ETV Bharat / state

विमानतळावर अधिकाऱ्यांकडून कोरोनाच्या नावाखाली प्रवाशांची लूट, गोपाळ शेट्टींनी सुनावले खडे बोल - मुंबई विमानतळावर प्रवाशांची लूट

उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी मुंबई विमानतळावर कोरोनाच्या नावाखाली होणारी प्रवाशाची लुट थांबवली आहे. वाचा काय प्रकरण...

मुंबई
मुंबई
author img

By

Published : Aug 31, 2021, 9:58 AM IST

मुंबई : परदेशातून मुंबईत आलेल्या प्रवाशांना लस घेतल्याबाबतचे प्रमाणपत्र नसल्यास त्यांना १४ दिवस क्वारंटाईन करण्यात येते. तेही महागड्या पंचतारांकित हॉटेलमध्ये स्व: खर्चाने राहण्याची सक्ती करण्यात येते. त्या प्रवाशांना क्वारंटाईन व्हायचे नसल्यास किंवा इतक्या मोठ्या हॉटेलमध्ये खर्च करून राहण्याची ऐपत नसल्याचे सांगितले, तर मात्र १० हजार रुपयात मांडवली करून त्या प्रवाशांना सोडून देण्याचे प्रकार पालिकेच्या विमानतळावर असलेल्या अधिकारी - कर्मचाऱ्यांकडून होत असल्याचे वारंवार पुढे येत आहे. काल पहाटे सुद्धा एका मराठी सर्वसामान्य मुलाबद्दल असाच प्रकार घडला. पण उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांच्यामुळे त्या मुलाची लूट टळली.

भाजप खासदार गोपाळ शेट्टी

नक्की काय प्रकार घडला?

मुंबई विमानतळावरून काल सकाळी 5 वाजता आफ्रिकेतून आलेल्या एका मराठी सर्वसामान्य कुटुंबातील प्रवाशाला मुंबई महानगरपालिकेतील कर्मचाऱ्याने आरटीपीसीआर रिपोर्ट असून सुद्धा दोन डोस घेतलेले नाही म्हणून त्रास देणे सुरू केले. तुम्हाला हॉटेलमध्ये स्व: खर्चाने राहावे लागेल असे सांगण्यात आले. संबंधीत मुलाने आपल्या आईला घरून फोन करून बोलावले. त्या आईने आमच्याकडे पैसे नाहीत. त्यामुळे आम्ही हॉटेलमध्ये जाऊ शकत नाही, असे सांगितले. त्यावर अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे 10 हजार रुपये भरा व मुलाला घरी घेऊन जा, असे सांगितले.

10 हजार घेऊन कोरोना निगेटीव्ह सांगणार का? - गोपाळ शेट्टी

विरारवरून बसचे तिकीट काढून आलेल्या त्या मातेने 10 हजार रुपये भरायची क्षमता नाही म्हणून 100 नंबरला फोन केला. पण त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांना फोन लावला. तिथूनही प्रतिसाद मिळाला नाही. मध्यरात्री साडेतीन वाजता परदेशातून मुलगा परततो आणि सकाळी 5 वाजेपर्यंत विमानतळावर अधिकारी थांबवून ठेवतात. शिवाय कुणीही मदत करायला पुढे येत नाही. शेवटी त्या मातेने उत्तर मुंबई खासदार गोपाळ शेट्टी यांना पहाटे फोन केला. एका फोनवर खासादार गोपाळ शेट्टी मदतीसाठी विमानतळावर धावून गेले. अधिकाऱ्यांना जाब विचारला. जर दक्षिण आफ्रिका येथे लसीकरण सुरूच नाही झाले तर ते कसे घेऊ शकतात? दुसरं त्यांचे आरटीपीसीआर रिपोर्ट आहे. ते कोरोना निगेटिव्ह आहेत. त्यावर क्वारंटाईन करायचे तर त्यांना परवडेल तिथे जाऊ द्या. तुम्हीच नक्की केलेल्या महागड्या हॉटेलसाठी का आग्रह धरतात? १० हजार रुपये तुम्हाला दिल्यानंतर त्या प्रवाशाला कोरोना नसल्याचे अनुमान तुम्ही कसे काढता? हे मला समजत नसल्याचे गोपाळ शेट्टी म्हणाले. अशी रोख ठोक भूमिका गोपाळ शेट्टी यांनी घेतल्यानंतर त्या प्रवासी मुलाला सोडण्यात आले. दरम्यान, गोपाळ शेट्टी यांच्या जागरूकततेमुळे महापालिका, पोलीस प्रशासनाकडून विमानतळावर होत असलेल्या भयानक प्रकार उघडकीस आला आहे.

गोपाळ शेट्टींची मागणी

गोपाळ शेट्टी म्हणाले, की 'एक हेल्पलाईन सेंटर विमानतळावर तत्काळ सुरु करण्यात यावे. महानगरपालिका करत नसेल तर आम्ही भाजप पक्षाच्या वतीने सुरू करु. मनपा आयुक्त इकबाल सिंह चहल यांना पत्र लिहिणार आहे. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांचे हाल करू नका. योग्य ती काळजी घ्या आणि बीकेसी येथील क्वारंटाईन सेंटरचा त्यासाठी उपयोग करा. प्रवाशांना कशासाठी पंचतारांकित हॉटेलमध्ये पाठवायचे? हे म्हणणे मांडणार आहे'.

पालिकेचे जुन्याच परिपत्रकाप्रमाणे काम

केंद्र सरकारने २१ फेब्रुवारी २०२१ रोजी एक परिपत्रक काढले. त्यात आरटीपीसीआर टेस्ट झालेली असल्यास त्यांना घरीच क्वारंटाईन करा, असे म्हटले आहे. पण पालिका जुन्याच डिसेंबरच्या परिपत्रकाप्रमाणे अजूनही काम करत आहे. मात्र राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी केंद्र सरकारचे ते परिपत्रक काल पालिकेला पाठवले असल्याचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.