ETV Bharat / state

कोरोनावर दरमहा ४०० कोटी खर्च करण्यापेक्षा १५० कोटी खर्च करून मुंबई कोरोनामुक्त करा - मनोज कोटक - मनोज कोटक मुंबई न्यूज

'मुंबईतील कोरोना लसीकरण वाढवा. लसीसाठी १५० कोटी रुपये खर्च करून मुंबईला कोरोनामुक्त करा', अशी मागणी भाजप खासदार मनोज कोटक यांनी मुंबई पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्याकडे केली.

mumbai
मुंबई
author img

By

Published : May 6, 2021, 7:55 PM IST

मुंबई - 'मुंबईमध्ये कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरण मोहीम सध्या जोरात सुरु आहे. पण, लसीकरण आणखी मोठ्या प्रमाणात व्हावे यासाठी पालिकेने घरोघरी जाऊन लसीकरण करून घ्यावे. पालिका दर महिन्याला कोरोनावरील उपाययोजनांसाठी ४०० ते ४५० कोटी रूपये खर्च करत आहे. त्यापेक्षा लसीसाठी १५० कोटी रुपये खर्च करून मुंबईला कोरोनामुक्त करावे', अशी मागणी भाजपचे खासदार मनोज कोटक यांनी पालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांच्याकडे केली आहे.

१५० कोटी खर्च करून मुंबई कोरोनमुक्त करा - मनोज कोटक

'मोफत लस द्या'

भाजप खासदार मनोज कोटक यांनी आज (6 मे) पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची भेट घेतली. या भेटीनंतर कोटक पत्रकारांशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले, की 'घरोघरी जाऊन लसीकरण करण्याची मागणी आम्ही केली आहे. या मागणीबाबत पालिका आयुक्तांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. आम्ही एनजीओच्या माध्यमातून लसीकरण करण्याची मागणी केली आहे. त्यासाठी खासगी रुग्णालयांप्रमाणे प्रत्येक लाभार्थ्यांमागे १०० रुपये खर्च करण्याची आमची तयारी असल्याचे आम्ही आयुक्तांना सांगितले. त्यावर राज्य सरकारकडून आम्हाला लस घ्यावी लागते. पालिकेला लस विकत घेण्याची परवानगी नाही, असे आयुक्तांनी सांगितले. तर, पालिकेने राज्य सरकारकडून लस विकत घ्यावी किंवा लागणाऱ्या लसीचा पैसा पालिकेने देऊन सर्व मुंबईकरांना मोफत लस द्यावी अशी मागणी आम्ही केली', असे कोटक यांनी सांगितले.

'१५० कोटी खर्च करून कोरोनामुक्त करा'

'मुंबई महापालिकेने वर्षभरात कोरोनावर हजारो कोटी रूपयांचा खर्च केला आहे. पालिका कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी लागणाऱ्या सुविधांवर दर महिन्याला ४०० ते ४५० कोटी रूपये खर्च करत आहे. त्यापेक्षा पालिकेने ५० लाख लसी विकत घेण्यासाठी १५० कोटी रुपये खर्च करावेत. ती लस मुंबईकरांना द्यावी. यामुळे पालिकेचा दरमहा कोरोनावर होणारा खर्चही थांबवता येऊ शकतो', असे कोटक यांनी सांगितले.

दरम्यान, पालिका लवकरच १३२ खासगी रुग्णालयांना लसीकरणाला परवानगी देणार आहे. त्यामुळे हाऊसिंग सोसायट्यांना लसीकरण करणे शक्य होणार असल्याचेही कोटक यांनी सांगितले.

हेही वाचा - जालन्यात ७० वर्षीय आजीबाईंनी दिली कोरोनाला मात; विभागीय आयुक्तांनी घेतली भेट

हेही वाचा - डॉ. हेडगेवार रक्तपेढीला नितीन गडकरींच्या प्रयत्नांने दोन प्लाझ्मा मशीन उपलब्ध

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.