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर भाजप आणि शिवसेनेमध्ये मतभेद वाढले. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी लोक माझे सांगाती या पुस्तकातून महाविकास आघाडीचा जन्म, शिवसेना भाजप मधील संघर्षावर भाष्य केले आहे. भाजपने राबवलेल्या ऑपरेशन लोटसवर हल्लाबोल करताना, शिवसेना संपवण्यासाठी आणि स्वबळावर सत्ता मिळवण्यासाठी भाजपने केलेल्या प्रयत्नाचा उल्लेख पुस्तकातून करण्यात आला आहे.
भाजपला शिवसेनेची अडचण : कट्टर हिंदुत्ववादी पक्ष म्हणून भाजपला शिवसेनेचा अडचण होत होता. महाराष्ट्रात शिवसेनेची मोठी ताकद आहे. शहरी, ग्रामीण भागातून तिचे उच्चाटन केल्याशिवाय राज्यात निर्विवाद वर्चस्व मिळवता येणार नाही. त्यासाठी शिवसेना संपवल्याशिवाय स्वबळावर सत्ता येणार नाही, असा चंग भाजपकडून बांधण्यात आला. 2014 नंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर शिवसेनेला डॅमेज करण्याचा वारंवार प्रयत्न झाला. पुढे पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना शिवसेनेबाबत बिलकुल सहानुभूती उरली नव्हती. त्यामुळे विधानसभा, लोकसभेच्या निवडणुकीच्या जागा वाटपांपासून स्वबळावर बहुमत मिळवण्यासाठी भाजपने खटाटोप केला. शिवसेनेच्या दृष्टीने गद्दार असलेल्या नारायण राणे यांना भाजपमध्ये विलीन करून शिवसेनेच्या जखमेवर मीठ चोळले, असा दावा या पुस्तकातून करण्यात आला आहे.
बंडखोरांना भाजपचे पाठबळ : राज्यात विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने शिवसेनेच्या पन्नास उमेदवारांपुढे बंडखोरांचे आव्हान होते. बहुतांश बंडखोरांना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या आशीर्वादाने पाठबळ मिळाल्याचे दिसत होते. सातत्याने शिवसेना नेत्यांमध्ये भाजप आपल्या अस्तित्वात उठला आहे, असा संताप व्यक्त केला जात होता. परंतु सत्तेत आल्यामुळे उद्रेक झाला नाही. मात्र अंतर्गत आग धुमसत होती, असा दावा पवार यांनी आपल्या पुस्तकातून केल्याचे समोर आले आहे.
पुस्तकाचे मंगळवारी प्रकाशन : शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाच्या दुसऱ्या भागाचे येत्या 2 मे रोजी मंगळवारी सकाळी 11 वाजता प्रकाशन होणार आहे. वाय.बी. चव्हाण सेंटर येथे शरद पवार यांच्यासह लेखक, हे पुस्तक प्रकाशन सकाळी 11 वाजता या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. त्यामुळे या पुस्तकाच्या वितरण सोहळ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा - PM Modi Mann ki baat : मन की बातचा आज शंभरावा भाग; मुंबईतून अमित शाह सहभागी