ETV Bharat / state

'ठाकरे' सरकारला नारळ देऊन राष्ट्रपती राजवट लागू करावी, नारायण राणेंची मागणी - महाविकास आघाडी

कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. कोरोनामुळे राज्यात आजघडीपर्यंत १ हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. दिवसेंदिवस ही परिस्थिती बिकट होत चालली आहे. हे सरकारचे अपयश आहे. यामुळे राज्यपालांनी महाविकास आघाडीला नारळ देत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार नारायण राणे यांनी केली आहे.

BJP MP Narayan Rane demands that president rule should be imposed in Maharashtra amid coronavirus pandemic
'ठाकरे' सरकारला नारळ देऊन राष्ट्रपती राजवट लागू करावी, नारायण राणेंची मागणी
author img

By

Published : May 25, 2020, 5:46 PM IST

Updated : May 25, 2020, 6:07 PM IST

मुंबई - कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. कोरोनामुळे राज्यात आजघडीपर्यंत १ हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. दिवसेंदिवस ही परिस्थिती बिकट होत चालली आहे. हे सरकारचे अपयश आहे. यामुळे राज्यपालांनी महाविकास आघाडीला नारळ देत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार नारायण राणे यांनी केली आहे. आज राणे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनी काँग्रेस नेते प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यांनी ही सदिच्छा भेट असल्याचे सांगितले. या भेटीनंतर काही तासांमध्येच नारायण राणे राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनाला पोहोचले. कोश्यारी यांच्या भेटीनंतर त्यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली.

राणे म्हणाले, 'राज्यात कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. रुग्ण आणि मृत्यूची संख्या वाढत आहे. राज्य सरकार ही परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरली आहे. दिवसागणिक ही परिस्थिती गंभीर होत आहे. आतापर्यंत १ हजाराहून अधिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामुळे रुग्णालये लष्कराच्या ताब्यात देण्यात यावी. राज्य सरकारमध्ये परिस्थिती पेलवण्याची क्षमता नाही. त्यामुळे या सरकारला नारळ देऊन राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी.'

लोकांना रोजगार नाही, उपासमार सुरू आहे. ही स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मुख्यमंत्री सक्षम नाही. केंद्र सरकारने सर्व काही दिले. राज्य सरकारने काय दिले, असा सवालही राणे यांनी विचारला.

हे लोक तिकडे जाऊन गोड बोलतात नंतर त्यांच्यावरच टीका करतात. आर्थिक स्रोत निर्माण करण्यात राज्य सरकार अपयशी ठरली आहे. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यानी त्यांच्या राज्याच्या नागरिकांचा निर्णय घेतला आहे. आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यानी आपल्या राज्याचा नागरिकांचा विचार करावा, असे आवाहनही राणे यांनी यावेळी केले.

कोकणात कोरोना चिंतेची बाब असून आम्ही त्यांना उपाययोजना करण्यासाठी मदत करत आहोत. असेही राणे म्हणाले.

दरम्यान, राज्यातील अनेक मातब्बर नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली आहे. यात शिवसेनेचे संजय राऊत, शरद पवार, प्रफुल्ल पटेल आणि आता नारायण राणे यांचा समावेश आहे. या भेटीमागे विविध तर्क लावले जात आहेत.

Last Updated : May 25, 2020, 6:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.