मुंबई - बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित असलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी 21 ऑक्टोबरला मतदान पार पडले. 288 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत कैद झाले. राज्यभरात आज मतमोजणी होणार असून कोण बाजी मारणार याचा निकाल लागणार आहे.
विद्यमान सरकार आणि विजयाचे प्रबळ दावेदार असणाऱ्या भाजपला आपल्या विजयाचा विश्वास आहे असे दिसते आहे. मुंबईतील भाजप कार्यालयात विजय साजरा करण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. कार्यालयामध्ये सजावटीचे काम सुरू आहे. याचा आढावा घेतला आहे ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी महेश बागल यांनी...