ETV Bharat / state

Pandharpur Temple Trust Act : पंढरपूर मंदिर ट्रस्ट कायद्याला भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी दिले आव्हान, 21 ऑगस्टला होणार सुनावणी - मंदिर ट्रस्ट

पंढरपूर मंदिर ट्रस्ट कायद्याला भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी आव्हान दिले. सुब्रमण्यम स्वामी यांची याचिका उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दाखल केली. महाराष्ट्राची अस्मिता असलेले विठ्ठल रखुमाईला शासनाच्या पाशातून सोडवा अशा पद्धतीची मागणी केली. मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश नितीन जामदार न्यायाधीश आरिफ एस डॉक्टर यांनी पुढील सुनावणी 21 ऑगस्ट रोजी निश्चित केली.

Pandharpur Temple Trust Act
मुंबई उच्च न्यायालय
author img

By

Published : Jul 6, 2023, 10:43 AM IST

मुंबई : राज्यातील कोट्यावधी वारकऱ्यांचे आराध्यदैवत असलेले विठ्ठल रखूमाई मंदीर ट्रस्ट कायदा सरकारी नियमातून तुक्त करा' अशी विनंती करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे खासदार जेष्ठ वकील अ‍ॅड.डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी ही याचिका दाखल केली. उच्च न्यायालयाने ही याचिका बुधवारी दाखल करून घेतली.

पंढरपूर मंदिर ट्रस्ट कायदा : कोणत्याही मंदिराचे व्यवस्थापण कायद्याच्या नियमाद्वारे व्हावे. यासाठी 1960 च्या दशकात बडव्यांच्या पुजाऱ्यांच्या बाबत वारकरी जनतेच्या तक्रारी नंतर राज्य शासनाने पंढरपूर मंदिर ट्रस्ट कायदा केला. आणि शासनाचा अंमल त्यावर राहील; असा शिरस्ता 50 वर्षे पासून आहे. परंतु आता पंढरपूर मंदिर कायदा यालाच आव्हान देणारी याचिका भाजपाचे राज्यसभेचे खासदार डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी यांनी दाखल केली. बुधवारी अखेर ती याचिका उच्च न्यायालयाने दाखल करून घेतली आहे. पंढरपूर मंदिर कायदा आणि बडवे यासंदर्भातले न्यायालयीन वाद 2014 मध्ये मिटवले गेले होते. 2014 च्या सुमारास सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर संपूर्णतः ताबा महाराष्ट्र शासनाच्या आकारित आला होता. त्यामुळे पंढरपूर मंदिर ट्रस्ट कायदा हा महाराष्ट्र शासनाच्या अतिरिक्त पूर्णत: आला. परंतु आता त्या निर्णयालाच आव्हान देणारी ही याचिका डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी यांनी दाखल केली आहे.

कोणत्या मूलभूत आधारावर सुब्रमण्यम स्वामी यांचा आक्षेप आहे ? कोणतेही धार्मिक स्थळ असेल तर त्या संदर्भा त्या संदर्भात शासनाने हस्तक्षेप कशाला करावा. त्या धार्मिक स्थळाच्या ठिकाणी त्या त्या धर्माच्या रीती रिवाजाच्या अनुसार प्रथा आणि परंपरांचे पालन पूजा अर्चना इतर सर्व व्यवहार होऊ द्यावे. सत्यामध्ये शासनाने हस्तक्षेप कशाला करावा. हा हस्तक्षेप अमान्य आहे; असा मुद्दा त्यांनी याचिकेमध्ये अधोरेखित केलेला आहे.

निधर्मी सरकार धार्मिक मंदिर चालवू शकते का ? सुब्रमण्यम स्वामी यांचा याचिकेत प्रश्न, सरकार एकीकडे आम्ही कोणत्याही धर्माची नाही; असे म्हणते. मग कोणतही निधर्मी सरकार धार्मिक मंदिर का चालवू शकते? असा प्रश्न देखील त्यांनी याचीकेमध्ये केलेला आहे. भारतीय राज्यघटनेचा हवाला देत त्यांनी म्हटलेलं आहे की भारतीय राज्यघटना देखील कोणत्याही प्रार्थना स्थळांबाबत हस्तक्षेप करू शकत नाही असे देखील नमूद करण्यात आलेले आहे.

मंदिर शासनाच्या ताब्यातून काढून जनतेच्या ताब्यात दिले पाहिजे : भाजपाचे खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी याचिकेमध्ये हा देखील मुद्दा सांगितलेला आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरही येथे राजकीय व्यक्तींनी पंढरपूर मंदिर कायदा अंतर्गत राजकारणाचा अड्डा बनवलेला आहे. त्यामुळे धार्मिक रित्रीवाद प्रथा परंपरा याचे पालन होत नाही. त्यामुळे हिंदू धर्माच्या या मंदिरावर शासनाने नियंत्रण ठेवण्याचे काही कामच नाही. त्यामुळे शासनाच्या ताब्यातून हे मंदिर बाजूला काढून जनतेच्या ताब्यात दिले पाहिजे अशी देखील त्यांची दुसरी महत्त्वाची मागणी याचिकेमध्ये त्यांनी नमूद केलेली आहे.

हेही वाचा :

  1. Mohan Bhagwat On intellectual Kshatriya : 'या' आशेने जग भारताकडे पाहते, मात्र भारताला सध्या बौद्धिक क्षत्रियांची गरज : सरसंघचालक
  2. Palghar News Today : लाखोंच्या 'खेळात' ५०० चिमुकल्यांचा जीव धोक्यात; अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने ठेकेदाराकडून वर्ग खोल्यांचे काम अनधिकृत आणि निकृष्ट दर्जाचे
  3. NCP Executive Meeting Today: शरद पवार यांची आज दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक, काय होणार निर्णय?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.